S M L

मनसेनं आपल्या झेंड्यातून निळा रंग काढून टाकावा - आठवले

31 मेदादर स्टेशनच्या नामांतरावरून सध्या जोरदार वाद सुरु आहेत. शिवशक्ती भीमशक्तीमध्ये फूट पाडण्यासाठीच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीनं दादर स्टेशनचं नामांतर चैत्यभूमी करावे अशी मागणी केल्याचा आरोप आरपीआय नेते रामदास आठवले यांनी केला आहे. दादर स्टेशनचं नामांतर चैत्यभूमी असं न करता त्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं असं ही आठवले म्हणाले आहे. नामांतराला विरोध केल्यामुळे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही त्यांनी फटकारलंय. राज ठाकरेंना बाबासाहेबांबद्दल प्रेम नसेल तर त्यांनी मनसेच्या झेंड्यातून निळा रंग काढून टाकावा असं आठवले यांनी म्हटलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 31, 2011 04:19 PM IST

मनसेनं आपल्या झेंड्यातून निळा रंग काढून टाकावा - आठवले

31 मे

दादर स्टेशनच्या नामांतरावरून सध्या जोरदार वाद सुरु आहेत. शिवशक्ती भीमशक्तीमध्ये फूट पाडण्यासाठीच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीनं दादर स्टेशनचं नामांतर चैत्यभूमी करावे अशी मागणी केल्याचा आरोप आरपीआय नेते रामदास आठवले यांनी केला आहे.

दादर स्टेशनचं नामांतर चैत्यभूमी असं न करता त्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं असं ही आठवले म्हणाले आहे. नामांतराला विरोध केल्यामुळे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही त्यांनी फटकारलंय. राज ठाकरेंना बाबासाहेबांबद्दल प्रेम नसेल तर त्यांनी मनसेच्या झेंड्यातून निळा रंग काढून टाकावा असं आठवले यांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 31, 2011 04:19 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close