S M L

नाशिकच्या गोदावरीला जलपर्णीचा विळखा !

अमृता पवार, सिटीझन जर्नालिस्ट , नाशिक27 मेगोदावरीत स्नान करायला येणारे भाविक पुण्याई ऐवजी रोगराई नक्कीच घेऊन जात असतील. अशा जळजळीत प्रतिक्रिया व्यक्त केल्यात नाशिककरांनी. याबद्दलच नाशिककरांच्या या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात आमची सीटीझन जर्नालिस्ट अमृता पवार यांनी.अमृता गोदावरीच्या काठावर फिरायला आलेली असताना म्हणते, लहानपणी या नदीत मी स्वीमिंगची प्रॅक्टीस करायचे. पण आज नदीची ही अवस्था बघून खूप त्रास होतोय. प्रचंड अस्वस्थ वाटतं. या पाणवेलींमुळे नदी दिसतच नाही. याचं कारण ड्रेनेज आहे. मी स्वत: एन्व्हायर्नमेंटॅल मॅनेजमेंट केलं आहे. जोपर्यंत हे ड्रेनेज आपण थांबवत नाही तोपर्यंत या पाणवेली उगवतच राहातील. पण महापालिका याकडे लक्ष देत नाही.गोदावरीच पात्र दिसत नाही कारण ते पाणवेलींनी भरलंय. त्याचं कारण आम्ही महापालिकेला विचारलं होतं. त्यासाठी दक्षता अभियानच्या माध्यमातून महिपालिकेला काही प्रश्न विचारले. नाशिक हे तीर्थक्षेत्र आहे दरवर्षी कूंभ मेळयासाठी लाखोच्या संख्येनं भाविक येतात.श्रद्धेने अंघोळ करायला येतात. गोदावरी नदीमुळेच शहर ओळखलं जातं. जर आपण याकडे लक्ष दिलं नाही तर उद्या ही ओळखच गायब होईल. दक्षता अभियानने पाठपुरावा केल्यावर नाशिकच्या महापौरांनी आणि आयुक्तांनी गोदावरीचा दौरा केला पण तो फार्सच ठरला. पाणवेलींचं मूळ कारण असलेल्या फुटक्या ड्रेनेजवर फक्त मलमपट्टी करण्यात आली.या पाण्यात ड्रेनेजमुळे नायड्रेड कन्टेंट प्रचंड वाढला आहे. त्यामुळे पाणवेली वाढत आहेत. हेच पाणवेलींचं मोठं खाद्य आहे. यातला नायड्रेट कन्टेंट थांबणार नाही तोपर्यंत पाणवेली थांबणार नाहीत. अनट्रिटेड सूएझ डायरेक्ट नदीपात्रात सोडण्यात येतंय.ड्रेनेज लाईन फसल्याचे स्वत: आयुक्तांनीही कबूल केलं आहे. पलीकडेचे अनट्रिटेड पाणी थेट नदीपात्रात सोडण्यात येतंय. ड्रेनेजचं पाणी एसटीपी प्लॅण्टमधून फिल्टर करून सोडणं आवश्यक आहे. पाणवेलींचं रूट कॉज हेच आहे. गोदावरीच्या या अवस्थेनं नाशिककरही अस्वस्थ आहेत.विक्रांत मते म्हणतात, या नदीला नदी म्हणायला आम्हाला लाज वाटते एवढी दुर्गंधी येतेय. नुसती आश्वासनं देतात. सुधारणा काहीच दिसत नाही. तर योगेश खर्डे म्हणतात, रामकुंडात आंघोळी करण्यासाठी येणारे पुण्य घेवून जाण्याऐवजी नक्कीच कोणता तरी आजार, रोगराई घेवून जात असतील.पण लक्षात कोण घेतंय ? महापालिका प्रशासन फक्त वाट बघतंय पाऊस पडण्याची. पाऊस पडला की वेली वाहून जातील आणि विषयही. गेल्या वर्षी असेच झालं. पण वेलींची मूळं आणि फुटक्या ड्रेनेजची कुळं काही बदलली नाहीत.

