S M L

काका पुतण्याची कमाल सोलार बाईक धमाल

प्राची कुलकर्णी, पुणे 28 मेपेट्रोलच्या किंमतीत दोन आठवड्यापूर्वी वाढ झाली आहे. आणि ती ही थोडी थोडकी नाही तर तब्बल 5 रुपयांनी. पण आपल्या यंगिस्तानचं बाईक शिवाय कसं जमणार. पण आता मात्र बजेटचं टेन्शन घ्यायची गरज नाही. कारण पुण्यातल्या काका पुतण्यांनी बनवली आहे चक्क सोलार बाईक. ही बाईक चालवण्यासाठी लागणार आहे फक्त दोन ते तीन तासांचं चाजीर्ंग. गाडी पार्क करताना उन्हात उभी केली की झालंच काम. त्यातही तुम्ही उन्हातच गाडी चालवत असाल तर मग टेन्शनच घ्यायला नको. कारण गाडी चालवताना आपोआपच चाजीर्ंग होणार आहे. त्यामुळे गाडीसाठीचं महिन्याचं बजेट होणार आहे अगदी शुन्य रुपये. ही किमया केली आहे पुण्यातल्या पठाण काका पुतण्यांची. पण जेव्हा ऊन नसेल तेव्हाचं काय ? तर ही गाडी इलेक्ट्रीसिटीवर चार्ज करण्याचाही ऑप्शन आहे. ऊन नसताना वीजेचा वापर होत असला तरी इतर वेळी मात्र या गाडीमुळे तुम्हाला वीजेची बचतही करता येणार आहे. कारण या गाडीला जोडुन तुम्ही 2 ट्युब, बल्ब्लस, कॉम्प्युटर,फॅन अशा अनेक गोष्टी वापरू शकता. एकदा पूर्ण चार्ज झालेल्या गाडीवर दोन दिवस या वस्तू आरामात चालु शकतात.त्यामुळे लोडशेडिंग असणार्‍या ठिकाणीही ही गाडी अगदी मस्त ऑप्शन ठरणार आहे. ही गाडी बनवायला पठाण यांना खर्च आला तो तब्बल 70 हजार रुपये पण आता मात्र सामान्यांसाठी ही गाडी कमी पैशांमध्ये उपलब्ध करुन द्यायची या दोघांची इच्छा आहे. त्यामुळे आता पेट्रोलवाढीची काळजी करण्याची गरज नाही. ऑप्शन आहे इको फ्रेंडली सोलर बाईकचा.

आईबीएन लोकमत | Updated On: May 28, 2011 01:07 PM IST

काका पुतण्याची कमाल सोलार बाईक धमाल

प्राची कुलकर्णी, पुणे

28 मे

पेट्रोलच्या किंमतीत दोन आठवड्यापूर्वी वाढ झाली आहे. आणि ती ही थोडी थोडकी नाही तर तब्बल 5 रुपयांनी. पण आपल्या यंगिस्तानचं बाईक शिवाय कसं जमणार. पण आता मात्र बजेटचं टेन्शन घ्यायची गरज नाही. कारण पुण्यातल्या काका पुतण्यांनी बनवली आहे चक्क सोलार बाईक.

ही बाईक चालवण्यासाठी लागणार आहे फक्त दोन ते तीन तासांचं चाजीर्ंग. गाडी पार्क करताना उन्हात उभी केली की झालंच काम. त्यातही तुम्ही उन्हातच गाडी चालवत असाल तर मग टेन्शनच घ्यायला नको. कारण गाडी चालवताना आपोआपच चाजीर्ंग होणार आहे. त्यामुळे गाडीसाठीचं महिन्याचं बजेट होणार आहे अगदी शुन्य रुपये. ही किमया केली आहे पुण्यातल्या पठाण काका पुतण्यांची.

पण जेव्हा ऊन नसेल तेव्हाचं काय ? तर ही गाडी इलेक्ट्रीसिटीवर चार्ज करण्याचाही ऑप्शन आहे. ऊन नसताना वीजेचा वापर होत असला तरी इतर वेळी मात्र या गाडीमुळे तुम्हाला वीजेची बचतही करता येणार आहे.

कारण या गाडीला जोडुन तुम्ही 2 ट्युब, बल्ब्लस, कॉम्प्युटर,फॅन अशा अनेक गोष्टी वापरू शकता. एकदा पूर्ण चार्ज झालेल्या गाडीवर दोन दिवस या वस्तू आरामात चालु शकतात.

त्यामुळे लोडशेडिंग असणार्‍या ठिकाणीही ही गाडी अगदी मस्त ऑप्शन ठरणार आहे. ही गाडी बनवायला पठाण यांना खर्च आला तो तब्बल 70 हजार रुपये पण आता मात्र सामान्यांसाठी ही गाडी कमी पैशांमध्ये उपलब्ध करुन द्यायची या दोघांची इच्छा आहे. त्यामुळे आता पेट्रोलवाढीची काळजी करण्याची गरज नाही. ऑप्शन आहे इको फ्रेंडली सोलर बाईकचा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 28, 2011 01:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close