S M L

अल कायदा आणि नेव्हीच्या संबंधावर लिहणार्‍या पाक पत्रकाराची हत्या

01 जूनपाकिस्तानमध्ये सय्यद सलीम शाहजाद या पत्रकाराची हत्या झाल्याने जगभरात खळबळ उडाली. अल कायदाने कराचीतल्या पाकिस्तानी नौदलाच्या तळावर हल्ला केल्यानंतर त्यानं एशिया टाईम्स ऑनलाईमध्ये एक लेख लिहिला होता. आणि अतिरेक्यांची सुटका करण्याची डील अयशस्वी झाल्यामुळेच अल कायदाने हा हल्ला केल्याचा दावा केला होता. या लेखानंतर तो गायब झाला होता. त्याचा मृतदेह काल सापडला. त्याच्या हत्येविरोधात पाकिस्तान आणि जगभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्यात त्याची हत्या का झाली असावी याचे वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहे.सय्यद सलीम शाहजाद या पाकिस्तानी पत्रकारावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पण शाहजाद याची हत्या का झाली याविषयी मात्र अनेक प्रश्न निर्माण झाले आहे.पाकिस्तानचे अंतर्गत सुरक्षा मंत्री रेहमान मलिक यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिलंय. आयएसआयनंच शाहजाद याची हत्या केल्याचा आरोप होतोय. पण शाहजाद याची हत्या वैयक्तिक हेव्यादाव्यातून झाली असण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. शाहजाद याच्या मित्रांना मात्र हे मान्य नाही.शाहजाद याची हत्या कशासाठी झाली असावी, याचे वेगवेगळे तर्कवितर्क केले जात आहे.- ओसामा बिन लादेनच्या पाकिस्तानतल्या सपोर्ट नेटवर्कचा गौप्यस्फोट करण्याच्या तयारीत शाहजाद होता, असं पत्रकारांचे म्हणणं आहे.- आयएसआय किंवा अल कायदाच्या इलियास काश्मिरी याला त्यानं कदाचित दुखावलं असावे- पाकिस्तानी नेव्हीतल्या अल कायदाच्या शिरकावाबद्दलचे तपशील उघड करून त्यानं अनेकांना अडचणीत आणलं - इलियास काश्मिरीच्या भर्ती शिबिरांची बातमी त्यानं दिलीशाहजाद यानं उघड केलेल्या एका ई-मेलमुळे खळबळ माजली. आयएसआयशी झालेल्या बैठकीबाबत त्यानं या ई-मेलमध्ये लिहिलं होतं. आयएसआयकडून आपल्याला थेट धोका असल्याचा दावा त्यानं केला होता. जर आपली हत्या झाली तर हा ई-मेल प्रसिद्ध करावा, अशी त्याची इच्छा होती. आयएसआयच्या मीडिया विंगचे डीजी रिअर ऍडमिरल अदनान नाझीर यांचा हा ई-मेल आहे त्यात लिहिलंय, 'मी तुला निश्चितच मदत करेन. आम्ही नुकतंच एका अतिरेक्याला अटक केली. आणि त्याच्याकडून खूप माहिती डायर्‍या आणि इतर वस्तू जप्त मिळवल्यात. त्या अतिरेक्याकडे हीट लिस्ट होती. त्यात जर तुझं नाव असेल तर मी तुला निश्चितच सांगेन.'अखेर जबर मारहाण आणि अतोनात छळ करून हत्या केलेला शाहजाद याचा मृतदेह सापडला आणि तो हीट लिस्टवर होता. हे सिद्ध झालं. त्याच्या मृत्युमुळे पाकिस्तानी लष्कर आणि अतिरेकी यांच्यातले संबंध ठळकपणे चव्हाट्यावर आलेत. शाहजादची हत्या का झाली?- ओसामाच्या पाकिस्तानतल्या सपोर्ट नेटवर्कचा गौप्यस्फोट करण्याच्या तयारीत शाहजाद होता, असं पत्रकारांचं म्हणणं - आयएसआय किंवा अल कायदाच्या इलियास काश्मिरीला त्यानं दुखावलं असावं- पाकिस्तानी नेव्हीतल्या अल कायदाच्या शिरकावाबद्दलचे तपशील उघड केले - इलियास काश्मिरीच्या भर्ती शिबिरांची बातमी त्यानं दिलीआयएसआयच्या मीडिया विंगचे डीजी रिअर ऍडमिरल अदनान नाझीर यांचा हा ई-मेल आहे. त्यात लिहिलंय, 'मी तुला निश्चितच मदत करेने. आम्ही नुकतंच एका अतिरेक्याला अटक केली. आणि त्याच्याकडून खूप माहिती डायर्‍या आणि इतर वस्तू जप्त मिळवल्यात. त्या अतिरेक्याकडे हीट लिस्ट होती. त्यात जर तुझं नाव असेल तर मी तुला निश्चितच सांगेन.' - आयएसआय अधिकारी

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 1, 2011 11:39 AM IST

अल कायदा आणि नेव्हीच्या संबंधावर लिहणार्‍या पाक पत्रकाराची हत्या

01 जून

पाकिस्तानमध्ये सय्यद सलीम शाहजाद या पत्रकाराची हत्या झाल्याने जगभरात खळबळ उडाली. अल कायदाने कराचीतल्या पाकिस्तानी नौदलाच्या तळावर हल्ला केल्यानंतर त्यानं एशिया टाईम्स ऑनलाईमध्ये एक लेख लिहिला होता. आणि अतिरेक्यांची सुटका करण्याची डील अयशस्वी झाल्यामुळेच अल कायदाने हा हल्ला केल्याचा दावा केला होता.

