S M L

पोलीस शिपायाची पत्नी आणि 15 दिवसाच्या चिमुकल्यासह आत्महत्या

08 जूनजळगावमध्ये एका पोलीस शिपायाने पत्नी आणि मुलासह आत्महत्या केली आहे. मुलगा फक्त 15 दिवसांचा होता. पुरषोत्तम वाघ असं पोलीस शिपायाचं नाव आहे. त्याच्याजवळून सुसाइड नोटही मिळाली. या नोटमध्ये स्वत:च्या मर्जीनं आत्महत्या करत असल्याचं म्हटलं आहे. या कागदावर पती, पत्नी दोघांच्याही सह्या आहेत. पुरषोत्तम वाघ पोलीस मुख्यालयात कार्यरत होता. फायर केल्याच्या आरोपावरुन तो तीन वर्ष निलंबित होता. वर्षभराआधीच त्याची पोलीस मुख्यालयात नेमणुक झाली होती. त्याची पत्नी विजया स्पर्धा परिक्षेची तयारी करत होती. या जोडप्याला लग्नाच्या 10 वर्षांनंतर मुल झालं होतं. पण काल पोलीस वसाहतीतल्या आपल्या घरी दोघांनी किटकनाशक पिऊन आत्महत्या केली. आपल्या 15 दिवसाच्या चिमुकल्याला किटकनाशक पाजून त्याचाही जीव घेतला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 8, 2011 02:01 PM IST

पोलीस शिपायाची पत्नी आणि 15 दिवसाच्या चिमुकल्यासह आत्महत्या

08 जून

जळगावमध्ये एका पोलीस शिपायाने पत्नी आणि मुलासह आत्महत्या केली आहे. मुलगा फक्त 15 दिवसांचा होता. पुरषोत्तम वाघ असं पोलीस शिपायाचं नाव आहे. त्याच्याजवळून सुसाइड नोटही मिळाली. या नोटमध्ये स्वत:च्या मर्जीनं आत्महत्या करत असल्याचं म्हटलं आहे. या कागदावर पती, पत्नी दोघांच्याही सह्या आहेत.

पुरषोत्तम वाघ पोलीस मुख्यालयात कार्यरत होता. फायर केल्याच्या आरोपावरुन तो तीन वर्ष निलंबित होता. वर्षभराआधीच त्याची पोलीस मुख्यालयात नेमणुक झाली होती. त्याची पत्नी विजया स्पर्धा परिक्षेची तयारी करत होती.

या जोडप्याला लग्नाच्या 10 वर्षांनंतर मुल झालं होतं. पण काल पोलीस वसाहतीतल्या आपल्या घरी दोघांनी किटकनाशक पिऊन आत्महत्या केली. आपल्या 15 दिवसाच्या चिमुकल्याला किटकनाशक पाजून त्याचाही जीव घेतला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 8, 2011 02:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close