S M L

मुख्यमंत्र्यांच्या काही निर्णयामुळे मंत्रिमंडळात अस्वस्थता - जयंत पाटील

02 जूनमुख्यमंत्र्यांनी काही काळापासून सरकारच्याच अगोदरच्या निर्णयाची चौकशी करण्याचा सपाटा लावला आहे. यामुळे मंत्रिमंडळामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनीही हे अप्रत्यक्षपणे बोलून दाखवलं आहे. पाटील यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना मुख्यमंत्र्यांचे नाव न घेता त्यांना टोला हाणला आहे. प्रकल्प सुरू झाल्यानंतर आंदोलनं झाली तरी सरकारने आपल्या निर्णयापासून हटू नये असं आपलं वैयक्तिक मत असल्याचे पाटील यांनी सांगितलं आहे. नुकत्याच मेधा पाटकर यांच्या उपोषणानंतर मुंबईतल्या 16 एसआरए प्रोजेक्ट्सची चौकशी करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला होता. या निर्णयाचे पडसाद कॅबिनेट मिटिंगमध्ये सुद्धा उमटले. बैठकीत नारायण राणे आणि छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली होती. तीच खदखद आज जयंत पाटील यांनीही व्यक्त केल्याचं म्हटलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 2, 2011 12:12 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या काही निर्णयामुळे मंत्रिमंडळात अस्वस्थता - जयंत पाटील

02 जून

मुख्यमंत्र्यांनी काही काळापासून सरकारच्याच अगोदरच्या निर्णयाची चौकशी करण्याचा सपाटा लावला आहे. यामुळे मंत्रिमंडळामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनीही हे अप्रत्यक्षपणे बोलून दाखवलं आहे. पाटील यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना मुख्यमंत्र्यांचे नाव न घेता त्यांना टोला हाणला आहे.

प्रकल्प सुरू झाल्यानंतर आंदोलनं झाली तरी सरकारने आपल्या निर्णयापासून हटू नये असं आपलं वैयक्तिक मत असल्याचे पाटील यांनी सांगितलं आहे. नुकत्याच मेधा पाटकर यांच्या उपोषणानंतर मुंबईतल्या 16 एसआरए प्रोजेक्ट्सची चौकशी करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला होता.

या निर्णयाचे पडसाद कॅबिनेट मिटिंगमध्ये सुद्धा उमटले. बैठकीत नारायण राणे आणि छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली होती. तीच खदखद आज जयंत पाटील यांनीही व्यक्त केल्याचं म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 2, 2011 12:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close