S M L

पुण्यात फिरा आता रेंटने बाईक घेऊन..!

30 मेसार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उडालेला बोजवारा न परवडणारे रिक्षाचे दर या सगळ्यांपासून पुणेकरांना आता सुटका मिळणार आहे. दुचाकीचं शहर म्हणून ओळखलं जाणार्‍या पुणेकरांना या कटकटीतून सुटकेसाठी पर्याय असणार आहे तो सुद्धा दुचाकींचाच. गोव्याच्या धर्तीवर बाईक ऑन रेंट योजना पुण्यामध्येही सुरु करण्यात आली आहे. पुण्यातील स्वीच या कंपनीतर्फे सुरु करण्यात आलेल्या या सेवेचं काल उद्घाटन झालं. कोथरुड मधल्या कर्वे पुतळ्याजवळ या सिरीज मधील पहीलं दुकान सुरु करण्यात आलं आहे. या पाठोपाठ आता संपूर्ण शहरात 400 सेंटर्स सुरु करण्यात येणार आहेत. यातली विशेष गोष्ट म्हणजे या सगळ्या बाईक्स या बॅटरीवर चालणार्‍या असल्यामुळे प्रदुषणही होणार नाही. यासाठी प्रत्येक मिनिटाला 1 रुपया मोजावा लागणार आहे. कुठल्याही सेंटर वरुन तुम्ही बाईक घेऊ शकता. आणि 'ज्या ठिकाणी जायचं आहे तिथे पोहोचलं की ती बाईक तिथल्या सेंटरवर ड्रॉप करायची' अशी ही योजना. याशिवाय महिन्याची मेंबरशीप घेण्याचीही योजना यामध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 30, 2011 10:57 AM IST

पुण्यात फिरा आता रेंटने बाईक घेऊन..!

30 मे

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उडालेला बोजवारा न परवडणारे रिक्षाचे दर या सगळ्यांपासून पुणेकरांना आता सुटका मिळणार आहे. दुचाकीचं शहर म्हणून ओळखलं जाणार्‍या पुणेकरांना या कटकटीतून सुटकेसाठी पर्याय असणार आहे तो सुद्धा दुचाकींचाच. गोव्याच्या धर्तीवर बाईक ऑन रेंट योजना पुण्यामध्येही सुरु करण्यात आली आहे.

पुण्यातील स्वीच या कंपनीतर्फे सुरु करण्यात आलेल्या या सेवेचं काल उद्घाटन झालं. कोथरुड मधल्या कर्वे पुतळ्याजवळ या सिरीज मधील पहीलं दुकान सुरु करण्यात आलं आहे.

या पाठोपाठ आता संपूर्ण शहरात 400 सेंटर्स सुरु करण्यात येणार आहेत. यातली विशेष गोष्ट म्हणजे या सगळ्या बाईक्स या बॅटरीवर चालणार्‍या असल्यामुळे प्रदुषणही होणार नाही. यासाठी प्रत्येक मिनिटाला 1 रुपया मोजावा लागणार आहे.

कुठल्याही सेंटर वरुन तुम्ही बाईक घेऊ शकता. आणि 'ज्या ठिकाणी जायचं आहे तिथे पोहोचलं की ती बाईक तिथल्या सेंटरवर ड्रॉप करायची' अशी ही योजना. याशिवाय महिन्याची मेंबरशीप घेण्याचीही योजना यामध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 30, 2011 10:57 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close