S M L

भारतात आणखी हल्ले करण्याचा कट होता !

02 जूनभारतावर आणखी हल्ले करण्याचा आयएसआय आणि अल कायदाचा कट होता असा दावा पाकिस्तानी पत्रकार शाहजाद सलीमनं मृत्यूपूर्वी केला होता. मुंबई हल्ल्याच्या कटाबाबतचा तपशील त्यानं आपल्या एका पुस्तकात दिली आहे. अल कायदाच्या टार्गेटवर केवळ अमेरिकाच नव्हती तर भारतही होतं अशी धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.हत्या होण्यापूर्वी पाकिस्तानी पत्रकार सय्यद सलीम शाहजाद यानं सीएनएन-आयबीएनला मुलाखत दिली होती. त्यात मुंबई हल्ला अल कायदा पुरस्कृत होता असा दावा त्याने केला होता. त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे या हल्ल्याची रुपरेखा पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या स्पेशल सेलनं आखली होती.मुंबई हल्ल्याची तपशीलवार माहिती शाहजाद यानं आपल्या पुस्तकात दिली आहे. गेल्या महिन्यात हे पुस्तक प्रकाशित झालं. त्याचं नाव आहे 'बिन लादेन अँड बियाँड - इनसाईड द तालिबान आणि अल कायदा' त्यात त्यानं म्हटलं आहे.-आयएसआयच्या स्पेशल काश्मीर सेलनं पहिल्यांदा 26/11 हल्ल्याची रुपरेखा तयार केली होती- पण नंतर ती रद्द करण्यात आली - ही योजना पुढं नेण्याची आयएसआयच्या अधिकार्‍यांची इच्छा होती. - आयएसआयपुरस्कृत 313 अतिरेक्यांच्या ब्रिगेडचा प्रमुख इलियास काश्मिरीच्या हातात हल्ल्याची सूत्रं देण्याची योजना होती.- काश्मिरीनं याची जबाबदारी लष्कर-ए-तोयबाचा कमांडर आणि पाकिस्तानचा माजी लष्करी अधिकारी हारून आशिक याच्याकडे सोपवली. - हारूननं पाकिस्तानमधल्या शिबिरात यासाठीचं प्रशिक्षण आणि ड्राय रन्स घेतले. - अल कायदानं त्यासाठी थेट आर्थिक मदत केली.शाहजाद यानं पुस्तकात दिलेला तपशील डेव्हिड हेडलीनं अमेरिकन कोर्टात दिलेल्या साक्षीशी मिळताजुळता आहे. डेव्हिड हेडलीची शिकागो कोर्टातली साक्ष याच आठवड्यात संपली. आपल्या जीवाला धोका आहे याची कल्पना शाहजादलाही होती. पाकिस्तानी पत्रकार शाहजादचा हा आवाज कायमचा दाबण्यात आला. पण त्याच्या मृत्यूनंतरच खर्‍या अर्थानं त्या आवाजाची ताकद कळतेय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 2, 2011 05:50 PM IST

भारतात आणखी हल्ले करण्याचा कट होता !

02 जून

भारतावर आणखी हल्ले करण्याचा आयएसआय आणि अल कायदाचा कट होता असा दावा पाकिस्तानी पत्रकार शाहजाद सलीमनं मृत्यूपूर्वी केला होता. मुंबई हल्ल्याच्या कटाबाबतचा तपशील त्यानं आपल्या एका पुस्तकात दिली आहे.

अल कायदाच्या टार्गेटवर केवळ अमेरिकाच नव्हती तर भारतही होतं अशी धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.

हत्या होण्यापूर्वी पाकिस्तानी पत्रकार सय्यद सलीम शाहजाद यानं सीएनएन-आयबीएनला मुलाखत दिली होती. त्यात मुंबई हल्ला अल कायदा पुरस्कृत होता असा दावा त्याने केला होता. त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे या हल्ल्याची रुपरेखा पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या स्पेशल सेलनं आखली होती.

मुंबई हल्ल्याची तपशीलवार माहिती शाहजाद यानं आपल्या पुस्तकात दिली आहे. गेल्या महिन्यात हे पुस्तक प्रकाशित झालं. त्याचं नाव आहे 'बिन लादेन अँड बियाँड - इनसाईड द तालिबान आणि अल कायदा' त्यात त्यानं म्हटलं आहे.

-आयएसआयच्या स्पेशल काश्मीर सेलनं पहिल्यांदा 26/11 हल्ल्याची रुपरेखा तयार केली होती- पण नंतर ती रद्द करण्यात आली - ही योजना पुढं नेण्याची आयएसआयच्या अधिकार्‍यांची इच्छा होती. - आयएसआयपुरस्कृत 313 अतिरेक्यांच्या ब्रिगेडचा प्रमुख इलियास काश्मिरीच्या हातात हल्ल्याची सूत्रं देण्याची योजना होती.- काश्मिरीनं याची जबाबदारी लष्कर-ए-तोयबाचा कमांडर आणि पाकिस्तानचा माजी लष्करी अधिकारी हारून आशिक याच्याकडे सोपवली. - हारूननं पाकिस्तानमधल्या शिबिरात यासाठीचं प्रशिक्षण आणि ड्राय रन्स घेतले. - अल कायदानं त्यासाठी थेट आर्थिक मदत केली.

शाहजाद यानं पुस्तकात दिलेला तपशील डेव्हिड हेडलीनं अमेरिकन कोर्टात दिलेल्या साक्षीशी मिळताजुळता आहे. डेव्हिड हेडलीची शिकागो कोर्टातली साक्ष याच आठवड्यात संपली.

आपल्या जीवाला धोका आहे याची कल्पना शाहजादलाही होती. पाकिस्तानी पत्रकार शाहजादचा हा आवाज कायमचा दाबण्यात आला. पण त्याच्या मृत्यूनंतरच खर्‍या अर्थानं त्या आवाजाची ताकद कळतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 2, 2011 05:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close