आईबीएन लोकमत | Updated On: May 27, 2011 10:52 AM IST

नाशिकच्या गोदावरीला जलपर्णीचा विळखा !

अमृता पवार, सिटीझन जर्नालिस्ट , नाशिक

27 मे

गोदावरीत स्नान करायला येणारे भाविक पुण्याई ऐवजी रोगराई नक्कीच घेऊन जात असतील. अशा जळजळीत प्रतिक्रिया व्यक्त केल्यात नाशिककरांनी. याबद्दलच नाशिककरांच्या या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात आमची सीटीझन जर्नालिस्ट अमृता पवार यांनी.

अमृता गोदावरीच्या काठावर फिरायला आलेली असताना म्हणते, लहानपणी या नदीत मी स्वीमिंगची प्रॅक्टीस करायचे. पण आज नदीची ही अवस्था बघून खूप त्रास होतोय. प्रचंड अस्वस्थ वाटतं. या पाणवेलींमुळे नदी दिसतच नाही. याचं कारण ड्रेनेज आहे. मी स्वत: एन्व्हायर्नमेंटॅल मॅनेजमेंट केलं आहे. जोपर्यंत हे ड्रेनेज आपण थांबवत नाही तोपर्यंत या पाणवेली उगवतच राहातील. पण महापालिका याकडे लक्ष देत नाही.

गोदावरीच पात्र दिसत नाही कारण ते पाणवेलींनी भरलंय. त्याचं कारण आम्ही महापालिकेला विचारलं होतं. त्यासाठी दक्षता अभियानच्या माध्यमातून महिपालिकेला काही प्रश्न विचारले.

नाशिक हे तीर्थक्षेत्र आहे दरवर्षी कूंभ मेळयासाठी लाखोच्या संख्येनं भाविक येतात.श्रद्धेने अंघोळ करायला येतात. गोदावरी नदीमुळेच शहर ओळखलं जातं. जर आपण याकडे लक्ष दिलं नाही तर उद्या ही ओळखच गायब होईल.

दक्षता अभियानने पाठपुरावा केल्यावर नाशिकच्या महापौरांनी आणि आयुक्तांनी गोदावरीचा दौरा केला पण तो फार्सच ठरला. पाणवेलींचं मूळ कारण असलेल्या फुटक्या ड्रेनेजवर फक्त मलमपट्टी करण्यात आली.

या पाण्यात ड्रेनेजमुळे नायड्रेड कन्टेंट प्रचंड वाढला आहे. त्यामुळे पाणवेली वाढत आहेत. हेच पाणवेलींचं मोठं खाद्य आहे. यातला नायड्रेट कन्टेंट थांबणार नाही तोपर्यंत पाणवेली थांबणार नाहीत. अनट्रिटेड सूएझ डायरेक्ट नदीपात्रात सोडण्यात येतंय.ड्रेनेज लाईन फसल्याचे स्वत: आयुक्तांनीही कबूल केलं आहे.

पलीकडेचे अनट्रिटेड पाणी थेट नदीपात्रात सोडण्यात येतंय. ड्रेनेजचं पाणी एसटीपी प्लॅण्टमधून फिल्टर करून सोडणं आवश्यक आहे. पाणवेलींचं रूट कॉज हेच आहे. गोदावरीच्या या अवस्थेनं नाशिककरही अस्वस्थ आहेत.

विक्रांत मते म्हणतात, या नदीला नदी म्हणायला आम्हाला लाज वाटते एवढी दुर्गंधी येतेय. नुसती आश्वासनं देतात. सुधारणा काहीच दिसत नाही. तर योगेश खर्डे म्हणतात, रामकुंडात आंघोळी करण्यासाठी येणारे पुण्य घेवून जाण्याऐवजी नक्कीच कोणता तरी आजार, रोगराई घेवून जात असतील.

पण लक्षात कोण घेतंय ? महापालिका प्रशासन फक्त वाट बघतंय पाऊस पडण्याची. पाऊस पडला की वेली वाहून जातील आणि विषयही. गेल्या वर्षी असेच झालं. पण वेलींची मूळं आणि फुटक्या ड्रेनेजची कुळं काही बदलली नाहीत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 27, 2011 10:52 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close