S M L

पुण्यात मुंडेगटाचे शक्ती प्रदर्शन ; अडवाणींची भेट घेणार

02 जूनपुण्याच्या भाजप शहराध्यक्षपदावरुन सुरु झालेला वाद शमण्याची काहीही चिन्ह दिसत नाही. येत्या 5 तारखेला मुंडेगटाचे नेते आणि कार्यकर्ते दिल्लीला जाऊन अडवाणींची भेट घेणार आहेत. पुण्यामध्ये आज झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपच्या योगेश गोगावलेंनी ही माहिती दिली.यावेळी आमदार माधुरी मिसाळ, अनिल शिरोळे,संदीप खर्डेकर उपस्थित होते. या दिल्ली दौर्‍याची माहिती देताना एक प्रकारे आज पुण्यामध्ये मुंडे गटाने शक्ती प्रदर्शनच केलं. शहराध्यक्ष विकास मठकरी निवडुन येताना त्यांना 25 मतं मिळाल्याचं सांगण्यात आलं होतं. पण आज 21 मतदारांना पत्रकारांसमोर हजर करत या सगळ्यांनी गोगावले यांना मतदान केला असल्याचा दावा करण्यात आला. त्याबरोबरच या पत्रकार परिषदेला उपस्थित न राहिलेल्या इतर 3 जणांनीही गोगावलेंना मतदान केल्याचा दावा गोगावले यांनी केला. एक प्रकारे हे त्यांनी केलेलं शक्तीप्रदर्शनच मानलं जातंय. या सगळ्या मतदारांना घेऊन दिल्लीला जाणार असल्याचे त्यांनी सांगितलं. वैंकय्या नायडु यांचा अहवाल जाहीर केला जावा. जो निर्णय असेल को आम्ही मान्य करु असंही गोगावले यांनी सांगितलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 2, 2011 05:09 PM IST

पुण्यात मुंडेगटाचे शक्ती प्रदर्शन ; अडवाणींची भेट घेणार

02 जून

पुण्याच्या भाजप शहराध्यक्षपदावरुन सुरु झालेला वाद शमण्याची काहीही चिन्ह दिसत नाही. येत्या 5 तारखेला मुंडेगटाचे नेते आणि कार्यकर्ते दिल्लीला जाऊन अडवाणींची भेट घेणार आहेत. पुण्यामध्ये आज झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपच्या योगेश गोगावलेंनी ही माहिती दिली.

यावेळी आमदार माधुरी मिसाळ, अनिल शिरोळे,संदीप खर्डेकर उपस्थित होते. या दिल्ली दौर्‍याची माहिती देताना एक प्रकारे आज पुण्यामध्ये मुंडे गटाने शक्ती प्रदर्शनच केलं. शहराध्यक्ष विकास मठकरी निवडुन येताना त्यांना 25 मतं मिळाल्याचं सांगण्यात आलं होतं.

पण आज 21 मतदारांना पत्रकारांसमोर हजर करत या सगळ्यांनी गोगावले यांना मतदान केला असल्याचा दावा करण्यात आला. त्याबरोबरच या पत्रकार परिषदेला उपस्थित न राहिलेल्या इतर 3 जणांनीही गोगावलेंना मतदान केल्याचा दावा गोगावले यांनी केला.

एक प्रकारे हे त्यांनी केलेलं शक्तीप्रदर्शनच मानलं जातंय. या सगळ्या मतदारांना घेऊन दिल्लीला जाणार असल्याचे त्यांनी सांगितलं. वैंकय्या नायडु यांचा अहवाल जाहीर केला जावा. जो निर्णय असेल को आम्ही मान्य करु असंही गोगावले यांनी सांगितलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 2, 2011 05:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close