S M L

पुण्यात पावसाळ्यामध्ये 200 नाले प्रकट होता !

01 जूनपुण्यामधील नाले आणि त्यांची अतिक्रमण यांचा प्रश्न सद्या गाजतोय. पावसाळ्यात दोनशे नाले प्रकट होत असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. त्यामुळे नेमके नाले आहेत तरी किती आणि किती ठिकाणी त्यावर अतिक्रमण झालंय याचा सर्व्हे करण्यासाठी नागरिकच पुढे आले आहेत. पुण्यामध्ये आता जलबिरादरी संस्थेतर्फे सर्व्हे करण्यात येणार आहे. जलबिरादरी संस्थेच्या सुनील जोशी यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली. यासाठी नागरिकांकडुन त्यांच्या परिसरातल्या नाल्यांची माहिती मागवण्यात आली आहे. सध्या असणारे नाले तसेच जुने नाल्यांचे प्रवाह अशी माहिती गोळा केली जाणार आहे. त्याबरोबरच गोळा झालेल्या माहितीच्या आधारे नकाशा तयार करण्यात येणार असून त्यावर ही माहिती दिली जाणार आहे. फक्त पावसाळ्यात नाले प्रकट होत असल्यामुळे त्यांची नोंद झालेली नाही. आणि म्हणून यातल्या अनेक नाल्यांवर बांधकामांना परवानगी देण्यात आली असा महापालिकेचा दावा आहे. मात्र एकही नाला असा अचानक प्रकट होत नाही. सगळे नाले हे त्यांच्या नैसर्गिक प्रवाहावरुनच वाहत असतात असं म्हणत महापालिकेचा दावा जलबिरादरीचने खोडुन काढला आहे. त्यामुळेच नेमके किती नाले आहेत याची नेमकी नोंद व्हावी म्हणूनच हा सर्व्हे करण्यात येणार असल्याचं जलबिरादरीचे संघटक सुनील जोशी यांनी सांगितलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 1, 2011 04:42 PM IST

पुण्यात पावसाळ्यामध्ये 200 नाले प्रकट होता !

01 जून

पुण्यामधील नाले आणि त्यांची अतिक्रमण यांचा प्रश्न सद्या गाजतोय. पावसाळ्यात दोनशे नाले प्रकट होत असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. त्यामुळे नेमके नाले आहेत तरी किती आणि किती ठिकाणी त्यावर अतिक्रमण झालंय याचा सर्व्हे करण्यासाठी नागरिकच पुढे आले आहेत.

पुण्यामध्ये आता जलबिरादरी संस्थेतर्फे सर्व्हे करण्यात येणार आहे. जलबिरादरी संस्थेच्या सुनील जोशी यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली. यासाठी नागरिकांकडुन त्यांच्या परिसरातल्या नाल्यांची माहिती मागवण्यात आली आहे. सध्या असणारे नाले तसेच जुने नाल्यांचे प्रवाह अशी माहिती गोळा केली जाणार आहे.

त्याबरोबरच गोळा झालेल्या माहितीच्या आधारे नकाशा तयार करण्यात येणार असून त्यावर ही माहिती दिली जाणार आहे. फक्त पावसाळ्यात नाले प्रकट होत असल्यामुळे त्यांची नोंद झालेली नाही. आणि म्हणून यातल्या अनेक नाल्यांवर बांधकामांना परवानगी देण्यात आली असा महापालिकेचा दावा आहे. मात्र एकही नाला असा अचानक प्रकट होत नाही.

सगळे नाले हे त्यांच्या नैसर्गिक प्रवाहावरुनच वाहत असतात असं म्हणत महापालिकेचा दावा जलबिरादरीचने खोडुन काढला आहे. त्यामुळेच नेमके किती नाले आहेत याची नेमकी नोंद व्हावी म्हणूनच हा सर्व्हे करण्यात येणार असल्याचं जलबिरादरीचे संघटक सुनील जोशी यांनी सांगितलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 1, 2011 04:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close