S M L

'रामलीला'वर कारवाईत 53 वर्षीय महिला गंभीर जखमी

06 जूनरामलीला मैदानात शनिवारी मध्यरात्री लाठीचार्ज केल्याचा आरोप दिल्ली पोलिसांनी नाकारला आहे. पण मध्यरात्रीच्या कारवाईत 53 वर्षांची एक महिला गंभीर जखमी झाली आहे.राजबाला देवी असं त्यांचं नाव आहे. त्यांना आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. त्यांचे दोन्ही हात आणि पाय लुळे पडले आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार काल त्यांच्यावर सर्व्हिकल रिप्लेसमेंट सर्जरी झाली. पण त्यांना झालेल्या जखमा पाहता जन्मभर अपंगत्व येण्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. राजबाला यांच्याबरोबर आणखी 71 जण पोट आणि मानेवर बसलेल्या लाठ्यांमुळे जखमी झाले आहे. राजबालांवर सध्या दिल्लीच्या जी बी पंत हॉस्पिटलच्या आय.सी.यु. मध्ये उपचार सुरु आहेत.राजबाला यांचे दोन्ही पाय आणि हात पॅरलाईज झाले असून त्या सध्या व्हेंटिलेटरवर आहेत. जी बी पंत हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार काल त्यांच्यावर सर्व्हिकल रिप्लेसमेंट सर्जरी झाली. पण त्यांना झालेल्या जखमा पाहता त्यांचे अवयव कायमस्वरुपी पॅरालाईज राहतील. रामदेवबाबांनी आपलं उपोषणाचं स्थान बदललं. सुप्रीम कोर्टाने केंद्र आणि दिल्ली सरकारला नोटीस दिली मात्र या आंदोलनात सामील व्हायला आलेल्या गुडगावच्या 50 वर्षांच्या राजबाला आणि त्यांच्या कुटंूबाकरता हा कसोटीचा काळ आहे. शनिवारी मध्यरात्री रामलीला मैदानावर पोलिसांनी केलेल्या लाठीमारात राजबाला गंभीर जखमी झाल्या आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 6, 2011 05:40 PM IST

'रामलीला'वर कारवाईत 53 वर्षीय महिला गंभीर जखमी

06 जून

रामलीला मैदानात शनिवारी मध्यरात्री लाठीचार्ज केल्याचा आरोप दिल्ली पोलिसांनी नाकारला आहे. पण मध्यरात्रीच्या कारवाईत 53 वर्षांची एक महिला गंभीर जखमी झाली आहे.राजबाला देवी असं त्यांचं नाव आहे.

त्यांना आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. त्यांचे दोन्ही हात आणि पाय लुळे पडले आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार काल त्यांच्यावर सर्व्हिकल रिप्लेसमेंट सर्जरी झाली.

पण त्यांना झालेल्या जखमा पाहता जन्मभर अपंगत्व येण्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. राजबाला यांच्याबरोबर आणखी 71 जण पोट आणि मानेवर बसलेल्या लाठ्यांमुळे जखमी झाले आहे. राजबालांवर सध्या दिल्लीच्या जी बी पंत हॉस्पिटलच्या आय.सी.यु. मध्ये उपचार सुरु आहेत.

राजबाला यांचे दोन्ही पाय आणि हात पॅरलाईज झाले असून त्या सध्या व्हेंटिलेटरवर आहेत. जी बी पंत हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार काल त्यांच्यावर सर्व्हिकल रिप्लेसमेंट सर्जरी झाली. पण त्यांना झालेल्या जखमा पाहता त्यांचे अवयव कायमस्वरुपी पॅरालाईज राहतील.

रामदेवबाबांनी आपलं उपोषणाचं स्थान बदललं. सुप्रीम कोर्टाने केंद्र आणि दिल्ली सरकारला नोटीस दिली मात्र या आंदोलनात सामील व्हायला आलेल्या गुडगावच्या 50 वर्षांच्या राजबाला आणि त्यांच्या कुटंूबाकरता हा कसोटीचा काळ आहे. शनिवारी मध्यरात्री रामलीला मैदानावर पोलिसांनी केलेल्या लाठीमारात राजबाला गंभीर जखमी झाल्या आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 6, 2011 05:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close