S M L

शेतकर्‍यांनी केली भूसंपदान अधिकार्‍यांना बेदम मारहाण

30 मेऔद्योगिक वसाहतीसाठी जमीन संपादन करण्याच्या विरोधात सांगली जिल्ह्यातील वाघवाडी इथं शेतकर्‍यांनी आंदोलन केलं. एकीकडे जमिनीची मोजणी आणि त्याच वेळी आंदोलकांची धरपकड यामुळे संतापलेल्या शेतकर्‍यांनी दोन भूसंपदान अधिकार्‍यांना बेदम मारहाण केली. आणि मोजणीचं काम बंद पाडलं. पुणे बेंगलोर हायवेजवळ बाघबाडी जांभूळवाडी परिसरात सरकारने नवी एम.आय.डी.सी. मंजूर केली. त्यासाठी पिकाऊ जमीन संपादित करु नये अशी मागणी या भागातील शेतकरी करत आहेत. तरीही जमीन मोजणीचं काम पोलिसांच्या मदतीनं सुरु करण्यात आलंय. त्या विरोधात शेतकर्‍यांनी निदर्शन केली. खासदार राजू शेट्टी आणि काँग्रेसचे रणधीर नाईक यांनी शेतकर्‍यांचे नेतृत्व केलं. जवळपास शंभर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने जमाव खवळला. सध्या या गावात तणाव असून बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 30, 2011 05:08 PM IST

शेतकर्‍यांनी केली भूसंपदान अधिकार्‍यांना बेदम मारहाण

30 मे

औद्योगिक वसाहतीसाठी जमीन संपादन करण्याच्या विरोधात सांगली जिल्ह्यातील वाघवाडी इथं शेतकर्‍यांनी आंदोलन केलं. एकीकडे जमिनीची मोजणी आणि त्याच वेळी आंदोलकांची धरपकड यामुळे संतापलेल्या शेतकर्‍यांनी दोन भूसंपदान अधिकार्‍यांना बेदम मारहाण केली. आणि मोजणीचं काम बंद पाडलं.

पुणे बेंगलोर हायवेजवळ बाघबाडी जांभूळवाडी परिसरात सरकारने नवी एम.आय.डी.सी. मंजूर केली. त्यासाठी पिकाऊ जमीन संपादित करु नये अशी मागणी या भागातील शेतकरी करत आहेत.

तरीही जमीन मोजणीचं काम पोलिसांच्या मदतीनं सुरु करण्यात आलंय. त्या विरोधात शेतकर्‍यांनी निदर्शन केली. खासदार राजू शेट्टी आणि काँग्रेसचे रणधीर नाईक यांनी शेतकर्‍यांचे नेतृत्व केलं. जवळपास शंभर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने जमाव खवळला. सध्या या गावात तणाव असून बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 30, 2011 05:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close