S M L

गोळीबारनगरच्या रहिवाशांचे सरकारच्या निर्णया विरोधात आंदोलन

02 जूनसांताक्रूझ गोळीबार इथे सुरू असलेला एसआरए प्रकल्प आता वेगळ्याचं वळणावर येऊन पोहोचला आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी काही दिवसापूर्वी या ठिकाणी राबवण्यात येणार्‍या एसआरए प्रकल्पात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी उपोषण करून सरकारला चौकशी समिती नेमण्यास भाग पाडलं होतं. याला विरोध करत गोळीबार मधल्या काही रहिवाशांनी आज बांद्रा इथल्या एसआरएच्या कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चा दरम्यान मेधा पाटकरांच्या विरोधात घोषणाबाजी करत चौकशी समिती रद्द करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. मोर्चेकरांना एसआरएच्या कोणत्याही अधिकार्‍यांनी भेट न दिल्याने लोकांना कार्यालयामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. या मोर्चेकरांना पोलिसांनी पांगवण्याचा प्रयत्न केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 2, 2011 12:29 PM IST

गोळीबारनगरच्या रहिवाशांचे सरकारच्या निर्णया विरोधात आंदोलन

02 जून

सांताक्रूझ गोळीबार इथे सुरू असलेला एसआरए प्रकल्प आता वेगळ्याचं वळणावर येऊन पोहोचला आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी काही दिवसापूर्वी या ठिकाणी राबवण्यात येणार्‍या एसआरए प्रकल्पात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी उपोषण करून सरकारला चौकशी समिती नेमण्यास भाग पाडलं होतं.

याला विरोध करत गोळीबार मधल्या काही रहिवाशांनी आज बांद्रा इथल्या एसआरएच्या कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चा दरम्यान मेधा पाटकरांच्या विरोधात घोषणाबाजी करत चौकशी समिती रद्द करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. मोर्चेकरांना एसआरएच्या कोणत्याही अधिकार्‍यांनी भेट न दिल्याने लोकांना कार्यालयामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. या मोर्चेकरांना पोलिसांनी पांगवण्याचा प्रयत्न केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 2, 2011 12:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close