S M L

बाबांच्या उपोषणात साध्वी ऋतुंभरा सहभागी

04 जूनबाबा रामदेव यांच्या आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी मोठा राजकीय वाद निर्माण झाला. बाबरी मशिदीविरुद्ध वातावरण तापवणार्‍या विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी ऋतुंभरा यांना रामदेवांनी मंचावर स्थान दिल्यामुळे अण्णा हजारे नाराज आहेत. तसेच काँग्रेस पक्षानेही त्यामुळे बाबांवर जोरदार टीका केली. साध्वी ऋतुंभरा.. रामजन्मभूमी आंदोलनातल्या फायरब्रँड नेत्या. विश्व हिंदू परिषदेच्या जहाल वक्त्या, अनेक वर्षांनंतर अवतरल्या त्या थेट रामलीला मैदानावर तेही बाबा रामदेवांसोबत. पण त्यांच्या उपस्थितीमुळे रामदेवांनी अनेक मित्र गमावले. इतके दिवस त्यांची साथ देणारे अग्निवेश, प्रशांत भूषण, मेधा पाटकर या सगळ्यांनी बाबांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. धर्मनिरपेक्ष समाजकारण करणारे अण्णा हजारेही आता बाबांच्या आंदोलनात सहभागी व्हायचं की नाही यावर पुनर्विचार करणार आहेत. पण यावर शांत बसतील ते बाबा कसे? त्यांनीही मग ऋतुंभरांची तोंड भरून स्तुती केली आणि तमाम विरोधकांना टोला हाणला. अण्णा हजारेंच्या टीममध्ये अखेरीस फूट पडली, म्हणून केंद्र सरकारने थोडा सुटकेचा निःश्वास सोडला. बाबांच्या आंदोलनात संघ परिवारातले नेते सहभागी झाल्यामुळे काँग्रेसने मात्र बाबांचा चांगलाच समाचार घेतला. पण बाबांच्या सरकारशी सुरू असलेल्या वाटाघाटींचा किंवा ऋतुंभरांच्या उपस्थितीमुळे झालेल्या राजकारणाचा रामलीला मैदानात जमलेल्या सर्वसामान्य समर्थकांवर फारसा परिणाम दिसला नाही. काळ्या पैशांपेक्षाही.. इथे आलेल्या लोकांना योगासनांत जास्त रस दिसला. बरीच मंडळी तर केवळ बाबांवर असलेल्या श्रद्धेपोटी शेकडो मैलांचा प्रवास करून दिल्लीपर्यंत पोचली होती. तर बाबा रामदेव यांच्या उपोषणाबद्दल स्वामी अग्निवेश यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहे. साध्वी ऋतुंभरा सारख्या धर्माचं राजकारण करणार्‍या लोकांना या आंदोलनापासून दूर ठेवण्याची गरज असल्याचं स्वामी अग्निवेश यांनी म्हटलं आहे. तसेच साध्वी ऋतंभरा देवींच्या उपस्थितीबाबत बाबा रामदेव यांनी स्पष्टीकरण देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. अण्णा हजारे यांनी आंदोलनात सहभागी होण्यापूर्वी रामदेव बाबा यांनी लोकपाल बिल आणि इतर प्रश्नांवर आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीदेखील स्वामी अग्निवेश यांनी केली.दरम्यान बाबा रामदेवांना संघाचा पाठिंबा असल्याचा दावा काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांनी केला आहे. त्यामुळे अण्णा हजारेंनीआरएसएस आणि विहिंपसोबत जायचं की नाही याचा निर्णय त्यांनीच घ्यावा असं मतही त्यांनी व्यक्त केलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 4, 2011 09:13 AM IST

बाबांच्या उपोषणात साध्वी ऋतुंभरा सहभागी

04 जून

बाबा रामदेव यांच्या आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी मोठा राजकीय वाद निर्माण झाला. बाबरी मशिदीविरुद्ध वातावरण तापवणार्‍या विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी ऋतुंभरा यांना रामदेवांनी मंचावर स्थान दिल्यामुळे अण्णा हजारे नाराज आहेत. तसेच काँग्रेस पक्षानेही त्यामुळे बाबांवर जोरदार टीका केली.

साध्वी ऋतुंभरा.. रामजन्मभूमी आंदोलनातल्या फायरब्रँड नेत्या. विश्व हिंदू परिषदेच्या जहाल वक्त्या, अनेक वर्षांनंतर अवतरल्या त्या थेट रामलीला मैदानावर तेही बाबा रामदेवांसोबत. पण त्यांच्या उपस्थितीमुळे रामदेवांनी अनेक मित्र गमावले.

इतके दिवस त्यांची साथ देणारे अग्निवेश, प्रशांत भूषण, मेधा पाटकर या सगळ्यांनी बाबांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. धर्मनिरपेक्ष समाजकारण करणारे अण्णा हजारेही आता बाबांच्या आंदोलनात सहभागी व्हायचं की नाही यावर पुनर्विचार करणार आहेत.

पण यावर शांत बसतील ते बाबा कसे? त्यांनीही मग ऋतुंभरांची तोंड भरून स्तुती केली आणि तमाम विरोधकांना टोला हाणला. अण्णा हजारेंच्या टीममध्ये अखेरीस फूट पडली, म्हणून केंद्र सरकारने थोडा सुटकेचा निःश्वास सोडला. बाबांच्या आंदोलनात संघ परिवारातले नेते सहभागी झाल्यामुळे काँग्रेसने मात्र बाबांचा चांगलाच समाचार घेतला.

पण बाबांच्या सरकारशी सुरू असलेल्या वाटाघाटींचा किंवा ऋतुंभरांच्या उपस्थितीमुळे झालेल्या राजकारणाचा रामलीला मैदानात जमलेल्या सर्वसामान्य समर्थकांवर फारसा परिणाम दिसला नाही.

काळ्या पैशांपेक्षाही.. इथे आलेल्या लोकांना योगासनांत जास्त रस दिसला. बरीच मंडळी तर केवळ बाबांवर असलेल्या श्रद्धेपोटी शेकडो मैलांचा प्रवास करून दिल्लीपर्यंत पोचली होती.

तर बाबा रामदेव यांच्या उपोषणाबद्दल स्वामी अग्निवेश यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहे. साध्वी ऋतुंभरा सारख्या धर्माचं राजकारण करणार्‍या लोकांना या आंदोलनापासून दूर ठेवण्याची गरज असल्याचं स्वामी अग्निवेश यांनी म्हटलं आहे.

तसेच साध्वी ऋतंभरा देवींच्या उपस्थितीबाबत बाबा रामदेव यांनी स्पष्टीकरण देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. अण्णा हजारे यांनी आंदोलनात सहभागी होण्यापूर्वी रामदेव बाबा यांनी लोकपाल बिल आणि इतर प्रश्नांवर आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीदेखील स्वामी अग्निवेश यांनी केली.

दरम्यान बाबा रामदेवांना संघाचा पाठिंबा असल्याचा दावा काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांनी केला आहे. त्यामुळे अण्णा हजारेंनीआरएसएस आणि विहिंपसोबत जायचं की नाही याचा निर्णय त्यांनीच घ्यावा असं मतही त्यांनी व्यक्त केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 4, 2011 09:13 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close