S M L

छाबाड हाऊस, राष्ट्रीय सुरक्षा महाविद्यालय टार्गेट होते !

25 मेमुंबई हल्ल्याशी संबंधित आयएसआयच्या कटाबाबत अनेक खळबळजनक गौप्यस्फोट हेडलीनं केले आहे. भारतातील इतर ठिकाणंही आयएसआय आणि लष्कर-ए-तोयबाच्या हिटलिस्टवर होती असं हेडलीनं सांगितलं.मुंबई हल्ल्याप्रकरणी आरोपी तहव्वुर हुसेन राणा याच्या शिकागो कोर्टातल्या खटल्याचा मंगळवारी दुसरा दिवस होता. यात मुख्य आरोपी डेव्हिड हेडलीनं कोर्टात अनेक खळबळजनक गौप्यस्फोट केले. हेडली म्हणाला..- 26/11 च्या हल्ल्याचा मास्टरमाईंड होता आयएसआयचा मेजर इक्बाल, चौधरी खान या नावानंही तो ओळखला जातो. - हल्ल्याबाबत मेजर इक्बालने प्रत्येक बैठकीत आणि ई-मेलद्वारे अनेक सूचना दिल्या. - भारतातल्या टार्गेटबाबत या सूचना होत्या- मुंबईतील छाबाड हाऊस हे इस्रायलच्या मोसादचे कार्यालय असल्याचा संशय इक्बालला होता त्यामुळे छाबाड हाऊस हे टार्गेट होतं. - दिल्लीतील नॅशनल डिफेन्स कॉलेज हे आणखी एक टार्गेट होतं हेडलीने मुंबईतल्या टार्गेटची यादी मेजर इक्बालकडे दिली. पण यादी पाहून इक्बाल निराश झाल्याचं हेडलीनं सांगितलं. कारण या यादीत मुंबईतील एअरपोर्ट आणि पोलीस हेडक्वार्टरचा समावेश नव्हता. सप्टेंबर 2008 मध्ये सुद्धा मुंबईत हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. पण हल्ल्यासाठी वापरली जाणारी बोट हरवल्यामुळे हा कट रद्द करावा लागल्याचा हेडलीनं सांगितले आहे.फेब्रुवारी 2009 मध्ये इलियास काश्मिरी या अतिरेक्याची वझिरीस्तानमध्ये भेट घेतल्याची कबुली हेडलीनं दिली. त्यावेळी दिल्लीतील्या नॅशनल डिफेन्स कॉलेजवर हल्ल्याचा कटाबाबत चर्चा झाली.पण हा सर्व कट आखताना हेडलीला भारतात वारंवार जाण्यातला धोका लक्षात आला. त्यामुळे त्याने भारतात येण्यापूर्वी आपलं मृत्यूपत्रही बनवलं आणि ते तहव्वुर राणाकडे पाठवलं होतं. त्यात त्याने आपली पत्नी आणि मुलांच्या भवितव्याबद्दल लिहिलं होतं.हेडलीच्या साक्षीतले महत्त्वाचे मुद्दे - 26/11 साठी आयएसआयने लष्कर-ए-तोयबाला मदत पुरवली- लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफीज सईद हा हल्लेखोरांचा मोटीव्हेटर आणि ट्रेनर होता - एका सेकंदाचा जिहाद म्हणजे 100 वर्षांची प्रार्थना असं सईदनं सांगितलं - काश्मीरमधील अतिरेकी कारवायांसाठी हेडलीची नेमणूक होणार होती- पण यापेक्षाही चांगली कामगिरी सोपवू असं लष्कर-ए-तोयबानं सांगितलं - भारतात येण्यासाठी नाव बदलण्याची आणि नवं पासपोर्ट देण्याची सूचना हेडलीनं लष्करकडे केली

आईबीएन लोकमत | Updated On: May 25, 2011 06:03 PM IST

छाबाड हाऊस, राष्ट्रीय सुरक्षा महाविद्यालय टार्गेट होते !

25 मे

मुंबई हल्ल्याशी संबंधित आयएसआयच्या कटाबाबत अनेक खळबळजनक गौप्यस्फोट हेडलीनं केले आहे. भारतातील इतर ठिकाणंही आयएसआय आणि लष्कर-ए-तोयबाच्या हिटलिस्टवर होती असं हेडलीनं सांगितलं.

मुंबई हल्ल्याप्रकरणी आरोपी तहव्वुर हुसेन राणा याच्या शिकागो कोर्टातल्या खटल्याचा मंगळवारी दुसरा दिवस होता. यात मुख्य आरोपी डेव्हिड हेडलीनं कोर्टात अनेक खळबळजनक गौप्यस्फोट केले.

हेडली म्हणाला..

- 26/11 च्या हल्ल्याचा मास्टरमाईंड होता आयएसआयचा मेजर इक्बाल, चौधरी खान या नावानंही तो ओळखला जातो. - हल्ल्याबाबत मेजर इक्बालने प्रत्येक बैठकीत आणि ई-मेलद्वारे अनेक सूचना दिल्या. - भारतातल्या टार्गेटबाबत या सूचना होत्या- मुंबईतील छाबाड हाऊस हे इस्रायलच्या मोसादचे कार्यालय असल्याचा संशय इक्बालला होता त्यामुळे छाबाड हाऊस हे टार्गेट होतं. - दिल्लीतील नॅशनल डिफेन्स कॉलेज हे आणखी एक टार्गेट होतं

हेडलीने मुंबईतल्या टार्गेटची यादी मेजर इक्बालकडे दिली. पण यादी पाहून इक्बाल निराश झाल्याचं हेडलीनं सांगितलं. कारण या यादीत मुंबईतील एअरपोर्ट आणि पोलीस हेडक्वार्टरचा समावेश नव्हता. सप्टेंबर 2008 मध्ये सुद्धा मुंबईत हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. पण हल्ल्यासाठी वापरली जाणारी बोट हरवल्यामुळे हा कट रद्द करावा लागल्याचा हेडलीनं सांगितले आहे.

फेब्रुवारी 2009 मध्ये इलियास काश्मिरी या अतिरेक्याची वझिरीस्तानमध्ये भेट घेतल्याची कबुली हेडलीनं दिली. त्यावेळी दिल्लीतील्या नॅशनल डिफेन्स कॉलेजवर हल्ल्याचा कटाबाबत चर्चा झाली.

पण हा सर्व कट आखताना हेडलीला भारतात वारंवार जाण्यातला धोका लक्षात आला. त्यामुळे त्याने भारतात येण्यापूर्वी आपलं मृत्यूपत्रही बनवलं आणि ते तहव्वुर राणाकडे पाठवलं होतं. त्यात त्याने आपली पत्नी आणि मुलांच्या भवितव्याबद्दल लिहिलं होतं.

हेडलीच्या साक्षीतले महत्त्वाचे मुद्दे

- 26/11 साठी आयएसआयने लष्कर-ए-तोयबाला मदत पुरवली- लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफीज सईद हा हल्लेखोरांचा मोटीव्हेटर आणि ट्रेनर होता - एका सेकंदाचा जिहाद म्हणजे 100 वर्षांची प्रार्थना असं सईदनं सांगितलं - काश्मीरमधील अतिरेकी कारवायांसाठी हेडलीची नेमणूक होणार होती- पण यापेक्षाही चांगली कामगिरी सोपवू असं लष्कर-ए-तोयबानं सांगितलं - भारतात येण्यासाठी नाव बदलण्याची आणि नवं पासपोर्ट देण्याची सूचना हेडलीनं लष्करकडे केली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 25, 2011 06:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close