S M L

पुण्यात सराफ व्यापार्‍यांचे आंदोलन मागे

07 जूनपुणे महापालिका सोन्या-चांदीवर आकारत असलेल्या जकातीवरुन सराफ असोसिएशनं पुकारलेलं आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे. पुणे महापालिका सध्या शेकड्यामागे 3 रुपये जकात आकारते. इतर शहरांमध्ये शेकडयामागे दहा ते 18 पैसे आहेत. ही जकात रद्द करावी या मागणीसाठी सराफ व्यपार्‍यांतर्फे बेमुदत बंद पुकारण्यात आला होता. आज सकाळी सोन्यामारुती चौकापासून सराफांनी मोर्चा काढला. त्यानंतर महापालिकेसमोर सराफांनी धरणं आंदोलन केलं. महापौर मोहनसिंग राजपाल आणि स्थायी समितीचे अध्यक्ष गणेश बीडकर यांनी सराफांची भेट घेतली. जनरल बॉडी मिटींग मध्ये पदाधिकारी आणि नगरसेवकांशी चर्चा करुनच जकातीसंदर्भात निर्णय घ्यावा लागेल तोपर्यंत सराफांनी हे आंदोलन मागे घ्यावं अशी विनंती त्यांनी सराफांना केली. त्यानंतर एक महिन्यासाठी हे आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली. एक महिन्याच्या आत पालिकेने जकात कमी केली नाही तर आंदोलन पुन्हा सुरु करण्याचा इशारा सराफ असोसिएशनं दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 7, 2011 05:29 PM IST

पुण्यात सराफ व्यापार्‍यांचे आंदोलन मागे

07 जून

पुणे महापालिका सोन्या-चांदीवर आकारत असलेल्या जकातीवरुन सराफ असोसिएशनं पुकारलेलं आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे. पुणे महापालिका सध्या शेकड्यामागे 3 रुपये जकात आकारते. इतर शहरांमध्ये शेकडयामागे दहा ते 18 पैसे आहेत. ही जकात रद्द करावी या मागणीसाठी सराफ व्यपार्‍यांतर्फे बेमुदत बंद पुकारण्यात आला होता.

आज सकाळी सोन्यामारुती चौकापासून सराफांनी मोर्चा काढला. त्यानंतर महापालिकेसमोर सराफांनी धरणं आंदोलन केलं. महापौर मोहनसिंग राजपाल आणि स्थायी समितीचे अध्यक्ष गणेश बीडकर यांनी सराफांची भेट घेतली.

जनरल बॉडी मिटींग मध्ये पदाधिकारी आणि नगरसेवकांशी चर्चा करुनच जकातीसंदर्भात निर्णय घ्यावा लागेल तोपर्यंत सराफांनी हे आंदोलन मागे घ्यावं अशी विनंती त्यांनी सराफांना केली.

त्यानंतर एक महिन्यासाठी हे आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली. एक महिन्याच्या आत पालिकेने जकात कमी केली नाही तर आंदोलन पुन्हा सुरु करण्याचा इशारा सराफ असोसिएशनं दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 7, 2011 05:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close