S M L

मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा 10 जणांचा मृत्यू

04 जूनमान्सूनपूर्व पावसाने मराठवाड्याच्या सर्वच जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली आहे. मराठवाड्यातील हिंगोली आणि बीड इथं वीज पडून चार जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मान्सूनपूर्व पावसात वीज पडून मृत्यू पावल्यांची संख्या आता दहा झाली आहे. औरंगाबाद शहरातही विजेची तार पडून दोन गायी मृत्यूमुखी पडल्या. मराठवाड्यातल्या सर्वच जिल्ह्यांमध्ये दमदार पर्जन्यवृष्टी झाली. औरंगाबाद शहरात तर अवघ्या एका तासात 33 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मान्सूनपूर्व पावसाचं सुखद आगमन झाल्यामुळे शेतकर्‍यासंह सर्वच जण सुखावले. मात्र पावसाच्या पहिल्याच झटक्याने औरंगाबाद शहरातील अनेक भागात विजेच्या तारा तुटल्या, झाडांच्या फांद्या तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. अचानक आलेल्या पावसामुळे शहरातल्या काही सखल भागातल्या घरांमध्ये पाणी शिरलं होतं. दुचाकी वाहने बंद पडल्याने वाहनधारकांची एकच तारांबळ उडाली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 4, 2011 03:53 PM IST

मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा 10 जणांचा मृत्यू

04 जून

मान्सूनपूर्व पावसाने मराठवाड्याच्या सर्वच जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली आहे. मराठवाड्यातील हिंगोली आणि बीड इथं वीज पडून चार जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मान्सूनपूर्व पावसात वीज पडून मृत्यू पावल्यांची संख्या आता दहा झाली आहे.

औरंगाबाद शहरातही विजेची तार पडून दोन गायी मृत्यूमुखी पडल्या. मराठवाड्यातल्या सर्वच जिल्ह्यांमध्ये दमदार पर्जन्यवृष्टी झाली. औरंगाबाद शहरात तर अवघ्या एका तासात 33 मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

मान्सूनपूर्व पावसाचं सुखद आगमन झाल्यामुळे शेतकर्‍यासंह सर्वच जण सुखावले. मात्र पावसाच्या पहिल्याच झटक्याने औरंगाबाद शहरातील अनेक भागात विजेच्या तारा तुटल्या, झाडांच्या फांद्या तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. अचानक आलेल्या पावसामुळे शहरातल्या काही सखल भागातल्या घरांमध्ये पाणी शिरलं होतं. दुचाकी वाहने बंद पडल्याने वाहनधारकांची एकच तारांबळ उडाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 4, 2011 03:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close