S M L

कोलकात्याला धुळ चारत मुंबईची क्वालिफायमध्ये धडक

25 मेआयपीएलमध्ये मुंबईने कोलकाता टीमचा पुन्हा एकदा पराभव केला आहे. आणि क्वालिफाय राऊंडमध्ये धडक मारली आहे. तर कोलकाता नाईट रायडर्सचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. कॅप्टन सचिन तेंडुलकरने टॉस जिंकून कोलकाताला पहिली बॅटिंग दिली. त्याच्या बॉलर्सनी कामगिरीही चोख बजावली. कोलकाताचे गौतम गंभीर, गोस्वामी आणि जॅक कॅलिस हे महत्त्वाचे तीन बॅट्समन पंधरा रनमध्येच पॅव्हेलिअनमध्ये परतले. त्यानंतर रायन टेन ड्यूसकाटेने 70 रन करत कोलकाताला दीडशे रनच्या जवळ आणलं. कोलकाताची टीम 20 ओव्हरमध्ये सात विकेटवर 147 रन करु शकली. याला उत्तर देताना स्पर्धेत पहिल्यांदा मुंबईची ओपनिंग चांगली झाली. ब्लिझार्डने हाफ सेंच्युरी ठोकली. तर सचिननेही 36 रन केले. त्यानंतर मात्र 6 विकेट सलग गेल्यामुळे टीमवर थोडावेळ दडपण आलं होतं. पण जेम्स फ्रँकलिनने सावध बॅटिंग करत मुंबईला विजयाच्या मार्गावर आणलं. तर हरभजन सिंगने शेवटच्या ओव्हरच्या दुसर्‍या बॉलवर सिक्स मारत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. मुंबई इंडियन्सनं इनिंगची सुरुवात जबरदस्त केली. लीग मॅचमध्ये मुंबई इंडियन्ससाठी सुरुवात चांगली होत नव्हती. पण या महत्वाच्या मॅचमध्ये सचिन तेंडुलकर आणि ब्लिझार्डनं टीमला दमदार सलामी दिली. या जोडीनं पहिल्या विकेटसाठी तब्बल 81 रन्सची पार्टनरशिप केली. ब्लिझार्डनं शानदार हाफसेंच्युरी ठोकली. 30 बॉलमध्ये त्याने 7 फोर आणि 2 सिक्स मारत 51 रन्स केले. तर सचिन तेंडुलकर 36 रन्सवर आऊट झाला. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत सचिन आता तिसर्‍या क्रमांकावर पोहचला आहे. त्याच्या खात्यात 15 मॅचमध्ये 513 रन्स जमा झाले आहे. पहिल्या क्रमांकावर असलेल्या ख्रिस गेलच्या खात्यात 519 रन्सची नोंद आहे.ही जोडी आऊट झाली आणि मुंबईची मधली फळी कोळसली. रोहित शर्मा आणि अंबाती रायडू झटपट आऊट झाले. पण पुन्हा एकदा मुंबईच्या मदतीला धावून आला तो जेम्स फ्रँकलिन. फ्रँकलिननं नॉटआऊट 29 रन्स करत मुंबईला शानदार विजय मिळवून दिला.मुंबईच्या बॉलर्सनंही आज टिच्चून बॉलिंग केली. मुनाफ पटेल मुंबईचा सर्वाधिक यशस्वी बॉलर ठरला. धोकादायक जॅक कॅलिसला आऊट करत त्याने मुंबई ब्रेक थ्रु मिळवून दिला. यानंतर श्रीवस्त गोस्वामी आणि युसुफ पठाणचीही विकेट घेतली. चार ओव्हरमध्ये त्यानं 27 रन्स देत 3 विकेट घेतल्या. तर धवल कुलकर्णी, हरभजन सिंग आणि लसिथ मलिंगांना प्रत्येकी एक विकेट घेतली. कायरन पोलार्ड महागडा बॉलर ठरला. त्याने 3 ओव्हरमध्ये 31 रन्स दिले आणि त्याला एकही विकेट घेता आली नाही. कोलकाताची सुरुवात खराब झाली. प्रमुख बॅट्समन झटपट आऊट झाले. कॅलिस, गंभीर, गोस्वामी आणि मनोज तिवारी हे पहिले चार प्रमुख बॅट्समन झटपट आऊट झाले. पण यानंतर युसुफ पठाण आणि टेन ड्युसकाटेनं कोलकाताची इनिंग सावरली. या जोडीने पाचव्या विकेटसाठी 60 रन्सची पार्टनरशिप केली. युसुफ पठाणनं 24 बॉलमध्ये 3 फोर मारत 26 रन्स केले. पण ड्युसकाटेनं दमदार कामगिरी केली. आधी युसुफ पठाण आणि नंतर शाकिब अल हसनबरोबर पार्टनरशिप करत कोलकाताला समाधानकारक स्कोर उभा करुन दिला. ड्युसकाटेनं नॉटआऊट 70 रन्स केले. 49 बॉलमध्ये त्यानं 6 फोर आणि 3 सिक्स मारले. शाकिब अल हसननं 26 रन्स करत त्याला चांगली साथ दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: May 25, 2011 06:26 PM IST

कोलकात्याला धुळ चारत मुंबईची क्वालिफायमध्ये धडक

25 मे

आयपीएलमध्ये मुंबईने कोलकाता टीमचा पुन्हा एकदा पराभव केला आहे. आणि क्वालिफाय राऊंडमध्ये धडक मारली आहे. तर कोलकाता नाईट रायडर्सचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. कॅप्टन सचिन तेंडुलकरने टॉस जिंकून कोलकाताला पहिली बॅटिंग दिली. त्याच्या बॉलर्सनी कामगिरीही चोख बजावली.

