S M L

मनसेचे आमदार रमेश वांजळेंवर अंत्यसंस्कार

11 जूनमनसेचे आमदार रमेश वांजळे यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात, त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्याप्रमाणावर जनसमुदाय जमला होता. तसेच राज ठाकरे यांच्यासह मनसे आणि इतरही पक्षांचे बडे नेत हजर होते. राज ठाकरेंची पत्नी शर्मिला ठाकरे, नितीन सरदेसाई, वसंत गीते, निलम गोर्‍हे, गिरीश बापट, रामदास आठवले आणि मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते रमेश वांजळेच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित आहेत. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचं निधन झालं. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, 2 मुलगे, 1 मुलगी असा परिवार आहे. मनसेच्या 13 आमदारांपैकी सर्वांचे आवडते आणि आक्रमक आमदार म्हणून त्यांची ओळख होती. रमेश वांजळेंनी सिक्युरीटी गार्ड म्हणून कामाला सुरुवात केली. त्यानंतर रामकृष्ण मोरे यांच्यामुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. सरपंच ते आमदार असा प्रवास त्यांनी गाजवलेला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 11, 2011 10:48 AM IST

मनसेचे आमदार रमेश वांजळेंवर अंत्यसंस्कार

11 जून

मनसेचे आमदार रमेश वांजळे यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात, त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्याप्रमाणावर जनसमुदाय जमला होता. तसेच राज ठाकरे यांच्यासह मनसे आणि इतरही पक्षांचे बडे नेत हजर होते. राज ठाकरेंची पत्नी शर्मिला ठाकरे, नितीन सरदेसाई, वसंत गीते, निलम गोर्‍हे, गिरीश बापट, रामदास आठवले आणि मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते रमेश वांजळेच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित आहेत.

हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचं निधन झालं. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, 2 मुलगे, 1 मुलगी असा परिवार आहे. मनसेच्या 13 आमदारांपैकी सर्वांचे आवडते आणि आक्रमक आमदार म्हणून त्यांची ओळख होती. रमेश वांजळेंनी सिक्युरीटी गार्ड म्हणून कामाला सुरुवात केली. त्यानंतर रामकृष्ण मोरे यांच्यामुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. सरपंच ते आमदार असा प्रवास त्यांनी गाजवलेला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 11, 2011 10:48 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close