S M L

दिल्लीत बॉम्बसारखी वस्तू सापडली

30 मेदिल्लीत गार्गी कॉलेज परिसरात आज संशयास्पद वस्तू सापडली. त्यात वायरी, पेन्सिल सेल आणि पावडर होती. बॉम्ब शोधक पथक लगेच घटनेच्या ठिकाणी दाखल झालं. मात्र ही स्फोटक वस्तू नसल्याचे पोलिसांनी सांगितलं. फटाके तयार करण्यासाठी वापरली जाणारी ही पावडर असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तरीसुद्धा केंद्रीय गृहमंत्रालयाने ही बाब गंभीरतेनं घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. आठवड्याभरात दिल्लीत दुसर्‍यांदा बॉम्बसारखी वस्तू सापडण्याचा प्रकार चिंताजनक असल्याचं गृहमंत्रालयाचं म्हणणं आहे. त्यामुळे पोलिसांनी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या हा परिसर रिकामा करण्यात आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 30, 2011 09:48 AM IST

दिल्लीत बॉम्बसारखी वस्तू सापडली

30 मे

दिल्लीत गार्गी कॉलेज परिसरात आज संशयास्पद वस्तू सापडली. त्यात वायरी, पेन्सिल सेल आणि पावडर होती. बॉम्ब शोधक पथक लगेच घटनेच्या ठिकाणी दाखल झालं. मात्र ही स्फोटक वस्तू नसल्याचे पोलिसांनी सांगितलं.

फटाके तयार करण्यासाठी वापरली जाणारी ही पावडर असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तरीसुद्धा केंद्रीय गृहमंत्रालयाने ही बाब गंभीरतेनं घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आठवड्याभरात दिल्लीत दुसर्‍यांदा बॉम्बसारखी वस्तू सापडण्याचा प्रकार चिंताजनक असल्याचं गृहमंत्रालयाचं म्हणणं आहे. त्यामुळे पोलिसांनी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या हा परिसर रिकामा करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 30, 2011 09:48 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close