S M L

आदर्श प्रकरणी गीता कश्यप यांचं घुमजाव

अजित मांढरे, मुंबई26 मेआदर्शची जमीन ही राज्य सरकारची आहे असं म्हणणार्‍या संरक्षण खात्याच्या ईस्टेट ऑफिसर गीता कश्यप यांनी आदर्श न्यायालयीन चौकशी आयोगासमोर आपल्या या वक्तव्यावरून घुमजाव केलं आहे. ही जमीन वादग्रस्त आहे असं मत त्यांनी आदर्श न्यायालयीन चौकशी आयोगासमोर व्यक्त केलं. न्यायालयीन चौकशी आयोगासमोर गीता कश्यप यांनी आतापर्यंत काय काय सांगितलं आहे. 23 मे- रजनी अय्यर, संरक्षण खात्याच्या वकील - आदर्श सोसायटीची इमारत ज्या जागेवर उभी आहे. ती जागा संरक्षण खात्याच्या एमएलआर म्हणजेच मिलिटरी लँड रेकॉर्ड रजिस्टरमध्ये आहे का ?- गीता कश्यप- आमच्या एमएलआर रजिस्टरमध्ये आदर्श सोसायटीची जागा ही संरक्षण खात्याची आहे अशी नोंद नाही.24 मे- दीपन मर्चंट, आयोगाचे वकील - आदर्श सोसायटीला वाढीव एफएसआय देण्यात आला. त्यावर संरक्षण खात्याने आक्षेप घेतला होता का ?- गीता कश्यप - नाही.- दीपन मर्चंट, आयोगाचे वकील- ती जागा संरक्षण खात्याची आहे म्हणून तुम्ही आक्षेप घेतला नाही का ? - गीता कश्यप - ती जमीन सरक्षण खात्याच्या मालकीची नसून राज्य सरकारच्या मालकीची आहे. त्यामुळे आदर्श सोसायटीला मिळालेल्या वाढीव एफएसआयबद्दल आम्ही काही हरकत घेतली नाही.25 मे- दीपन मर्चंट, आयोगाचे वकील - आदर्शची जमीन ही वादग्रस्त जमीन होती का ?- गीता कश्यप - हो आदर्शची जमीन ही वादग्रस्त जमीन होती. - दीपन मर्चंट, आयोगाचे वकील - हा वाद सोडवण्यासाठी तुम्ही काही प्रयत्न केले का ?- गीता कश्यप - नाही वाद सोडवण्यासाठी सरंक्षण खात्याकडून कोणताही प्रयत्न करण्यात आला नाही.- दीपन मर्चंट- आयोगाचे वकील - तुम्ही संरक्षण खात्याच्या दिल्लीतील प्रमुखांना आदर्शच्या जागेबद्दल एक अहवाल आणि पत्र पाठवलं होतं का ? त्यात तुम्ही काय लिहीलं ? - गीता कश्यप- आदर्श घोटाळा उघड झाल्यानंतर माझ्याकडून आमच्या दिल्लीतील प्रमुखांनी उत्तर मागितलं. त्यावर मी त्यांना एक अहवाल पाठवला आणि एक पत्र पाठवलं. त्यात मी स्पष्टपणे सांगितलं होतं की आदर्शच्या जागेची कोणतीही नोंद सरंक्षण खात्यात नाही. जागेचे कोणतेही कागदपत्र सरंक्षण खात्याकडे नाहीत. हे प्रकरण वादग्रस्त आहे. यात लक्ष घालणं गरजेचं आहे. पण त्यावर कोणीच उत्तर दिलं नाही. - दीपन मर्चंट, आयोगाचे वकील - जमीन परत मिळवण्यासाठी तुम्ही कोर्टात कधी खटला दाखल केला होता का ? - गीता कश्यप - नाही आम्ही कोणताही खटला दाखल केला नाही. आता गीता कश्यप यांच्या या घुमजावामुळे आदर्शची जागा नक्की कोणाची हे गुढ वाढतचं चाललं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 26, 2011 09:49 AM IST

आदर्श प्रकरणी गीता कश्यप यांचं घुमजाव

अजित मांढरे, मुंबई

26 मे

आदर्शची जमीन ही राज्य सरकारची आहे असं म्हणणार्‍या संरक्षण खात्याच्या ईस्टेट ऑफिसर गीता कश्यप यांनी आदर्श न्यायालयीन चौकशी आयोगासमोर आपल्या या वक्तव्यावरून घुमजाव केलं आहे.

