S M L

ऐतिहासिक वास्तूंचा सिगरेटच्या पाकिटावर वापर ; कंपनीचा माघार

30 मेसोलापुरात आज शिवसेनेनं फोर स्क्वेअर या सिगरेट उत्पादक कंपनीच्या विरोधात जोरदार आंदोलन केलं. शिवसेनेनं फोरस्क्वेअरच्या पाकिटाची आणि पोस्टरची होळी केली. पाकिटावर कंपनीने महाराष्ट्रातील ऐतिहासिक वास्तू-स्थळाची छायाचित्रं छापल्याने या नव्या वादाला तोंड फुटलं आहे.अखेर लोकांचा विरोध लक्षात घेऊन उत्पादन बाजारातून परत घेणार असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. राज्यातील आठ प्रमुख शहरातील महत्त्वाच्या स्मृती स्थळांचा समावेश असल्याने सोलापुरात शिवसेनेनं फोरस्क्वेअरच्या पाकिटाची आणि पोस्टरची होळी केली.कोल्हापूरचे लक्ष्मी मंदिर आणि सोलापूरचे चार हुतात्मे यासारख्या लोकश्रद्धेच्या विषयांना प्रसिद्धीसाठी वापरलं जात असल्याने सोलापूरकरांमध्ये कमालीचा असंतोष पसरला आहे.दुसरीकडे कंपनीने हा एक लोकांना उत्पादनाकडे आकर्षित करण्यासाठी केलेला प्रयत्न असल्याचं म्हटलंय. लोकांचा विरोध लक्षात घेऊन उत्पादन बाजारातून परत घेण्यात असल्याचा खुलासाही केला.

आईबीएन लोकमत | Updated On: May 30, 2011 12:49 PM IST

ऐतिहासिक वास्तूंचा सिगरेटच्या पाकिटावर वापर ; कंपनीचा माघार

30 मे

सोलापुरात आज शिवसेनेनं फोर स्क्वेअर या सिगरेट उत्पादक कंपनीच्या विरोधात जोरदार आंदोलन केलं. शिवसेनेनं फोरस्क्वेअरच्या पाकिटाची आणि पोस्टरची होळी केली. पाकिटावर कंपनीने महाराष्ट्रातील ऐतिहासिक वास्तू-स्थळाची छायाचित्रं छापल्याने या नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

अखेर लोकांचा विरोध लक्षात घेऊन उत्पादन बाजारातून परत घेणार असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. राज्यातील आठ प्रमुख शहरातील महत्त्वाच्या स्मृती स्थळांचा समावेश असल्याने सोलापुरात शिवसेनेनं फोरस्क्वेअरच्या पाकिटाची आणि पोस्टरची होळी केली.

कोल्हापूरचे लक्ष्मी मंदिर आणि सोलापूरचे चार हुतात्मे यासारख्या लोकश्रद्धेच्या विषयांना प्रसिद्धीसाठी वापरलं जात असल्याने सोलापूरकरांमध्ये कमालीचा असंतोष पसरला आहे.

दुसरीकडे कंपनीने हा एक लोकांना उत्पादनाकडे आकर्षित करण्यासाठी केलेला प्रयत्न असल्याचं म्हटलंय. लोकांचा विरोध लक्षात घेऊन उत्पादन बाजारातून परत घेण्यात असल्याचा खुलासाही केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 30, 2011 12:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close