S M L

म्हैसूरमध्ये हत्तींचा धुमाकूळ 1 ठार

08 जूनम्हैसूरमध्ये 2 हत्तींनी घातलेल्या धुमाकूळात 1 व्यक्ती ठार आणि काही जण जखमी झाले आहे. जखमींचा नेमका आकडा अजून समजलेला नाही. 2 नर हत्ती, एक गाय आणि एका माणसाला हवेत भिरकावताना दिसले. या हत्तींवर काही जण दगड फेकून माणसापासून दूर करण्याचा प्रयत्न करत होते मात्र यामुळे हत्ती आणखीनच बिथरले. म्हैसूर पोलिसांनी नागरिकांना घरातच थांबण्याचे आणि हत्तींवर दगड न फेकण्याचे आवाहन केलं आहे. वनखात्याने एका हत्तीवर ताबा मिळवला असून दुसर्‍या हत्तीला भूलेचं इंजेक्शन दिलं आहे. मात्र त्याचा परिणाम व्हायला थोडा वेळ लागेल. ठार झालेली व्यक्ती ही सयाजीराव रोडवरच्या एटीएमचा सुरक्षारक्षक होता. म्हैसूरपासून साधारण 30 किलोमीटर अंतरावर असणार्‍या टी नरसीपूरा जंगलातून हे हत्ती शहरात घुसले. आणखी 2 हत्ती या जंगलातून बेपत्ता असल्याचं समजत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 8, 2011 10:09 AM IST

म्हैसूरमध्ये हत्तींचा धुमाकूळ 1 ठार

08 जून

म्हैसूरमध्ये 2 हत्तींनी घातलेल्या धुमाकूळात 1 व्यक्ती ठार आणि काही जण जखमी झाले आहे. जखमींचा नेमका आकडा अजून समजलेला नाही. 2 नर हत्ती, एक गाय आणि एका माणसाला हवेत भिरकावताना दिसले. या हत्तींवर काही जण दगड फेकून माणसापासून दूर करण्याचा प्रयत्न करत होते मात्र यामुळे हत्ती आणखीनच बिथरले.

म्हैसूर पोलिसांनी नागरिकांना घरातच थांबण्याचे आणि हत्तींवर दगड न फेकण्याचे आवाहन केलं आहे. वनखात्याने एका हत्तीवर ताबा मिळवला असून दुसर्‍या हत्तीला भूलेचं इंजेक्शन दिलं आहे. मात्र त्याचा परिणाम व्हायला थोडा वेळ लागेल. ठार झालेली व्यक्ती ही सयाजीराव रोडवरच्या एटीएमचा सुरक्षारक्षक होता. म्हैसूरपासून साधारण 30 किलोमीटर अंतरावर असणार्‍या टी नरसीपूरा जंगलातून हे हत्ती शहरात घुसले. आणखी 2 हत्ती या जंगलातून बेपत्ता असल्याचं समजत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 8, 2011 10:09 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close