S M L

गेलच्या वादळात मुंबई जमा ; बंगलोरची मेगाफायनलमध्ये धडक

27 मेआयपीएलमध्ये अखेर मुंबई इंडियन्सचं आव्हान सेमी फायनलमध्येच संपुष्टात आलंय. दुसर्‍या क्वालिफायरमध्ये बंगलोर रॉयल चॅलेंजर्सनी त्यांचा 43 रननी दणदणीत पराभव केला. जिंकण्यासाठी मुंबईसमोर 186 रनचं आव्हान होतं. पण ब्लिझार्ड आणि तेंडुलकरची ओपनिंग सोडली तर मुंबईची टीम विजयाच्या दिशेने जाताना कधी दिसलीच नाही. ब्लिझार्डही 10 रन करुन लवकर आऊट झाला. आणि त्यानंतर एका बाजूने विकेट जात राहिल्या. रोहीत शर्मा, फ्रँकलिन, पोलार्ड आणि रायडू पुरते फ्लॉप ठरले. बंगलोरच्या बॉलर्सनी बॉलिंगही झकास केली. मुंबईतर्फे सचिन तेंडुलकरने सर्वाधिक चाळीस रन केले. फ्लॉप बॅटिंगमुळे मुंबईची टीम वीस ओव्हरमध्ये 142 रन करु शकली. त्यापूर्वी चेपक स्टेडियमवर जमलेल्या मोजक्या लोकांना गेलचा झंझावात आज पुन्हा एकदा बघायला मिळाला. 47 बॉलमध्ये 89 रन त्याने केले ते 5 सिक्स आणि 9 फोर मारतं. त्याला मयंक अगरवालने 41 रन करत चांगली साथ दिली. आणि त्याच्या जोरावर बंगलोरने 20 ओव्हरमध्ये चार विकेटवर 185 रन केले. ख्रिस गेल अर्थातच मॅन ऑफ द मॅच ठरला. शिवाय ऑरेंज कॅपच्या शर्यतीतही त्याने सचिन आणि विराट कोहलीला पार मागे टाकलंय. या विजयाबरोबरच बंगलोरने स्पर्धेची फायनल गाठलीय. तर मुंबईचं आव्हान संपलं असलं तरी चॅम्पियन्स लीगसाठी टीम पात्र ठरली.

आईबीएन लोकमत | Updated On: May 27, 2011 06:16 PM IST

गेलच्या वादळात मुंबई जमा ; बंगलोरची मेगाफायनलमध्ये धडक

27 मेआयपीएलमध्ये अखेर मुंबई इंडियन्सचं आव्हान सेमी फायनलमध्येच संपुष्टात आलंय. दुसर्‍या क्वालिफायरमध्ये बंगलोर रॉयल चॅलेंजर्सनी त्यांचा 43 रननी दणदणीत पराभव केला.

जिंकण्यासाठी मुंबईसमोर 186 रनचं आव्हान होतं. पण ब्लिझार्ड आणि तेंडुलकरची ओपनिंग सोडली तर मुंबईची टीम विजयाच्या दिशेने जाताना कधी दिसलीच नाही. ब्लिझार्डही 10 रन करुन लवकर आऊट झाला. आणि त्यानंतर एका बाजूने विकेट जात राहिल्या. रोहीत शर्मा, फ्रँकलिन, पोलार्ड आणि रायडू पुरते फ्लॉप ठरले.

बंगलोरच्या बॉलर्सनी बॉलिंगही झकास केली. मुंबईतर्फे सचिन तेंडुलकरने सर्वाधिक चाळीस रन केले. फ्लॉप बॅटिंगमुळे मुंबईची टीम वीस ओव्हरमध्ये 142 रन करु शकली. त्यापूर्वी चेपक स्टेडियमवर जमलेल्या मोजक्या लोकांना गेलचा झंझावात आज पुन्हा एकदा बघायला मिळाला.

47 बॉलमध्ये 89 रन त्याने केले ते 5 सिक्स आणि 9 फोर मारतं. त्याला मयंक अगरवालने 41 रन करत चांगली साथ दिली. आणि त्याच्या जोरावर बंगलोरने 20 ओव्हरमध्ये चार विकेटवर 185 रन केले.

ख्रिस गेल अर्थातच मॅन ऑफ द मॅच ठरला. शिवाय ऑरेंज कॅपच्या शर्यतीतही त्याने सचिन आणि विराट कोहलीला पार मागे टाकलंय. या विजयाबरोबरच बंगलोरने स्पर्धेची फायनल गाठलीय. तर मुंबईचं आव्हान संपलं असलं तरी चॅम्पियन्स लीगसाठी टीम पात्र ठरली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 27, 2011 06:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close