या लेखानंतर तो गायब झाला होता. त्याचा मृतदेह काल सापडला. त्याच्या हत्येविरोधात पाकिस्तान आणि जगभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्यात त्याची हत्या का झाली असावी याचे वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहे.सय्यद सलीम शाहजाद या पाकिस्तानी पत्रकारावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पण शाहजाद याची हत्या का झाली याविषयी मात्र अनेक प्रश्न निर्माण झाले आहे.

पाकिस्तानचे अंतर्गत सुरक्षा मंत्री रेहमान मलिक यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिलंय. आयएसआयनंच शाहजाद याची हत्या केल्याचा आरोप होतोय. पण शाहजाद याची हत्या वैयक्तिक हेव्यादाव्यातून झाली असण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. शाहजाद याच्या मित्रांना मात्र हे मान्य नाही.

शाहजाद याची हत्या कशासाठी झाली असावी, याचे वेगवेगळे तर्कवितर्क केले जात आहे.

- ओसामा बिन लादेनच्या पाकिस्तानतल्या सपोर्ट नेटवर्कचा गौप्यस्फोट करण्याच्या तयारीत शाहजाद होता, असं पत्रकारांचे म्हणणं आहे.- आयएसआय किंवा अल कायदाच्या इलियास काश्मिरी याला त्यानं कदाचित दुखावलं असावे- पाकिस्तानी नेव्हीतल्या अल कायदाच्या शिरकावाबद्दलचे तपशील उघड करून त्यानं अनेकांना अडचणीत आणलं - इलियास काश्मिरीच्या भर्ती शिबिरांची बातमी त्यानं दिली

शाहजाद यानं उघड केलेल्या एका ई-मेलमुळे खळबळ माजली. आयएसआयशी झालेल्या बैठकीबाबत त्यानं या ई-मेलमध्ये लिहिलं होतं. आयएसआयकडून आपल्याला थेट धोका असल्याचा दावा त्यानं केला होता. जर आपली हत्या झाली तर हा ई-मेल प्रसिद्ध करावा, अशी त्याची इच्छा होती.

आयएसआयच्या मीडिया विंगचे डीजी रिअर ऍडमिरल अदनान नाझीर यांचा हा ई-मेल आहे त्यात लिहिलंय, 'मी तुला निश्चितच मदत करेन. आम्ही नुकतंच एका अतिरेक्याला अटक केली. आणि त्याच्याकडून खूप माहिती डायर्‍या आणि इतर वस्तू जप्त मिळवल्यात. त्या अतिरेक्याकडे हीट लिस्ट होती. त्यात जर तुझं नाव असेल तर मी तुला निश्चितच सांगेन.'

अखेर जबर मारहाण आणि अतोनात छळ करून हत्या केलेला शाहजाद याचा मृतदेह सापडला आणि तो हीट लिस्टवर होता. हे सिद्ध झालं. त्याच्या मृत्युमुळे पाकिस्तानी लष्कर आणि अतिरेकी यांच्यातले संबंध ठळकपणे चव्हाट्यावर आलेत.

शाहजादची हत्या का झाली?

- ओसामाच्या पाकिस्तानतल्या सपोर्ट नेटवर्कचा गौप्यस्फोट करण्याच्या तयारीत शाहजाद होता, असं पत्रकारांचं म्हणणं - आयएसआय किंवा अल कायदाच्या इलियास काश्मिरीला त्यानं दुखावलं असावं- पाकिस्तानी नेव्हीतल्या अल कायदाच्या शिरकावाबद्दलचे तपशील उघड केले - इलियास काश्मिरीच्या भर्ती शिबिरांची बातमी त्यानं दिलीआयएसआयच्या मीडिया विंगचे डीजी रिअर ऍडमिरल अदनान नाझीर यांचा हा ई-मेल आहे. त्यात लिहिलंय, 'मी तुला निश्चितच मदत करेने. आम्ही नुकतंच एका अतिरेक्याला अटक केली. आणि त्याच्याकडून खूप माहिती डायर्‍या आणि इतर वस्तू जप्त मिळवल्यात. त्या अतिरेक्याकडे हीट लिस्ट होती. त्यात जर तुझं नाव असेल तर मी तुला निश्चितच सांगेन.' - आयएसआय अधिकारी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 1, 2011 11:39 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close