S M L

...आणि जग नव्याने पाहिले !

शची मराठे आणि तुषार तपासे, मुंबई10 जूनहे सुंदर जग आपण आपल्या डोळ्यांनी बघत असतो. पण ज्यांच्याकडे डोळे नाहीत अशी कितीतरी लोकं अंधारात चाचपडत आपलं जीवन जगत असतात. अशा लोकांच्या जीवनात उजेड आणायचा असेल तर त्यांना गरज असते नेत्रदानाची. आज 10 जून म्हणजे जागतिक दृष्टीदान दिवस. अशाच दृष्टी मिळालेल्या रामदास सुर्यवंशी यांची ही गोष्ट. सातारा येथे राहणारे रामदास सुर्यवंशी. वय वर्ष 42 काम करताना भट्टीत झालेल्या एका अपघातात रामदास यांना आपले दोन्ही डोळे गमावावे लागले.रामदास सुर्यवंशी म्हणतात, मला दिसत नाही याचं खूप वाईट वाटायचं मी आईला नेहमी सांगायचो की मला हिमालयात नेऊन सोड मी तिथं तपश्चर्या करीन.सुर्यवंशी यांना स्थानिक रुग्णालयात उपचार घेऊन काही फरक पडेना. म्हणून शेवटी उपचारांसाठी त्यांनी मुंबईचं जेजे हॉस्पिटल गाठलं.काही दिवसातच ऑपरेशन झालं. सात दिवसांनी डोळ्यावरच्या पट्‌ट्या काढण्यात आल्या आणि त्यांनी पुन्हा पहिल्यासारखे दिसायला लागले. म्हणूनच एवढ्या मोठ्या संघर्षानंतर मिळालेल्या दृष्टीचं मोल सुर्यवंशी यांच्या लेखी खूप मोठ आहे.दरवर्षी भारतात नव्या दृष्टीसाठी प्रतिक्षा यादीवर असलेल्याची संख्या आणि गरज ओळखून नेत्रदान करण्यासाठी पुढे येणार्‍यांच्या संख्येत खूप मोठी तफावत आहे. जेणेकरुन तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या डोळ्यांनी दुसरं कोणीतरी हे सुंदर जग पुन्हा एकदा पाहु शकेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 10, 2011 01:22 PM IST

...आणि जग नव्याने पाहिले !

शची मराठे आणि तुषार तपासे, मुंबई

10 जून

हे सुंदर जग आपण आपल्या डोळ्यांनी बघत असतो. पण ज्यांच्याकडे डोळे नाहीत अशी कितीतरी लोकं अंधारात चाचपडत आपलं जीवन जगत असतात. अशा लोकांच्या जीवनात उजेड आणायचा असेल तर त्यांना गरज असते नेत्रदानाची. आज 10 जून म्हणजे जागतिक दृष्टीदान दिवस. अशाच दृष्टी मिळालेल्या रामदास सुर्यवंशी यांची ही गोष्ट.

सातारा येथे राहणारे रामदास सुर्यवंशी. वय वर्ष 42 काम करताना भट्टीत झालेल्या एका अपघातात रामदास यांना आपले दोन्ही डोळे गमावावे लागले.रामदास सुर्यवंशी म्हणतात, मला दिसत नाही याचं खूप वाईट वाटायचं मी आईला नेहमी सांगायचो की मला हिमालयात नेऊन सोड मी तिथं तपश्चर्या करीन.

सुर्यवंशी यांना स्थानिक रुग्णालयात उपचार घेऊन काही फरक पडेना. म्हणून शेवटी उपचारांसाठी त्यांनी मुंबईचं जेजे हॉस्पिटल गाठलं.काही दिवसातच ऑपरेशन झालं.

सात दिवसांनी डोळ्यावरच्या पट्‌ट्या काढण्यात आल्या आणि त्यांनी पुन्हा पहिल्यासारखे दिसायला लागले. म्हणूनच एवढ्या मोठ्या संघर्षानंतर मिळालेल्या दृष्टीचं मोल सुर्यवंशी यांच्या लेखी खूप मोठ आहे.

दरवर्षी भारतात नव्या दृष्टीसाठी प्रतिक्षा यादीवर असलेल्याची संख्या आणि गरज ओळखून नेत्रदान करण्यासाठी पुढे येणार्‍यांच्या संख्येत खूप मोठी तफावत आहे. जेणेकरुन तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या डोळ्यांनी दुसरं कोणीतरी हे सुंदर जग पुन्हा एकदा पाहु शकेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 10, 2011 01:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close