S M L

औरंगाबाद रेल्वे स्थानकावर खताची शेकडो पोती भिजली

04 जूनऔरंगाबाद रेल्वे स्थानकावर उघड्यावर असलेल्या खताची शेकडो पोती मान्सूनपूर्व पावसाच्या तडाख्यात भिजली आहेत. जिल्ह्यातल्या शेतकर्‍यांसाठी आलेलं हे खत अचानक असं पावसात भिजून गेलंय. आधीच शेतकरी खतटंचाईचा सामना करत असताना आता ही खतांची पोती भिजल्याने त्याला ऐन पेरणीपूर्वीच खतांचा तुटवडा जाणवू लागणार आहे. काल संध्याकाळी औरंगाबादमध्ये आलेल्या पावसात ही खतांची पोती भिजली आहेत. रेल्वे स्थानकाच्या ज्या प्लॅटफॉर्मवर ही पोती ठेवली होती. साधारण अडीच हजार टन खत या पावसात भिजून गेलंय. इतक्या मोठ्याप्रमाणात खत ठेवण्यासाठी रेल्वेकडे गोदाम नाही. उघड्यावर पडलेलं खत वाचवण्यासाठी ताडपत्री टाकण्याचा केविलवाणा प्रयत्न यावेळी करण्यात आला. मात्र त्यापासून खतांचा बचाव होऊ शकला नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 4, 2011 11:18 AM IST

औरंगाबाद रेल्वे स्थानकावर खताची शेकडो पोती भिजली

04 जून

औरंगाबाद रेल्वे स्थानकावर उघड्यावर असलेल्या खताची शेकडो पोती मान्सूनपूर्व पावसाच्या तडाख्यात भिजली आहेत. जिल्ह्यातल्या शेतकर्‍यांसाठी आलेलं हे खत अचानक असं पावसात भिजून गेलंय.

आधीच शेतकरी खतटंचाईचा सामना करत असताना आता ही खतांची पोती भिजल्याने त्याला ऐन पेरणीपूर्वीच खतांचा तुटवडा जाणवू लागणार आहे. काल संध्याकाळी औरंगाबादमध्ये आलेल्या पावसात ही खतांची पोती भिजली आहेत.

रेल्वे स्थानकाच्या ज्या प्लॅटफॉर्मवर ही पोती ठेवली होती. साधारण अडीच हजार टन खत या पावसात भिजून गेलंय. इतक्या मोठ्याप्रमाणात खत ठेवण्यासाठी रेल्वेकडे गोदाम नाही. उघड्यावर पडलेलं खत वाचवण्यासाठी ताडपत्री टाकण्याचा केविलवाणा प्रयत्न यावेळी करण्यात आला. मात्र त्यापासून खतांचा बचाव होऊ शकला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 4, 2011 11:18 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close