S M L

बाबांच्या उपोषणात साध्वी ऋतंभरा सहभागी

04 जूनबाबा रामदेव यांचं आंदोलन पहिल्याच दिवशी वादात सापडलं आहे. कारण आज सकाळी साध्वी ऋतंभरा यासुद्धा रामदेव बाबांच्या आंदोलनात सहभागी झाल्या आहे. रामजन्मभूमी आंदोलनात स्फोटक भाषण करुन वातावरण तापवण्याचा प्रयत्न साध्वी ऋतंभरा यांनी केला होता. साध्वी ऋतंभरा यांचा संघपरिवाराशी जवळचा संबंध आहे. संघाने बाबांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला असला तरीही ऋतंभरांसारखी जहाल व्यक्ती थेट मंचावर पोहचल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात. अण्णा हजारे हे उद्या बाबा रामदेव यांच्या सत्याग्रहात सहभागी होणार आहेत. पण ते ऋतंभरांसारख्या संघपरिवाशी निगडित लोकांसोबत स्टेजवर बसतील का हा खरा प्रश्न आहे. तर बाबा रामदेव यांच्या उपोषणाबद्दल स्वामी अग्निवेश यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहे. साध्वी ऋतुंभरा सारख्या धर्माचं राजकारण करणार्‍या लोकांना या आंदोलनापासून दूर ठेवण्याची गरज असल्याचं स्वामी अग्निवेश यांनी म्हटलं आहे. तसेच साध्वी ऋतंभरा देवींच्या उपस्थितीबाबत बाबा रामदेव यांनी स्पष्टीकरण देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. अण्णा हजारे यांनी आंदोलनात सहभागी होण्यापूर्वी रामदेव बाबा यांनी लोकपाल बिल आणि इतर प्रश्नांवर आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीदेखील स्वामी अग्निवेश यांनी केली.दरम्यान बाबा रामदेवांना संघाचा पाठिंबा असल्याचा दावा काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांनी केला आहे. त्यामुळे अण्णा हजारेंनीआरएसएस आणि विहिंपसोबत जायचं की नाही याचा निर्णय त्यांनीच घ्यावा असं मतही त्यांनी व्यक्त केलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 4, 2011 11:03 AM IST

बाबांच्या उपोषणात साध्वी ऋतंभरा सहभागी

04 जून

बाबा रामदेव यांचं आंदोलन पहिल्याच दिवशी वादात सापडलं आहे. कारण आज सकाळी साध्वी ऋतंभरा यासुद्धा रामदेव बाबांच्या आंदोलनात सहभागी झाल्या आहे. रामजन्मभूमी आंदोलनात स्फोटक भाषण करुन वातावरण तापवण्याचा प्रयत्न साध्वी ऋतंभरा यांनी केला होता.

साध्वी ऋतंभरा यांचा संघपरिवाराशी जवळचा संबंध आहे. संघाने बाबांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला असला तरीही ऋतंभरांसारखी जहाल व्यक्ती थेट मंचावर पोहचल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात.

अण्णा हजारे हे उद्या बाबा रामदेव यांच्या सत्याग्रहात सहभागी होणार आहेत. पण ते ऋतंभरांसारख्या संघपरिवाशी निगडित लोकांसोबत स्टेजवर बसतील का हा खरा प्रश्न आहे.

तर बाबा रामदेव यांच्या उपोषणाबद्दल स्वामी अग्निवेश यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहे. साध्वी ऋतुंभरा सारख्या धर्माचं राजकारण करणार्‍या लोकांना या आंदोलनापासून दूर ठेवण्याची गरज असल्याचं स्वामी अग्निवेश यांनी म्हटलं आहे.

तसेच साध्वी ऋतंभरा देवींच्या उपस्थितीबाबत बाबा रामदेव यांनी स्पष्टीकरण देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. अण्णा हजारे यांनी आंदोलनात सहभागी होण्यापूर्वी रामदेव बाबा यांनी लोकपाल बिल आणि इतर प्रश्नांवर आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीदेखील स्वामी अग्निवेश यांनी केली.

दरम्यान बाबा रामदेवांना संघाचा पाठिंबा असल्याचा दावा काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांनी केला आहे. त्यामुळे अण्णा हजारेंनीआरएसएस आणि विहिंपसोबत जायचं की नाही याचा निर्णय त्यांनीच घ्यावा असं मतही त्यांनी व्यक्त केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 4, 2011 11:03 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close