S M L

बाबा रामदेव यांची प्रकृती खालावली

08 जूनयोगगुरू बाबा रामदेव यांची प्रकृती खालावत असल्याचे त्यांच्या डॉक्टरांनी सांगितले आहे. बाबा रामदेव यांचं हरिद्वारमध्ये पतंजली योगपीठात उपोषण सुरू आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. त्यांचे वजन कमी झालंय आणि त्यांना डिहायड्रेशनचा त्रास होत आहे. पण त्यांच्या प्रकृतीकडे पाहता बाबा रामदेव यांनी आपलं उपोषण मागे घ्यावे असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. दरम्यान सरकार आपल्या मागण्या करेपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असा निर्धार बाबा रामदेव यांनी केला आहे. पण आपले कार्यकर्ते आणि अनुयायी यांना मात्र त्यांनी उपोषण सोडण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान भाजपच्या नेत्या सुषमा स्वराज यांनी आज हरिद्वारमध्ये बाबा रामदेव यांची भेट घेतली. भाजपचा बाबा रामदेव यांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा असल्याचं त्यांनी सांगितलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 8, 2011 12:11 PM IST

बाबा रामदेव यांची प्रकृती खालावली

08 जून

योगगुरू बाबा रामदेव यांची प्रकृती खालावत असल्याचे त्यांच्या डॉक्टरांनी सांगितले आहे. बाबा रामदेव यांचं हरिद्वारमध्ये पतंजली योगपीठात उपोषण सुरू आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. त्यांचे वजन कमी झालंय आणि त्यांना डिहायड्रेशनचा त्रास होत आहे.

पण त्यांच्या प्रकृतीकडे पाहता बाबा रामदेव यांनी आपलं उपोषण मागे घ्यावे असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. दरम्यान सरकार आपल्या मागण्या करेपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असा निर्धार बाबा रामदेव यांनी केला आहे. पण आपले कार्यकर्ते आणि अनुयायी यांना मात्र त्यांनी उपोषण सोडण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान भाजपच्या नेत्या सुषमा स्वराज यांनी आज हरिद्वारमध्ये बाबा रामदेव यांची भेट घेतली. भाजपचा बाबा रामदेव यांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा असल्याचं त्यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 8, 2011 12:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close