S M L

बाबांच्या आंदोलनावर कारवाईमुळे सोनिया गांधी नाराज

06 जूनबाबा रामदेव यांचं आंदोलन दडपण्यासाठी सरकारने केलेल्या कारवाईवर सोनिया गांधी चांगल्याच नाराज असल्याचं वृत्त आहे. काँग्रेसाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या घरी काल एक महत्त्वाची बैठक झाली. तीन तास चाललेल्या या बैठकीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसह केंद्रीय मंत्री प्रणव मुखर्जी, पी. चिदंबरम, ए. के. अँटोनी आणि कपिल सिब्बलही हजर होते. बाबा रामदेव यांच्यावर कारवाई करण्यासाठी मध्यरात्रीची वेळ का निवडण्यात आली. शिवाय परवानगी नसताना बाबा रामदेव यांना रामलीला मैदानावर उपोषणाला का बसू देण्यात आलं, असा प्रश्न त्यांनी विचारला. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रामदेव उपोषणाला बसल्यावर कारवाई करण्यासाठी सकाळपर्यंत वाट का पाहिली नाही असा सवाल सोनिया यांनी विचारला. तसेच बाबा रामदेव यांच्याशी चर्चा करण्यासाठी चार मंत्र्यांच्या दिल्ली एअरपोर्टवर जाण्यावरही सोनिया यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. बाबा रामदेव यांच्यावर केलेल्या कारवाईवरून काँग्रेसाध्यक्ष सरकारवर नाराज असल्याचं दिसतंय. बाबा रामदेव यांचं प्रकरण सरकारने कसं हाताळलं. काय होता एकूण घटनाक्रम 31 मे - बाबा रामदेवांच्या मुद्द्यावर कॅबिनेटची बैठक घेण्यात आली. त्यात बाबांशी चर्चा करण्याचे निश्चित करण्यात आलं. चर्चेतून मार्ग निघाला नाही तर बाबांना ताब्यात घ्यावे असा निर्णय घेण्यात आला. 1 जून - चार केंद्रीय मंत्री आणि एक कॅबिनेट सचिव बाबांशी चर्चा करण्यासाठी दिल्ली एअरपोर्टवर गेले. पण चर्चा निष्फळ ठरली. 2 जून - बाबांच्या मुद्द्यावर कोअर कमिटीची पुन्हा बैठक घेण्यात आली. 3 जून - बाबा रामदेव यांच्याशी पाच तास मॅराथॉन बैठक झाली. यात सरकारने लिखित आश्वासन द्यावे आणी बाबांनी उपोषण सोडावं असं ठरवण्यात आलं. 4 जून - पण चर्चा फिस्कटली. आणि सरकारने मध्यरात्री कारवाई करत बाबांना ताब्यात घेतलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 6, 2011 09:47 AM IST

बाबांच्या आंदोलनावर कारवाईमुळे सोनिया गांधी नाराज

06 जून

बाबा रामदेव यांचं आंदोलन दडपण्यासाठी सरकारने केलेल्या कारवाईवर सोनिया गांधी चांगल्याच नाराज असल्याचं वृत्त आहे. काँग्रेसाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या घरी काल एक महत्त्वाची बैठक झाली. तीन तास चाललेल्या या बैठकीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसह केंद्रीय मंत्री प्रणव मुखर्जी, पी. चिदंबरम, ए. के. अँटोनी आणि कपिल सिब्बलही हजर होते.

बाबा रामदेव यांच्यावर कारवाई करण्यासाठी मध्यरात्रीची वेळ का निवडण्यात आली. शिवाय परवानगी नसताना बाबा रामदेव यांना रामलीला मैदानावर उपोषणाला का बसू देण्यात आलं, असा प्रश्न त्यांनी विचारला.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रामदेव उपोषणाला बसल्यावर कारवाई करण्यासाठी सकाळपर्यंत वाट का पाहिली नाही असा सवाल सोनिया यांनी विचारला. तसेच बाबा रामदेव यांच्याशी चर्चा करण्यासाठी चार मंत्र्यांच्या दिल्ली एअरपोर्टवर जाण्यावरही सोनिया यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे.

बाबा रामदेव यांच्यावर केलेल्या कारवाईवरून काँग्रेसाध्यक्ष सरकारवर नाराज असल्याचं दिसतंय. बाबा रामदेव यांचं प्रकरण सरकारने कसं हाताळलं.

काय होता एकूण घटनाक्रम

31 मे - बाबा रामदेवांच्या मुद्द्यावर कॅबिनेटची बैठक घेण्यात आली. त्यात बाबांशी चर्चा करण्याचे निश्चित करण्यात आलं. चर्चेतून मार्ग निघाला नाही तर बाबांना ताब्यात घ्यावे असा निर्णय घेण्यात आला.

1 जून - चार केंद्रीय मंत्री आणि एक कॅबिनेट सचिव बाबांशी चर्चा करण्यासाठी दिल्ली एअरपोर्टवर गेले. पण चर्चा निष्फळ ठरली.

2 जून - बाबांच्या मुद्द्यावर कोअर कमिटीची पुन्हा बैठक घेण्यात आली.

3 जून - बाबा रामदेव यांच्याशी पाच तास मॅराथॉन बैठक झाली. यात सरकारने लिखित आश्वासन द्यावे आणी बाबांनी उपोषण सोडावं असं ठरवण्यात आलं. 4 जून - पण चर्चा फिस्कटली. आणि सरकारने मध्यरात्री कारवाई करत बाबांना ताब्यात घेतलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 6, 2011 09:47 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close