S M L

बुलढाण्यात शेतकर्‍यांची जाळून घेऊन आत्महत्या

10 जूनबुलढाणा जिल्ह्यातील वैरागड इथं माधव सुईरूशे या शेतकर्‍याने स्वत:च्या शेतातच अंगावर रॉकेल घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. माधव सुईरूशे यांना 5 मुली आणि 1 मुलगा आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर ते शेतीच्या कामाला लागले पण पेरणीसाठी पैसाच नसल्यामुळे तसेच मुलीच्या लग्नासाठी सुद्धा पैसे नसल्याने या शेतकर्‍याने आत्महत्या केल्याचं समजतंय. शेतकर्‍याने आत्महत्या करून दोन दिवस उलटून गेले असले तरी अजूनही कोणत्याच अधिकार्‍याने सुईरूशे कुटुंबाची भेट घेतलेली नाहीय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 10, 2011 08:16 AM IST

बुलढाण्यात शेतकर्‍यांची जाळून घेऊन आत्महत्या

10 जून

बुलढाणा जिल्ह्यातील वैरागड इथं माधव सुईरूशे या शेतकर्‍याने स्वत:च्या शेतातच अंगावर रॉकेल घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. माधव सुईरूशे यांना 5 मुली आणि 1 मुलगा आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर ते शेतीच्या कामाला लागले पण पेरणीसाठी पैसाच नसल्यामुळे तसेच मुलीच्या लग्नासाठी सुद्धा पैसे नसल्याने या शेतकर्‍याने आत्महत्या केल्याचं समजतंय. शेतकर्‍याने आत्महत्या करून दोन दिवस उलटून गेले असले तरी अजूनही कोणत्याच अधिकार्‍याने सुईरूशे कुटुंबाची भेट घेतलेली नाहीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 10, 2011 08:16 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close