S M L

नामांतराची मागणी पवार कुटुंबाचे घोटाळे लपवण्यासाठीच -राज ठाकरे

01 जूनदादर स्टेशनच्या नामांतराची मागणी हा राष्ट्रवादी काँग्रेसचा डाव असल्याचा आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. वेगवेगळ्या घोटाळ्यांमध्ये पवार कुटुंबीयांचं नाव पुढे आलं आहे. त्यातून दुसरीकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने दादर स्टेशनच्या नामांतराचा मुद्दा पुढे केला आहे. असं राज ठाकरे म्हणालेत. राज ठाकरे यांनी मुंबईत आज पत्रकार परिषद घेतली. यामध्ये पवार कुटुंबीयांसह रामदास आठवलेंचाही राज ठाकरे यांनी समाचार घेतला. दादर स्टेशनचं नाव चैत्यभूमी नाही तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर असं करा असं रामदास आठवले म्हणाले होते. त्यावर बाबासाहेबांच्या नावाने घाणेरडं राजकारण मला करायचं नाही. हा व्यक्तीचा प्रश्न नसून प्रवृत्तीचा प्रश्न आहे असंही राज ठाकरे म्हणाले. अजित पवारांनी बाळासाहेबांवर टीका करण्याचे कारण नाही. त्यांची ती योग्यता नाही असा टोलाही त्यांनी अजित पवारांना लगावला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 1, 2011 05:52 PM IST

नामांतराची मागणी पवार कुटुंबाचे घोटाळे लपवण्यासाठीच -राज ठाकरे

01 जून

दादर स्टेशनच्या नामांतराची मागणी हा राष्ट्रवादी काँग्रेसचा डाव असल्याचा आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. वेगवेगळ्या घोटाळ्यांमध्ये पवार कुटुंबीयांचं नाव पुढे आलं आहे. त्यातून दुसरीकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने दादर स्टेशनच्या नामांतराचा मुद्दा पुढे केला आहे. असं राज ठाकरे म्हणालेत. राज ठाकरे यांनी मुंबईत आज पत्रकार परिषद घेतली.

यामध्ये पवार कुटुंबीयांसह रामदास आठवलेंचाही राज ठाकरे यांनी समाचार घेतला. दादर स्टेशनचं नाव चैत्यभूमी नाही तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर असं करा असं रामदास आठवले म्हणाले होते. त्यावर बाबासाहेबांच्या नावाने घाणेरडं राजकारण मला करायचं नाही. हा व्यक्तीचा प्रश्न नसून प्रवृत्तीचा प्रश्न आहे असंही राज ठाकरे म्हणाले. अजित पवारांनी बाळासाहेबांवर टीका करण्याचे कारण नाही. त्यांची ती योग्यता नाही असा टोलाही त्यांनी अजित पवारांना लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 1, 2011 05:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close