S M L

रामलीलावर मध्यरात्री घडलेला घटनाक्रम

05 जूनबाबा रामदेव यांचं आंदोलन पोलिसी बळावर चिरडण्यात आलं. 4 जूनला दिवसभर सरकार आणि बाबा रामदेव यांच्या शाब्दिक चकमक सुरू होती आणि मध्यरात्री बारावाजेनंतर चकमकीचं रुपांतर प्रत्यक्ष कारवाईत झालं. गाढ झोपेत असलेल्या निरपराध लोकांना पोलिसांनी लाठीमार करत हुसकावून लावलं. बाबा रामदेवांनाही ताब्यात घेऊन पहिल्यांदा डेहराडूनला आणि नंतर हरिद्वारला आणल्यात आलं. 4 जूनच्या संध्याकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल म्हणतात, आम्ही चर्चा करण्यासाठी पुढाकार घेऊ शकतो, तर लगाम कशी खेचतात तेही आम्हाला माहित आहे. पण या वक्तव्याचा अर्थ काय होता हे समजायला मध्यरात्र उलटावी लागली. दिवसभर उपाशीपोटी आंदोलन करून थकलेले हजारो लोक रात्री रामलीला मैदानावर गाढ झोपी गेले होते. मध्यरात्र उलटली आणि बरोबर 1 वाजता दिल्ली पोलिसांच्या रॅपिड ऍक्शन फोर्सचे जवान रामलीला मैदानात घुसले. त्यांनी थेट बाबा रामदेव जिथं झोपले होते तो स्टेज गाठला आणि मग एकच गोंधळ उडाला. कार्यकर्त्यांनी बाबा रामदेव यांच्याभोवती कडं केलं. पोलिसांना बाबा रामदेव यांच्यापर्यंत जाण्यापासून रोखण्यासाठी कार्यकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक करायला सुरुवात केली. प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी अश्रुधुराचा मारा केला. परिस्थिती बघून बाबा रामदेव यांनी स्टेजवरून उडी घेऊन पोलिसांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केला. पण बाबांना पोलिसांनी पकडलंच. त्यानंतर बाबा रामदेव कुणालाच दिसले नाहीत. पोलीस बाबांना अज्ञातस्थळी घेऊन गेले. इतक्यात एका ठिकाणी छोटीशी आगही लागली. पण ती वेळीच आटोक्यात आणण्यात आली. इकडे पोलिसी बळावर लोकांना हुसकावण्यात येत होतं. पोलिसांच्या लाठीमारात आणि अश्रुधुरामुळे अनेक जण जखमी झाले. काही जण बेपत्तासुद्धा झाले. सरकारी आकडेवाडीनुसार 30 लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येतंय. पण बाबा रामदेव यांच्या समर्थकांच्या मते शंभरपेक्षा जास्त लोकांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. बाबा रामदेव यांचे समर्थक सांगता, दो बच्चे लापता हैं. प्रेगनेंट औरतों पर भी लाठीचार्ज किया गया. अगर हम चाहते तो एक भी पुलिसवाला बाबा को हाथ तक नहीं लगा पाता.पहाटे पाच वाजेपर्यंत पोलिसांनी जवळपास संपूर्ण मैदान रिकामं केलं. एवढंच नाही तर मंडप काढायलाही सुरुवात केली. कलम 144 म्हणजेच जमावबंदी लागू करण्यात आली. 4 जूनला सकाळी 6 वाजता याच मैदानावर काळ्या पैशाविरोधात आंदोलनाला सुरुवात झाली होती. 24 तास आधी जे मैदान हजारो लोकांच्या घोषणांनी दुमदुमत होतं. त्याच मैदानावर बरोबर 24 तासांनंतर फक्त अस्ताव्यस्त पसरलेलं सामान आणि शांतता होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 5, 2011 03:17 PM IST

रामलीलावर मध्यरात्री घडलेला घटनाक्रम

05 जून

बाबा रामदेव यांचं आंदोलन पोलिसी बळावर चिरडण्यात आलं. 4 जूनला दिवसभर सरकार आणि बाबा रामदेव यांच्या शाब्दिक चकमक सुरू होती आणि मध्यरात्री बारावाजेनंतर चकमकीचं रुपांतर प्रत्यक्ष कारवाईत झालं. गाढ झोपेत असलेल्या निरपराध लोकांना पोलिसांनी लाठीमार करत हुसकावून लावलं. बाबा रामदेवांनाही ताब्यात घेऊन पहिल्यांदा डेहराडूनला आणि नंतर हरिद्वारला आणल्यात आलं.

4 जूनच्या संध्याकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल म्हणतात, आम्ही चर्चा करण्यासाठी पुढाकार घेऊ शकतो, तर लगाम कशी खेचतात तेही आम्हाला माहित आहे. पण या वक्तव्याचा अर्थ काय होता हे समजायला मध्यरात्र उलटावी लागली.

दिवसभर उपाशीपोटी आंदोलन करून थकलेले हजारो लोक रात्री रामलीला मैदानावर गाढ झोपी गेले होते. मध्यरात्र उलटली आणि बरोबर 1 वाजता दिल्ली पोलिसांच्या रॅपिड ऍक्शन फोर्सचे जवान रामलीला मैदानात घुसले. त्यांनी थेट बाबा रामदेव जिथं झोपले होते तो स्टेज गाठला आणि मग एकच गोंधळ उडाला.

कार्यकर्त्यांनी बाबा रामदेव यांच्याभोवती कडं केलं. पोलिसांना बाबा रामदेव यांच्यापर्यंत जाण्यापासून रोखण्यासाठी कार्यकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक करायला सुरुवात केली. प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी अश्रुधुराचा मारा केला.

परिस्थिती बघून बाबा रामदेव यांनी स्टेजवरून उडी घेऊन पोलिसांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केला. पण बाबांना पोलिसांनी पकडलंच. त्यानंतर बाबा रामदेव कुणालाच दिसले नाहीत. पोलीस बाबांना अज्ञातस्थळी घेऊन गेले. इतक्यात एका ठिकाणी छोटीशी आगही लागली. पण ती वेळीच आटोक्यात आणण्यात आली.

इकडे पोलिसी बळावर लोकांना हुसकावण्यात येत होतं. पोलिसांच्या लाठीमारात आणि अश्रुधुरामुळे अनेक जण जखमी झाले. काही जण बेपत्तासुद्धा झाले. सरकारी आकडेवाडीनुसार 30 लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येतंय. पण बाबा रामदेव यांच्या समर्थकांच्या मते शंभरपेक्षा जास्त लोकांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.

बाबा रामदेव यांचे समर्थक सांगता, दो बच्चे लापता हैं. प्रेगनेंट औरतों पर भी लाठीचार्ज किया गया. अगर हम चाहते तो एक भी पुलिसवाला बाबा को हाथ तक नहीं लगा पाता.

पहाटे पाच वाजेपर्यंत पोलिसांनी जवळपास संपूर्ण मैदान रिकामं केलं. एवढंच नाही तर मंडप काढायलाही सुरुवात केली. कलम 144 म्हणजेच जमावबंदी लागू करण्यात आली.

4 जूनला सकाळी 6 वाजता याच मैदानावर काळ्या पैशाविरोधात आंदोलनाला सुरुवात झाली होती. 24 तास आधी जे मैदान हजारो लोकांच्या घोषणांनी दुमदुमत होतं. त्याच मैदानावर बरोबर 24 तासांनंतर फक्त अस्ताव्यस्त पसरलेलं सामान आणि शांतता होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 5, 2011 03:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close