S M L

काही काळ पाऊस ओसरण्याची शक्यता

09 जूनमान्सून महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर राज्यभरात पाऊस पडत होता. पण सध्या काही काळासाठी हा पाऊस कमी होणार असल्याची माहिती पुणे वेधशाळेने दिली आहे. साधारण पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा पावसाला सुरुवात होणार असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे मान्सून वेगाने पुढे सरकत होता. पण सध्या त्याचा प्रवास काहीसा मंदावला असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. सध्या मान्सून पूर्वेकडे आगेकूच करत असल्याचं सांगण्यात येतं आहे. कोकण तसेच मुंबईमध्ये मान्सून पोहचला आहे. पण अजूनही मराठवाडा आणि विदर्भात मान्सून पोहचलेला नसल्याचं सांगितलं जातं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 9, 2011 12:45 PM IST

काही काळ पाऊस ओसरण्याची शक्यता

09 जून

मान्सून महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर राज्यभरात पाऊस पडत होता. पण सध्या काही काळासाठी हा पाऊस कमी होणार असल्याची माहिती पुणे वेधशाळेने दिली आहे. साधारण पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा पावसाला सुरुवात होणार असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे मान्सून वेगाने पुढे सरकत होता. पण सध्या त्याचा प्रवास काहीसा मंदावला असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. सध्या मान्सून पूर्वेकडे आगेकूच करत असल्याचं सांगण्यात येतं आहे. कोकण तसेच मुंबईमध्ये मान्सून पोहचला आहे. पण अजूनही मराठवाडा आणि विदर्भात मान्सून पोहचलेला नसल्याचं सांगितलं जातं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 9, 2011 12:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close