S M L

अण्णांच्या गैरहजेरीतही लोकपाल विधेयक तयार होऊ शकते !

06 जूनअण्णा हजारे आणि केंद्र सरकार यांच्यात आज पुन्हा युद्ध पेटलं. लोकपाल विधेयकाबाबत सरकार गंभीर नसल्याची टीका अण्णांनी केली. बाबा रामदेव यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध म्हणून त्यांनी लोकपाल समितीच्या बैठकीवरही बहिष्कार घातला. केंद्र सरकारनेही याला प्र्रत्युत्तर दिलं. अण्णांच्या गैरहजेरीतही लोकपाल विधेयक तयार होऊ शकतं असं सरकारने म्हटलं आहे. लोकपाल समितीच्या सदस्यांच्या आज एक ऐवजी दोन बैठका झाल्या. मंत्र्यांची बैठक नॉर्थ ब्लॉकमध्ये तर अण्णांची बैठक महाराष्ट्र सदनात. कारण बाबा रामदेव यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईच्या निषेधात अण्णांनी संयुक्त मसुदा समितीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला होता. तसेच लोकपाल विधेयकाच्या बाबतीत सरकार गंभीर नाही असं म्हणतं प्रणव मुखजीर्ंना खरमरीत पत्रही लिहिलं.अण्णांचं सरकारला पत्र"लोकपाल विधेयकाबद्दल सरकार गंभीर नाही. लोकपालाच्या अखत्यारीतून सर्वांनाच बाहेर ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सरकार वेळकाढूपणाचं धोरण स्वीकारतंय. 30 जूनची डेडलाईन असताना अजून पर्यंत मूलभूत मुद्देही ठरवण्यात आले नाही. बाबा रामदेव यांच्यावरील कारवाईनं सिद्ध होतं की भ्रष्टाचाराविरुद्ध उठवलेला आवाज चिरडण्याचे सरकारी धोरण आहे."अण्णांनी बहिष्कार घातला. तरीही लोकपाल विधेयकासाठी बैठक आजपार पडली. त्यात केवळ सरकारी सदस्य हजर होते. या बैठकीत आम्ही महत्त्वाचे निर्णय घेतले असून यापुढेही अण्णा हजारे आले नाहीत तरीही लोकपाल विधेयकाचा मसुदा वेळेत तयार होईल असा टोलाही त्यांनी हाणला. अण्णांनी केलेले आरोप आणि वापरलेली भाषा अण्णांना शोभत नसल्याचंही सिब्बल म्हणाले. अण्णा आणि केंद्र सरकार यांच्यात अजूनही अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर मतभेद आहेत. सध्याची कामकाजाची गती आणि पद्धत पाहता हा मसुदा वेळेत तयार होईल याची शक्यता धूसर आहे. आणि तसं झालं तर अण्णा हजारे पुन्हा आंदोलन करायला तयार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 6, 2011 04:56 PM IST

अण्णांच्या गैरहजेरीतही लोकपाल विधेयक तयार होऊ शकते !

06 जून

अण्णा हजारे आणि केंद्र सरकार यांच्यात आज पुन्हा युद्ध पेटलं. लोकपाल विधेयकाबाबत सरकार गंभीर नसल्याची टीका अण्णांनी केली. बाबा रामदेव यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध म्हणून त्यांनी लोकपाल समितीच्या बैठकीवरही बहिष्कार घातला. केंद्र सरकारनेही याला प्र्रत्युत्तर दिलं. अण्णांच्या गैरहजेरीतही लोकपाल विधेयक तयार होऊ शकतं असं सरकारने म्हटलं आहे.

लोकपाल समितीच्या सदस्यांच्या आज एक ऐवजी दोन बैठका झाल्या. मंत्र्यांची बैठक नॉर्थ ब्लॉकमध्ये तर अण्णांची बैठक महाराष्ट्र सदनात. कारण बाबा रामदेव यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईच्या निषेधात अण्णांनी संयुक्त मसुदा समितीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला होता. तसेच लोकपाल विधेयकाच्या बाबतीत सरकार गंभीर नाही असं म्हणतं प्रणव मुखजीर्ंना खरमरीत पत्रही लिहिलं.अण्णांचं सरकारला पत्र

"लोकपाल विधेयकाबद्दल सरकार गंभीर नाही. लोकपालाच्या अखत्यारीतून सर्वांनाच बाहेर ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सरकार वेळकाढूपणाचं धोरण स्वीकारतंय. 30 जूनची डेडलाईन असताना अजून पर्यंत मूलभूत मुद्देही ठरवण्यात आले नाही. बाबा रामदेव यांच्यावरील कारवाईनं सिद्ध होतं की भ्रष्टाचाराविरुद्ध उठवलेला आवाज चिरडण्याचे सरकारी धोरण आहे."

अण्णांनी बहिष्कार घातला. तरीही लोकपाल विधेयकासाठी बैठक आजपार पडली. त्यात केवळ सरकारी सदस्य हजर होते. या बैठकीत आम्ही महत्त्वाचे निर्णय घेतले असून यापुढेही अण्णा हजारे आले नाहीत तरीही लोकपाल विधेयकाचा मसुदा वेळेत तयार होईल असा टोलाही त्यांनी हाणला. अण्णांनी केलेले आरोप आणि वापरलेली भाषा अण्णांना शोभत नसल्याचंही सिब्बल म्हणाले.

अण्णा आणि केंद्र सरकार यांच्यात अजूनही अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर मतभेद आहेत. सध्याची कामकाजाची गती आणि पद्धत पाहता हा मसुदा वेळेत तयार होईल याची शक्यता धूसर आहे. आणि तसं झालं तर अण्णा हजारे पुन्हा आंदोलन करायला तयार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 6, 2011 04:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close