ही जमीन वादग्रस्त आहे असं मत त्यांनी आदर्श न्यायालयीन चौकशी आयोगासमोर व्यक्त केलं. न्यायालयीन चौकशी आयोगासमोर गीता कश्यप यांनी आतापर्यंत काय काय सांगितलं आहे.

23 मे

- रजनी अय्यर, संरक्षण खात्याच्या वकील - आदर्श सोसायटीची इमारत ज्या जागेवर उभी आहे. ती जागा संरक्षण खात्याच्या एमएलआर म्हणजेच मिलिटरी लँड रेकॉर्ड रजिस्टरमध्ये आहे का ?

- गीता कश्यप- आमच्या एमएलआर रजिस्टरमध्ये आदर्श सोसायटीची जागा ही संरक्षण खात्याची आहे अशी नोंद नाही.24 मे

- दीपन मर्चंट, आयोगाचे वकील - आदर्श सोसायटीला वाढीव एफएसआय देण्यात आला. त्यावर संरक्षण खात्याने आक्षेप घेतला होता का ?- गीता कश्यप - नाही.- दीपन मर्चंट, आयोगाचे वकील- ती जागा संरक्षण खात्याची आहे म्हणून तुम्ही आक्षेप घेतला नाही का ? - गीता कश्यप - ती जमीन सरक्षण खात्याच्या मालकीची नसून राज्य सरकारच्या मालकीची आहे. त्यामुळे आदर्श सोसायटीला मिळालेल्या वाढीव एफएसआयबद्दल आम्ही काही हरकत घेतली नाही.

25 मे

- दीपन मर्चंट, आयोगाचे वकील - आदर्शची जमीन ही वादग्रस्त जमीन होती का ?- गीता कश्यप - हो आदर्शची जमीन ही वादग्रस्त जमीन होती. - दीपन मर्चंट, आयोगाचे वकील - हा वाद सोडवण्यासाठी तुम्ही काही प्रयत्न केले का ?- गीता कश्यप - नाही वाद सोडवण्यासाठी सरंक्षण खात्याकडून कोणताही प्रयत्न करण्यात आला नाही.

- दीपन मर्चंट- आयोगाचे वकील - तुम्ही संरक्षण खात्याच्या दिल्लीतील प्रमुखांना आदर्शच्या जागेबद्दल एक अहवाल आणि पत्र पाठवलं होतं का ? त्यात तुम्ही काय लिहीलं ?

- गीता कश्यप- आदर्श घोटाळा उघड झाल्यानंतर माझ्याकडून आमच्या दिल्लीतील प्रमुखांनी उत्तर मागितलं. त्यावर मी त्यांना एक अहवाल पाठवला आणि एक पत्र पाठवलं. त्यात मी स्पष्टपणे सांगितलं होतं की आदर्शच्या जागेची कोणतीही नोंद सरंक्षण खात्यात नाही. जागेचे कोणतेही कागदपत्र सरंक्षण खात्याकडे नाहीत. हे प्रकरण वादग्रस्त आहे. यात लक्ष घालणं गरजेचं आहे. पण त्यावर कोणीच उत्तर दिलं नाही.

- दीपन मर्चंट, आयोगाचे वकील - जमीन परत मिळवण्यासाठी तुम्ही कोर्टात कधी खटला दाखल केला होता का ? - गीता कश्यप - नाही आम्ही कोणताही खटला दाखल केला नाही.

आता गीता कश्यप यांच्या या घुमजावामुळे आदर्शची जागा नक्की कोणाची हे गुढ वाढतचं चाललं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 26, 2011 09:49 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close