S M L

चित्रकार एम.एफ.हुसेन यांचे निधन

09 जूनआधुनिक काळातील जगप्रसिद्ध चित्रकार मकबूल फिदा हुसेन यांचं आज निधन झालं. लंडनच्या रॉयल ब्रॉम्टन हॉस्पिटलमध्ये सकाळी 8 वाजता त्यांनी जगाचा निरोप घेतला. ते 95 वर्षांचे होते. त्यांच्यावर लंडनमध्येच अंत्यसंस्कार होणार आहेत. पण हुसेन यांच्यावर भारतात अंत्यसंस्कार करायचे असल्यास त्यांना सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन भारत सरकारनं दिले आहे. हुसेन यांच्या आयुष्याच्या कॅनव्हासमध्ये अनेक रंग भरलेले आहेत.एम. एफ. हुसेन. म्हणजेच मकबूल फिदा हुसेन हे चित्रकलेच्या दुनियेतील एक दंतकथा बनून गेलेलं नाव. या अवलिया चित्रकाराचा जन्म 17 सप्टेंबर 1915 चा. भक्तीरंगात रंगलेल्या पंढरपूरमधला. पण उमलत्या वयातच आई झुनैबचा मृत्यू झाला. मग हुसेन बडोद्याला मामाकडे राहायला गेले. तिथे कॅलिग्राफी आणि कवितेमध्ये त्यांचं मन रमलं. पुढे इंदौरला शिक्षण झाल्यानंतर त्यांनी मुंबईच्या जे. जे.स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला. हिंदी फिल्मची पोस्टर्स रंगवण्यापासून त्यांच्या करिअरची खरी सुरुवात झाली. निमिर्तीक्षमता, शैली आणि सतत काहीतरी नवं करत राहण्याच्या ऊर्मीमुळे कलेच्या क्षेत्रात हुसेन याचं नाव झालं.1948 ते 1950 या काळातल्या त्यांच्या प्रदर्शनांमुळे चित्रकार म्हणून त्यांची देशभरात ख्याती झाली. मग ते प्रोग्रेसिव्ह ग्रुप ऑफ आर्टमध्ये सहभागी झाले. स्वित्झर्लंडमध्ये झुरिचला 1952 मध्ये त्यांचं पहिलं आंतरराष्ट्रीय स्तरावरचं चित्रप्रदर्शन भरलं.चीन, अमेरिका, युरोप असा प्रवास करत एम.एफ. हुसेन जगभरातल्या कलारसिकांपर्यंत पोहोचले. 1967 ला त्यांनी थ्रू द आइज ऑफ अ पेंटर ही पहिली फिल्म बनवली. ही फिल्म बलिर्न फिल्म फेस्टिवल मध्ये दाखवली गेली आणि गोल्डन बेअर पुरस्कार मिळाला. 1971 मध्ये झालेल्या एका चित्रप्रदर्शनात पाब्लो पिकासोबरोबर हुसेन यांनाही आमंत्रित करण्यात आलं होतं.हुसेन यांची चित्रं विक्रमी किंमतीने विकली गेली. अलीकडेच 2011 मध्ये बोनहॅम्सच्या लिलावात त्यांच्या चित्राला तब्बल दोन कोटी 32 लाख रुपये एवढी किंमत मिळाली. चित्रकार म्हणून आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवलेल्या या अवलियाने बॉलिवूडमध्येही दोन सिनेमांची निमिर्ती केली. माधुरी दीक्षितवर फिदा असणार्‍या हुसेन यांनी गजगामिनी बनवला. पुढे मीनाक्षी - अ टेल ऑफ थ्री सिटीज हा तब्बूबरोबरचा चित्रपट गाजला. जगभरातल्या सगळ्या मोठ्या शहरांमध्ये हुसेन यांचे स्टुडिओ आहेत. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण या किताबांनी त्यांना गौरवण्यात आलं. 1986 मध्ये ते राज्यसभेतही गेले. हुसेन यांची कारकार्द वादळी आहे. त्यांनी काढलेल्या हिंदू देवतांच्या चित्रांवरून आणि भारतमातेच्या चित्रावरूनही वाद निर्माण झाले. धर्म, व्यक्तीस्वातंत्र्य, कला यावर चर्चा झडल्या. हुसेन यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या. या वादानंतर हुसेन यांनी भारत सोडण्याचा निर्णय घेतला. 2010 मध्ये त्यांनी कतारचं नागरिकत्व घेतलं. त्यानंतर ते दुबई आणि लंडनमध्ये राहिले. आणि अखेर लंडनमधल्या हॉस्पिटलमध्येच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.जगभरातल्या कलाक्षेत्रात हा अविलया कलाकार त्याच्या चित्रांप्रमाणेच अमर झाला आहे. मकबुल फिदा हुसेन यांच्या जीवनप्रवास17 सप्टेंबर 1915 : पंढरपूरमध्ये जन्म1952 : झुरिकमध्ये पहिलं सोलो चित्रप्रदर्शन 1955 : पद्मश्री पुरस्काराने गौरव 1967 : पहिली फिल्म - थ्रू द आईज ऑफ पेंटर1973 : पद्मभूषण पुरस्काराने गौरव1986 : राज्यसभेवर नेमणूक1991 : पद्मविभूषण पुरस्काराने सन्मान2000: 'गजगामिनी' चित्रपटाची निर्मिती2004 : 'मीनाक्षी - अ टेल ऑफ 3 सिटीज' चित्रपटाची निर्मिती2006 : चित्रांवरून वादानंतर भारत सोडला2008 : बॅटल ऑफ गंगा ऍण्ड जमुना चित्राला रेकॉर्ड 1.6 मिलियन डॉलर्सची किंमत 2010: मध्ये कतारचं नागरिकत्त्वजून 2011 : लंडनमध्ये निधन

