S M L

बाबांच्या उपोषणाला राज्यभरातून पाठिंबा

04 जूनरामदेव बाबा यांच्या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. मुंबईत आझाद मैदानात त्यांचे समर्थक उपोषणाला बसले आहेत. बाबा रामदेवांना पाठिंबा देण्यासाठी पुण्यातही त्यांच्या समर्थकांनी उपोषणास सुरुवात केली आहे. आज सकाळी 6 वाजल्यापासून पुण्यातील सावरकर स्मारकापाशी उपोषण सुरु आहे. भारत स्वाभिमान संंघटनेचे अनेक कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले आहेत. बाबा रामदेवांच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत हे उपोषण सुरू ठेवण्याचा दावा उपोषणकर्त्यांनी केला आहे. तर नागपूरमध्ये बाबा रामदेवांना पाठिंबा देण्यासाठी नागपूरच्या रिझर्व्ह बँक चौकात अनेक सामाजिक संघटनांनी आंदोलन सुरु केलं आहे. तसेच योगगुरू बाबा रामदेव यांच्या आंदोलनाला औरंगाबादमध्येही चांगला प्रतिसाद मिळतोय. पतंजली योग समितीसह अनेक संघटनांनी बाबांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बाबांचे समर्थक उपोषणाला बसले आहे. जागोजागी बाबा रामदेव यांचे फलक लावण्यात आले आहे. आंदोलनाच्या ठिकाणी टिव्हीवरुन आंदोलनाची भूमिका स्पष्ट करणारी भाषणं दाखवली जात आहे. आंदोलनात महिलांची संख्याही लक्षणीय आहे. बीड आणि लातूरमधूनही लोक औरंगाबादला उपोषणात सहभागी होण्यासाठी आले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 4, 2011 07:53 AM IST

बाबांच्या उपोषणाला राज्यभरातून पाठिंबा

04 जूनरामदेव बाबा यांच्या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. मुंबईत आझाद मैदानात त्यांचे समर्थक उपोषणाला बसले आहेत. बाबा रामदेवांना पाठिंबा देण्यासाठी पुण्यातही त्यांच्या समर्थकांनी उपोषणास सुरुवात केली आहे. आज सकाळी 6 वाजल्यापासून पुण्यातील सावरकर स्मारकापाशी उपोषण सुरु आहे.

भारत स्वाभिमान संंघटनेचे अनेक कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले आहेत. बाबा रामदेवांच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत हे उपोषण सुरू ठेवण्याचा दावा उपोषणकर्त्यांनी केला आहे. तर नागपूरमध्ये बाबा रामदेवांना पाठिंबा देण्यासाठी नागपूरच्या रिझर्व्ह बँक चौकात अनेक सामाजिक संघटनांनी आंदोलन सुरु केलं आहे.

तसेच योगगुरू बाबा रामदेव यांच्या आंदोलनाला औरंगाबादमध्येही चांगला प्रतिसाद मिळतोय. पतंजली योग समितीसह अनेक संघटनांनी बाबांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बाबांचे समर्थक उपोषणाला बसले आहे.

जागोजागी बाबा रामदेव यांचे फलक लावण्यात आले आहे. आंदोलनाच्या ठिकाणी टिव्हीवरुन आंदोलनाची भूमिका स्पष्ट करणारी भाषणं दाखवली जात आहे. आंदोलनात महिलांची संख्याही लक्षणीय आहे. बीड आणि लातूरमधूनही लोक औरंगाबादला उपोषणात सहभागी होण्यासाठी आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 4, 2011 07:53 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close