S M L

महामेळाव्याला गोपीनाथ मुंडे गैरहजर

09 जूनआज शिवशक्ती- भीमशक्तीने आयोजित केलेल्या महामेळाव्यात दोन्ही पक्षाचे नेते भर पावसात सरकारवर चांगलेच बरसले. पण पुन्हा एकदा गोपीनाथ मुंडे यांनी या मेळाव्यालाही गैर हजर राहिले आहे. या अगोदर पुण्यात झालेल्या मेळाव्याला ही पक्षांतर्गत वादामुळे मुंडेंनी दांडी मारली होती. त्यामुळे युतीमध्ये मतभेद असल्याचे आता उघड झालं आहे. दरम्यान मुंडेंची अनुपस्थिती म्हणजे बहुजन समाजाला ही युती मान्य नाही याचं प्रतीक असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. गेला महिनाभर चर्चेत असलेला शिवशक्ती- भिमशक्ती आणि भाजप महायुतीचा मेळावा अखेर पार पडला. पण जितकी चर्चा या महामोर्चाची झाली तितका यशस्वी हा मोर्चा झाला नाही. 60 फुटी भव्य स्टेज, निळ्या आणि भगव्या झेंड्यांनी भरून गेलेलं आझाद मैदान आणि तिन्ही पक्षांच्या दिग्गज नेत्यांची मांदियाळी अशा वातावरणात शिवशक्ती आणि भीमशक्तीने आपल्या मुंबईच्या बालेकिल्ल्यात पहिल्यांदाच आपला एकत्रित जोर आजमावला. प्रमुख वक्त्यांनीसुद्धा आपली राजकीय भूमिका स्पष्ट करत गेल्या काही दिवसांतल्या या महायुतीवर होत असलेल्या टिकेला उत्तर दिलं. या महायुतीतला स्थानिक पातळीवरचा मोठा राजकीय पक्ष म्हणून शिवसेनेसमोर गर्दी जमवण्याचे प्रमुख आव्हान होतं. मेळाव्याला रेकॉर्डब्रे गर्दी होईल असा दावा महायुतीतल्या नेत्यांनी केला होता. पण अचानक आलेल्या पावसानं मेऴाव्याच्या आयोजनावर पाणी फिरवलं. खरंतर हा मोर्चा वाढती महागाई, दलितांवर होणारे अत्याचार आणि सरकारी पातळीवर होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात होता. पण एखाद-दुसर्‍या वक्त्याचा अपवाद वगळता बहुतांशी वक्त्यांच्या भाषणात हे मुद्दे आलेच नाहीत. त्यातच गोपिनाथ मुंडेंच्या नाराजीमुळे त्यांच्या मेळाव्यातल्या गैरहजेरी बद्दल उलटसुलट चर्चेला उत आला होता. या गोष्टींचा विचार करुन या महायुतीतल्या तिन्ही पक्षांना भविष्यकाळात पाऊलं टाकावी लागतील.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 9, 2011 12:59 PM IST

महामेळाव्याला गोपीनाथ मुंडे गैरहजर

09 जून

आज शिवशक्ती- भीमशक्तीने आयोजित केलेल्या महामेळाव्यात दोन्ही पक्षाचे नेते भर पावसात सरकारवर चांगलेच बरसले. पण पुन्हा एकदा गोपीनाथ मुंडे यांनी या मेळाव्यालाही गैर हजर राहिले आहे. या अगोदर पुण्यात झालेल्या मेळाव्याला ही पक्षांतर्गत वादामुळे मुंडेंनी दांडी मारली होती. त्यामुळे युतीमध्ये मतभेद असल्याचे आता उघड झालं आहे. दरम्यान मुंडेंची अनुपस्थिती म्हणजे बहुजन समाजाला ही युती मान्य नाही याचं प्रतीक असल्याची टीका काँग्रेसने केली आहे.

गेला महिनाभर चर्चेत असलेला शिवशक्ती- भिमशक्ती आणि भाजप महायुतीचा मेळावा अखेर पार पडला. पण जितकी चर्चा या महामोर्चाची झाली तितका यशस्वी हा मोर्चा झाला नाही.

60 फुटी भव्य स्टेज, निळ्या आणि भगव्या झेंड्यांनी भरून गेलेलं आझाद मैदान आणि तिन्ही पक्षांच्या दिग्गज नेत्यांची मांदियाळी अशा वातावरणात शिवशक्ती आणि भीमशक्तीने आपल्या मुंबईच्या बालेकिल्ल्यात पहिल्यांदाच आपला एकत्रित जोर आजमावला. प्रमुख वक्त्यांनीसुद्धा आपली राजकीय भूमिका स्पष्ट करत गेल्या काही दिवसांतल्या या महायुतीवर होत असलेल्या टिकेला उत्तर दिलं.

या महायुतीतला स्थानिक पातळीवरचा मोठा राजकीय पक्ष म्हणून शिवसेनेसमोर गर्दी जमवण्याचे प्रमुख आव्हान होतं. मेळाव्याला रेकॉर्डब्रे गर्दी होईल असा दावा महायुतीतल्या नेत्यांनी केला होता. पण अचानक आलेल्या पावसानं मेऴाव्याच्या आयोजनावर पाणी फिरवलं.

खरंतर हा मोर्चा वाढती महागाई, दलितांवर होणारे अत्याचार आणि सरकारी पातळीवर होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात होता. पण एखाद-दुसर्‍या वक्त्याचा अपवाद वगळता बहुतांशी वक्त्यांच्या भाषणात हे मुद्दे आलेच नाहीत.

त्यातच गोपिनाथ मुंडेंच्या नाराजीमुळे त्यांच्या मेळाव्यातल्या गैरहजेरी बद्दल उलटसुलट चर्चेला उत आला होता. या गोष्टींचा विचार करुन या महायुतीतल्या तिन्ही पक्षांना भविष्यकाळात पाऊलं टाकावी लागतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 9, 2011 12:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close