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 9, 2011 09:02 AM IST

चित्रकार एम.एफ.हुसेन यांचे निधन

09 जून

आधुनिक काळातील जगप्रसिद्ध चित्रकार मकबूल फिदा हुसेन यांचं आज निधन झालं. लंडनच्या रॉयल ब्रॉम्टन हॉस्पिटलमध्ये सकाळी 8 वाजता त्यांनी जगाचा निरोप घेतला. ते 95 वर्षांचे होते. त्यांच्यावर लंडनमध्येच अंत्यसंस्कार होणार आहेत. पण हुसेन यांच्यावर भारतात अंत्यसंस्कार करायचे असल्यास त्यांना सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन भारत सरकारनं दिले आहे. हुसेन यांच्या आयुष्याच्या कॅनव्हासमध्ये अनेक रंग भरलेले आहेत.

एम. एफ. हुसेन. म्हणजेच मकबूल फिदा हुसेन हे चित्रकलेच्या दुनियेतील एक दंतकथा बनून गेलेलं नाव. या अवलिया चित्रकाराचा जन्म 17 सप्टेंबर 1915 चा. भक्तीरंगात रंगलेल्या पंढरपूरमधला. पण उमलत्या वयातच आई झुनैबचा मृत्यू झाला.

मग हुसेन बडोद्याला मामाकडे राहायला गेले. तिथे कॅलिग्राफी आणि कवितेमध्ये त्यांचं मन रमलं. पुढे इंदौरला शिक्षण झाल्यानंतर त्यांनी मुंबईच्या जे. जे.स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला. हिंदी फिल्मची पोस्टर्स रंगवण्यापासून त्यांच्या करिअरची खरी सुरुवात झाली. निमिर्तीक्षमता, शैली आणि सतत काहीतरी नवं करत राहण्याच्या ऊर्मीमुळे कलेच्या क्षेत्रात हुसेन याचं नाव झालं.

