S M L

आयपीएलमध्ये चेन्नईच 'सुपर किंग्ज'

28 मेआयपीएलमध्ये चेन्नई टीमने इतिहास रचला आहे. सलग दुसर्‍यांदा चॅम्पियनशिप जिंकण्याची किमया टीमने केली आहे. फायनलमध्ये बंगलोरचा सहज पराभव करत त्यांनी विजेतेपद पटकावलं. टॉसवरही चेन्नईचा कॅप्टन महेंद्रसिंग धोणीचं वर्चस्व होतं. टॉस जिंकून त्याने बॅटिंग घेतली. आणि मैदानावर आज गेल ऐवजी मुरली विजय नावाचं वादळ घोंघावलं. त्याच्या जोरावर 205 रनचा स्कोअर चेन्नईने उभा केला. माईक हसीच्या साथीने त्याने चेन्नईला 159 रनची ओपनिंग करुन दिली. हसीने 63 रन केले. तर स्वत: मुरलीची सेंच्युरी पाच रननी हुकली. तो आऊट झाला तरी चेन्नईसाठी दोनशे रनचा पल्ला सहज होता. महेंद्रसिंग धोणीने 13 बॉलमध्ये 22 रन करत स्कोअर 200 पार नेला. बंगलोरच्या बॉलर्सची आज धुलाई झाली तर बॅट्समनचा फडशा पडला. ख्रिस गेल पहिल्याच ओव्हरमध्ये गेल्यावर बॅटिंगमधली हवाच गेली. इतर बॅट्समन हजेरी लावून परतले. विराट कोहलीने 35 रन केले. आणि शेवटी सौरव तिवारीने बंगलोरची इनिंग थोडीफार लांबवली. पण अखेर 20 ओव्हरमध्ये बंगलोर टीम 147 रन करु शकली. आणि चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब झालं.

आईबीएन लोकमत | Updated On: May 28, 2011 06:04 PM IST

आयपीएलमध्ये चेन्नईच 'सुपर किंग्ज'

28 मे

आयपीएलमध्ये चेन्नई टीमने इतिहास रचला आहे. सलग दुसर्‍यांदा चॅम्पियनशिप जिंकण्याची किमया टीमने केली आहे. फायनलमध्ये बंगलोरचा सहज पराभव करत त्यांनी विजेतेपद पटकावलं. टॉसवरही चेन्नईचा कॅप्टन महेंद्रसिंग धोणीचं वर्चस्व होतं.

टॉस जिंकून त्याने बॅटिंग घेतली. आणि मैदानावर आज गेल ऐवजी मुरली विजय नावाचं वादळ घोंघावलं. त्याच्या जोरावर 205 रनचा स्कोअर चेन्नईने उभा केला.

माईक हसीच्या साथीने त्याने चेन्नईला 159 रनची ओपनिंग करुन दिली. हसीने 63 रन केले. तर स्वत: मुरलीची सेंच्युरी पाच रननी हुकली. तो आऊट झाला तरी चेन्नईसाठी दोनशे रनचा पल्ला सहज होता. महेंद्रसिंग धोणीने 13 बॉलमध्ये 22 रन करत स्कोअर 200 पार नेला. बंगलोरच्या बॉलर्सची आज धुलाई झाली तर बॅट्समनचा फडशा पडला.

ख्रिस गेल पहिल्याच ओव्हरमध्ये गेल्यावर बॅटिंगमधली हवाच गेली. इतर बॅट्समन हजेरी लावून परतले. विराट कोहलीने 35 रन केले. आणि शेवटी सौरव तिवारीने बंगलोरची इनिंग थोडीफार लांबवली. पण अखेर 20 ओव्हरमध्ये बंगलोर टीम 147 रन करु शकली. आणि चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब झालं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 28, 2011 06:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close