S M L

अण्णांचे उपोषण राजघाटावर

07 जूनबाबा रामदेव यांचं आंदोलन चिरडल्यानंतर आता केंद्र सरकारने आपला मोर्चा अण्णा हजारे यांच्याकडे वळवला आहे. अण्णांच्या उपोषणाला परवानगी नाकारत केंद्र सरकारने त्याची झलक दाखवली. पण आपण उपोषण करणारच या भूमिकेवर ठाम असल्याने आता सरकार आणि अण्णा यांच्यातला संघर्ष अटळ आहे. अण्णा हजारेंच्या याच निश्चयाला सुरूंग लावण्याचे धोरण केंद्र सरकारने आता स्वीकारलं आहे. बाबा रामदेव यांचे आंदोलन चिरडल्यानंतर आता अण्णांबाबतही कडक भूमिका घ्यायचे केंद्रातल्या यूपीएनं सरकारनं ठरवलंय. आणि म्हणूनच अण्णा आठ जूनला जंतरमंतरवर करत असलेल्या उपोषणाला सरकारने परवानगी नाकारली आहे. पण तरीही उपोषण करणारच या भूमिकेवर अण्णांची टीम ठाम आहे. जंतरमंतरवर परवानगी मिळाली नाही म्हणून आता हे उपोषण गांधींच्या समाधीसमोर म्हणजेच राजघाटवर होणार आहे. अण्णांच्या आंदोलनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्यानंतर सरकार अण्णांसमोर झुकलं होतं. त्यांच्या सगळ्या मान्य करून मसुदा समितीच्या बैठकींनाही सुरुवात झाली. पण रामदेवबाबांचे आंदोलन हाताबाहेर जाऊ लागल्यानंतर आणि केंद्र सरकार कमजोर आहे, अशी टीका झाल्याने सरकारने आपला पवित्रा पूर्णपणे बदलला. आणि लोकपाल समितीच्या बैठकांना अण्णा नाही आले तरी बेहत्तर आम्ही मसुदा बनवायला समर्थ आहोत, अशी आक्रमक भूमिका घेतली आहे.तर सरकारच्या ताठर भूमिकेनंतर अण्णांच्या टीमनं आपली भूमिका मवाळ केली. आणि यापुढे आम्ही सर्व बैठकांना हजर राहू असं समंजस उत्तर दिलं. अण्णांनी काहीशी मवाळ भूमिका घेतली असली तरी सरकार आणि अण्णा यांच्यातला संघर्ष मात्र अटळ आहे.दरम्यान अण्णांच्या आंदोलनाला परवानगी नाकारण्याच्या निर्णयावर बाबा रामदेव यांनी सरकारवर टीका केली. तसेच अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 7, 2011 08:55 AM IST

अण्णांचे उपोषण राजघाटावर

07 जून

बाबा रामदेव यांचं आंदोलन चिरडल्यानंतर आता केंद्र सरकारने आपला मोर्चा अण्णा हजारे यांच्याकडे वळवला आहे. अण्णांच्या उपोषणाला परवानगी नाकारत केंद्र सरकारने त्याची झलक दाखवली. पण आपण उपोषण करणारच या भूमिकेवर ठाम असल्याने आता सरकार आणि अण्णा यांच्यातला संघर्ष अटळ आहे.

अण्णा हजारेंच्या याच निश्चयाला सुरूंग लावण्याचे धोरण केंद्र सरकारने आता स्वीकारलं आहे. बाबा रामदेव यांचे आंदोलन चिरडल्यानंतर आता अण्णांबाबतही कडक भूमिका घ्यायचे केंद्रातल्या यूपीएनं सरकारनं ठरवलंय. आणि म्हणूनच अण्णा आठ जूनला जंतरमंतरवर करत असलेल्या उपोषणाला सरकारने परवानगी नाकारली आहे.

पण तरीही उपोषण करणारच या भूमिकेवर अण्णांची टीम ठाम आहे. जंतरमंतरवर परवानगी मिळाली नाही म्हणून आता हे उपोषण गांधींच्या समाधीसमोर म्हणजेच राजघाटवर होणार आहे. अण्णांच्या आंदोलनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्यानंतर सरकार अण्णांसमोर झुकलं होतं. त्यांच्या सगळ्या मान्य करून मसुदा समितीच्या बैठकींनाही सुरुवात झाली.

पण रामदेवबाबांचे आंदोलन हाताबाहेर जाऊ लागल्यानंतर आणि केंद्र सरकार कमजोर आहे, अशी टीका झाल्याने सरकारने आपला पवित्रा पूर्णपणे बदलला. आणि लोकपाल समितीच्या बैठकांना अण्णा नाही आले तरी बेहत्तर आम्ही मसुदा बनवायला समर्थ आहोत, अशी आक्रमक भूमिका घेतली आहे.

तर सरकारच्या ताठर भूमिकेनंतर अण्णांच्या टीमनं आपली भूमिका मवाळ केली. आणि यापुढे आम्ही सर्व बैठकांना हजर राहू असं समंजस उत्तर दिलं. अण्णांनी काहीशी मवाळ भूमिका घेतली असली तरी सरकार आणि अण्णा यांच्यातला संघर्ष मात्र अटळ आहे.

दरम्यान अण्णांच्या आंदोलनाला परवानगी नाकारण्याच्या निर्णयावर बाबा रामदेव यांनी सरकारवर टीका केली. तसेच अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 7, 2011 08:55 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close