1948 ते 1950 या काळातल्या त्यांच्या प्रदर्शनांमुळे चित्रकार म्हणून त्यांची देशभरात ख्याती झाली. मग ते प्रोग्रेसिव्ह ग्रुप ऑफ आर्टमध्ये सहभागी झाले. स्वित्झर्लंडमध्ये झुरिचला 1952 मध्ये त्यांचं पहिलं आंतरराष्ट्रीय स्तरावरचं चित्रप्रदर्शन भरलं.चीन, अमेरिका, युरोप असा प्रवास करत एम.एफ. हुसेन जगभरातल्या कलारसिकांपर्यंत पोहोचले.

1967 ला त्यांनी थ्रू द आइज ऑफ अ पेंटर ही पहिली फिल्म बनवली. ही फिल्म बलिर्न फिल्म फेस्टिवल मध्ये दाखवली गेली आणि गोल्डन बेअर पुरस्कार मिळाला. 1971 मध्ये झालेल्या एका चित्रप्रदर्शनात पाब्लो पिकासोबरोबर हुसेन यांनाही आमंत्रित करण्यात आलं होतं.

हुसेन यांची चित्रं विक्रमी किंमतीने विकली गेली. अलीकडेच 2011 मध्ये बोनहॅम्सच्या लिलावात त्यांच्या चित्राला तब्बल दोन कोटी 32 लाख रुपये एवढी किंमत मिळाली. चित्रकार म्हणून आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवलेल्या या अवलियाने बॉलिवूडमध्येही दोन सिनेमांची निमिर्ती केली.

माधुरी दीक्षितवर फिदा असणार्‍या हुसेन यांनी गजगामिनी बनवला. पुढे मीनाक्षी - अ टेल ऑफ थ्री सिटीज हा तब्बूबरोबरचा चित्रपट गाजला. जगभरातल्या सगळ्या मोठ्या शहरांमध्ये हुसेन यांचे स्टुडिओ आहेत. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण या किताबांनी त्यांना गौरवण्यात आलं. 1986 मध्ये ते राज्यसभेतही गेले.

हुसेन यांची कारकार्द वादळी आहे. त्यांनी काढलेल्या हिंदू देवतांच्या चित्रांवरून आणि भारतमातेच्या चित्रावरूनही वाद निर्माण झाले. धर्म, व्यक्तीस्वातंत्र्य, कला यावर चर्चा झडल्या. हुसेन यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या.

या वादानंतर हुसेन यांनी भारत सोडण्याचा निर्णय घेतला. 2010 मध्ये त्यांनी कतारचं नागरिकत्व घेतलं. त्यानंतर ते दुबई आणि लंडनमध्ये राहिले. आणि अखेर लंडनमधल्या हॉस्पिटलमध्येच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.जगभरातल्या कलाक्षेत्रात हा अविलया कलाकार त्याच्या चित्रांप्रमाणेच अमर झाला आहे.

मकबुल फिदा हुसेन यांच्या जीवनप्रवास

17 सप्टेंबर 1915 : पंढरपूरमध्ये जन्म1952 : झुरिकमध्ये पहिलं सोलो चित्रप्रदर्शन 1955 : पद्मश्री पुरस्काराने गौरव 1967 : पहिली फिल्म - थ्रू द आईज ऑफ पेंटर1973 : पद्मभूषण पुरस्काराने गौरव1986 : राज्यसभेवर नेमणूक1991 : पद्मविभूषण पुरस्काराने सन्मान2000: 'गजगामिनी' चित्रपटाची निर्मिती2004 : 'मीनाक्षी - अ टेल ऑफ 3 सिटीज' चित्रपटाची निर्मिती2006 : चित्रांवरून वादानंतर भारत सोडला2008 : बॅटल ऑफ गंगा ऍण्ड जमुना चित्राला रेकॉर्ड 1.6 मिलियन डॉलर्सची किंमत 2010: मध्ये कतारचं नागरिकत्त्वजून 2011 : लंडनमध्ये निधन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 9, 2011 09:02 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close