S M L

टीव्ही निर्माते आणि सिनेवर्कर्सचा वाद ऐरणीवर

11 नोव्हेंबर, मुंबई निर्माते अपुरे पैसे देतात, आपल्याला योग्य ते सहकार्य करत नाहीत अशी कुरबूर गेल्या काही दिवसांपासून हिंदी मालिकांच्या तंत्रज्ञांमधून ऐकू येत होती. हीच तक्रार पुढे करून सर्व मालिकांच्या तंत्रज्ञ मंडळींनी संप पुकारला आहे. त्यामुळे येत्या आठवडाभर तरी सर्व खाजगी मनोरंजन वाहिन्यांवर हिंदी मालिकांच्या जुन्या भागांचं पुन:प्रक्षेपण होत आहे. आठवड्या भराचा संप दोन दिवसांनी संपेल असं वाटत होतं. मात्र तंत्रज्ञांनी काही माघार घेतलेली नाहीये.आठ तासांच्या नियोजित शिफ्टपेक्षा अधिक तास काम केल्यावर वाढीव पैसे मिळायला पाहिजे अशी मागणी तंत्रज्ञांनी केली आहे आणि याच मुख्य मुद्द्यावरून तंत्रज्ञांनी संपाचं बिगुल वाजवलं आहे. संपाच्या मुद्द्यावर निर्मात्यांचं असं म्हणणं आहे की चॅनेल्सनीही चर्चेसाठी पुढे आलं पाहिजे, तरच याप्रश्नी तोडगा निघू शकेल. मालिका निर्मात्यांनी 'चॅनेल्सकडूनच आम्हाला पैसे वाढवून मिळत नाहीत. चॅनेल्सकडून पैसे मिळाले तर आम्हाला सिनेतंत्रज्ञांना पैसे देता येतील', असं निर्मात्यांनी सांगितलं आहे. तर चॅनल्सने वाढीव मानधनाच्या मुद्यावर जागतिक मंदीचं कारण पुढे केलं आहे. टीव्ही निर्मात्यांतर्फे बोलताना मुकेश भट्ट यांनी टीव्ही इंडस्ट्रीसाठी नव्या गाईडलाईन्सची गरज बोलून दाखवली. याचबरोबर टीव्ही इंडस्ट्रीसाठी नवे नियम बनवायला हवेत असंही ते म्हणालेत. थोडक्यात काय तर टीव्ही निर्माते आणि सिनेवर्कर्स यांच्यातल्या वादावर अजूनही काही तोडगा निघात नाही आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 12, 2008 10:37 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 12, 2008 10:37 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close