कोलकाताचे गौतम गंभीर, गोस्वामी आणि जॅक कॅलिस हे महत्त्वाचे तीन बॅट्समन पंधरा रनमध्येच पॅव्हेलिअनमध्ये परतले. त्यानंतर रायन टेन ड्यूसकाटेने 70 रन करत कोलकाताला दीडशे रनच्या जवळ आणलं.

कोलकाताची टीम 20 ओव्हरमध्ये सात विकेटवर 147 रन करु शकली. याला उत्तर देताना स्पर्धेत पहिल्यांदा मुंबईची ओपनिंग चांगली झाली. ब्लिझार्डने हाफ सेंच्युरी ठोकली. तर सचिननेही 36 रन केले. त्यानंतर मात्र 6 विकेट सलग गेल्यामुळे टीमवर थोडावेळ दडपण आलं होतं.

पण जेम्स फ्रँकलिनने सावध बॅटिंग करत मुंबईला विजयाच्या मार्गावर आणलं. तर हरभजन सिंगने शेवटच्या ओव्हरच्या दुसर्‍या बॉलवर सिक्स मारत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. मुंबई इंडियन्सनं इनिंगची सुरुवात जबरदस्त केली. लीग मॅचमध्ये मुंबई इंडियन्ससाठी सुरुवात चांगली होत नव्हती.

पण या महत्वाच्या मॅचमध्ये सचिन तेंडुलकर आणि ब्लिझार्डनं टीमला दमदार सलामी दिली. या जोडीनं पहिल्या विकेटसाठी तब्बल 81 रन्सची पार्टनरशिप केली. ब्लिझार्डनं शानदार हाफसेंच्युरी ठोकली.

30 बॉलमध्ये त्याने 7 फोर आणि 2 सिक्स मारत 51 रन्स केले. तर सचिन तेंडुलकर 36 रन्सवर आऊट झाला. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत सचिन आता तिसर्‍या क्रमांकावर पोहचला आहे. त्याच्या खात्यात 15 मॅचमध्ये 513 रन्स जमा झाले आहे. पहिल्या क्रमांकावर असलेल्या ख्रिस गेलच्या खात्यात 519 रन्सची नोंद आहे.

ही जोडी आऊट झाली आणि मुंबईची मधली फळी कोळसली. रोहित शर्मा आणि अंबाती रायडू झटपट आऊट झाले. पण पुन्हा एकदा मुंबईच्या मदतीला धावून आला तो जेम्स फ्रँकलिन. फ्रँकलिननं नॉटआऊट 29 रन्स करत मुंबईला शानदार विजय मिळवून दिला.

मुंबईच्या बॉलर्सनंही आज टिच्चून बॉलिंग केली. मुनाफ पटेल मुंबईचा सर्वाधिक यशस्वी बॉलर ठरला. धोकादायक जॅक कॅलिसला आऊट करत त्याने मुंबई ब्रेक थ्रु मिळवून दिला.

यानंतर श्रीवस्त गोस्वामी आणि युसुफ पठाणचीही विकेट घेतली. चार ओव्हरमध्ये त्यानं 27 रन्स देत 3 विकेट घेतल्या. तर धवल कुलकर्णी, हरभजन सिंग आणि लसिथ मलिंगांना प्रत्येकी एक विकेट घेतली. कायरन पोलार्ड महागडा बॉलर ठरला.

त्याने 3 ओव्हरमध्ये 31 रन्स दिले आणि त्याला एकही विकेट घेता आली नाही. कोलकाताची सुरुवात खराब झाली. प्रमुख बॅट्समन झटपट आऊट झाले.

कॅलिस, गंभीर, गोस्वामी आणि मनोज तिवारी हे पहिले चार प्रमुख बॅट्समन झटपट आऊट झाले. पण यानंतर युसुफ पठाण आणि टेन ड्युसकाटेनं कोलकाताची इनिंग सावरली.

या जोडीने पाचव्या विकेटसाठी 60 रन्सची पार्टनरशिप केली. युसुफ पठाणनं 24 बॉलमध्ये 3 फोर मारत 26 रन्स केले. पण ड्युसकाटेनं दमदार कामगिरी केली.

आधी युसुफ पठाण आणि नंतर शाकिब अल हसनबरोबर पार्टनरशिप करत कोलकाताला समाधानकारक स्कोर उभा करुन दिला. ड्युसकाटेनं नॉटआऊट 70 रन्स केले. 49 बॉलमध्ये त्यानं 6 फोर आणि 3 सिक्स मारले. शाकिब अल हसननं 26 रन्स करत त्याला चांगली साथ दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 25, 2011 06:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close