S M L

बोटींना सुरक्षित ठेवण्यासाठी मच्छिमारांची लगबग सुरू

30 मेमान्सूनचं आगमन होणार असल्याने कोकणातील मच्छिमारांनी आपला मासेमारी हंगाम आवरता घेतला आहे. केरळमध्ये मान्सून वेळेआधीचं दाखल झाल्याने समुद्रातील वातावरण मासेमारीसाठी अनुकूल नसल्याचे मच्छिमारांनी म्हटलं आहे. आपापल्या बोटींना सुरक्षित ठेवण्यासाठी मच्छिमारांची आता लगबग सुरु झाली आहे. 10 जून नंतर मासेमारीला बंदी घालण्यात आली. पण गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी मासे कमी मिळत आहे. तसेच बोटी शाकारण्यासाठी म्हणजे झाकण्यासाठी जागेची अडचण निर्माण झाल्याने मच्छिमारांनी 15 दिवस अगोदरच बोटी किनार्‍याला घ्यायला सुरुवात केली आहे. बोटींना रंगरंगोटी करणे, डागडुजी करणे अशी कामंही आता सुरु करण्यात आली आहेत. रत्नागिरीच्या मच्छिमार बोटींना नांगरुन ठेवण्यासाठी पुरेश्या प्रमाणात जेट्टीची सुविधा नाही. त्यामुळे काही बोटी तशाचं किनार्‍यावर ओढून ठेवाव्या लागतात. पण, पुढच्या वर्षी ही जागा सागरी सुरक्षेसाठी नेव्हीच्या ताब्यात जाणार आहे. त्यामुळे पर्यायी जागा उपलब्ध करुन मिळावी अशी मागणी मच्छिमारांनी केली.

आईबीएन लोकमत | Updated On: May 30, 2011 02:15 PM IST

बोटींना सुरक्षित ठेवण्यासाठी मच्छिमारांची लगबग सुरू

30 मे

मान्सूनचं आगमन होणार असल्याने कोकणातील मच्छिमारांनी आपला मासेमारी हंगाम आवरता घेतला आहे. केरळमध्ये मान्सून वेळेआधीचं दाखल झाल्याने समुद्रातील वातावरण मासेमारीसाठी अनुकूल नसल्याचे मच्छिमारांनी म्हटलं आहे.

आपापल्या बोटींना सुरक्षित ठेवण्यासाठी मच्छिमारांची आता लगबग सुरु झाली आहे. 10 जून नंतर मासेमारीला बंदी घालण्यात आली. पण गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी मासे कमी मिळत आहे.

तसेच बोटी शाकारण्यासाठी म्हणजे झाकण्यासाठी जागेची अडचण निर्माण झाल्याने मच्छिमारांनी 15 दिवस अगोदरच बोटी किनार्‍याला घ्यायला सुरुवात केली आहे. बोटींना रंगरंगोटी करणे, डागडुजी करणे अशी कामंही आता सुरु करण्यात आली आहेत.

रत्नागिरीच्या मच्छिमार बोटींना नांगरुन ठेवण्यासाठी पुरेश्या प्रमाणात जेट्टीची सुविधा नाही. त्यामुळे काही बोटी तशाचं किनार्‍यावर ओढून ठेवाव्या लागतात.

पण, पुढच्या वर्षी ही जागा सागरी सुरक्षेसाठी नेव्हीच्या ताब्यात जाणार आहे. त्यामुळे पर्यायी जागा उपलब्ध करुन मिळावी अशी मागणी मच्छिमारांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 30, 2011 02:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close