S M L

कोट्यावधीच्या कॅटामाईनसह अभिजीत कोंडुसकरला अटक

02 जूनडीआरआयची म्हणजेच डिरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यु इंटेलिजन्सची राज्यात काही ठिकाणी महत्वाची कारवाई केली. मुंबईतील अंधेरी इथं कारवाई केली आहे. यामध्ये कुमूद ड्रग्जच्या मालकाला अटक करण्यात आली आहे. अभिजीत कोंडुसकर हे कुमुद ड्रग्ज आणि कोंडूसकर ट्रव्हल्सचे मालक आहेत. अभिजीत कोंडुसकरसह निलेश मेहता, जयंतीलाल कोठारी, संदीप अहिरे यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 1 हजार किलो कॅटामाईन जप्त केला आहे. या कॅटामाईनची किंमत काही कोटींच्या घरात आहे. तसेच कागल इथल्या पंचतारांकित औद्यागिक वसाहतीतल्या कोंडुसकर लॅबोरेटरीजवर अन्न आणि औषध प्रशासनाची धाड टाकली. या धाडीत 50 लाखाचं कॅटामाईन जप्त केलं आहे. मुंबईत 200 किलो, सांगलीत 700 किलो अशा एकूण 900 किलोचं कॅटामाईन ड्रग्ज पकडलं आहे. 'केटामाईन' म्हणजे काय ?केटामाईन हे औषध मानवी आणि पशुवैद्यकीय उपचारांसाठी वापरलं जातंहे औषध ऍनेस्थेशिया म्हणून भूल देण्यासाठी मुख्यत: वापरलं जातंडब्लूएचओ यादीत केटामाईन प्रमुख औषधांपैकी एक आहेहे औषध वापरताना अन्न आणि औषध प्रशासनाकडे नोंद करावी लागलंत्याचा वापर आणि त्याचा साठा याविषयीची प्रत्येक माहिती सरकारी यंत्रणांना देणं बंधनकारक असतं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 2, 2011 03:13 PM IST

कोट्यावधीच्या कॅटामाईनसह अभिजीत कोंडुसकरला अटक

02 जून

डीआरआयची म्हणजेच डिरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यु इंटेलिजन्सची राज्यात काही ठिकाणी महत्वाची कारवाई केली. मुंबईतील अंधेरी इथं कारवाई केली आहे. यामध्ये कुमूद ड्रग्जच्या मालकाला अटक करण्यात आली आहे.

अभिजीत कोंडुसकर हे कुमुद ड्रग्ज आणि कोंडूसकर ट्रव्हल्सचे मालक आहेत. अभिजीत कोंडुसकरसह निलेश मेहता, जयंतीलाल कोठारी, संदीप अहिरे यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 1 हजार किलो कॅटामाईन जप्त केला आहे. या कॅटामाईनची किंमत काही कोटींच्या घरात आहे.

तसेच कागल इथल्या पंचतारांकित औद्यागिक वसाहतीतल्या कोंडुसकर लॅबोरेटरीजवर अन्न आणि औषध प्रशासनाची धाड टाकली. या धाडीत 50 लाखाचं कॅटामाईन जप्त केलं आहे. मुंबईत 200 किलो, सांगलीत 700 किलो अशा एकूण 900 किलोचं कॅटामाईन ड्रग्ज पकडलं आहे.

'केटामाईन' म्हणजे काय ?

केटामाईन हे औषध मानवी आणि पशुवैद्यकीय उपचारांसाठी वापरलं जातंहे औषध ऍनेस्थेशिया म्हणून भूल देण्यासाठी मुख्यत: वापरलं जातंडब्लूएचओ यादीत केटामाईन प्रमुख औषधांपैकी एक आहेहे औषध वापरताना अन्न आणि औषध प्रशासनाकडे नोंद करावी लागलंत्याचा वापर आणि त्याचा साठा याविषयीची प्रत्येक माहिती सरकारी यंत्रणांना देणं बंधनकारक असतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 2, 2011 03:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close