S M L

जाहिरात क्षेत्रही मंदीच्या विळख्यात

11 नोव्हेंबर, मुंबईसागर मालवीय, श्वेता श्रीरामनअनेक कॉर्पोरेट उद्योग जाहिरातींसाठी मोठा खर्च करतात, पण वरुन चकाचक दिसणार्‍या या जाहिरात विश्वालाही मंदीचा फटका बसतोय. अंदाजे 19 हजार कोटींच्या या इंडस्ट्रीलाही अडचणी जाणवतायत. जाहिरातदारांचं नुकसान हल्ली वाढलंय कारण सर्वच कंपन्यांनी जाहिरातींच्या खर्चातही कॉस्टकटिंग सुरू केलं आहे. त्यामुळेच मंदीतून बाहेर पडण्यासाठी जाहिरात उद्योगाचे प्रयत्न सुरु आहेत.' जाहिरातींवर कंपन्यांनी खर्च कमी करणं सुरू केलंय हे खरंय, पण त्यात काही आमचे मोठे क्लाएंट असणारी सेक्टर्स नाहीयेत,उदाहरणार्थ फायनान्शिअल सेक्टरकडून आमचं उत्पन्न फक्त सहा टक्के आहे,पण त्याचऐवजी एफएमसीजी सेक्टरकडून मात्र चांगलं उत्पन्न मिळतं. ' अशी माहिती मॅडिसन वर्ल्डचे अध्यक्ष सॅम बलसारा यांनी दिली.पुढल्या वर्षात जाहिरात क्षेत्राचा विकास 10 ते 12 टक्क्‌यांच्या प्रमाणात होईल असा अ‍ॅड एजन्सीजचा अंदाज आहे, अर्थातच मागील काही वर्षातली प्रगती बघता विकासाचा हा वेग कमीच आहे. कॉस्ट कटिंगसाठी अ‍ॅड एजन्सीजनीही त्यांचं बजेट कमी केलं आहे. एकूणच जागतिक मंदीच्या तडाख्यातून हे ग्लॅमरस क्षेत्रही सुटलं नसल्याचं या निमित्तानं स्पष्ट झालंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 11, 2008 01:40 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 11, 2008 01:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close