S M L

गिरगाव चौपाटीवर शहीद ओंबाळे यांचे स्मारक

31 मे26/11च्या मुंबई दहशतवादी हल्यामध्ये शहीद झालेले तुकाराम ओंबाळे यांचं स्मारक उभारण्याच्या कामाला स्थायी समितीनं मंजुरी दिली आहे. गिरगाव चौपाटीजवळ ओंबाळेचा हा अर्धकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. हल्ला करणार्‍या अतिरेक्यांपैकी एकमेव जिवंत सापडलेला अतिरेकी अजमल कसाब याला पकडून देण्यात ओंबाळेचं महत्त्वाचं योगदान आहे. त्यामुळे त्यांचं स्मारक उभारण्याची मागणी होत होती. पण 26/11च्या हल्ल्याला दोन वर्ष होऊन गेलं तरी स्मारकाला मंजुरी मिळत नव्हती. महापालिका विरोधी बाकांवर असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीनं याबद्दल सत्ताधार्‍यांवर टीका केली होती. अखेर आज या कामाला स्थायी समितीनं हिरवा झेंडा दाखवला.

आईबीएन लोकमत | Updated On: May 31, 2011 02:08 PM IST

गिरगाव चौपाटीवर शहीद ओंबाळे यांचे स्मारक

31 मे

26/11च्या मुंबई दहशतवादी हल्यामध्ये शहीद झालेले तुकाराम ओंबाळे यांचं स्मारक उभारण्याच्या कामाला स्थायी समितीनं मंजुरी दिली आहे. गिरगाव चौपाटीजवळ ओंबाळेचा हा अर्धकृती पुतळा उभारण्यात येणार आहे.

हल्ला करणार्‍या अतिरेक्यांपैकी एकमेव जिवंत सापडलेला अतिरेकी अजमल कसाब याला पकडून देण्यात ओंबाळेचं महत्त्वाचं योगदान आहे. त्यामुळे त्यांचं स्मारक उभारण्याची मागणी होत होती.

पण 26/11च्या हल्ल्याला दोन वर्ष होऊन गेलं तरी स्मारकाला मंजुरी मिळत नव्हती. महापालिका विरोधी बाकांवर असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीनं याबद्दल सत्ताधार्‍यांवर टीका केली होती. अखेर आज या कामाला स्थायी समितीनं हिरवा झेंडा दाखवला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 31, 2011 02:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close