S M L

मिड डेचे पत्रकार जे डे यांची हत्या

11 जूनमिड डे वृत्तपत्राच्या पत्रकारावर गोळीबार करण्यात आला. ज्योतीद्रकुमार डे असं त्यांचं नाव आहे. डे यांच्यावर मुंबईतल्या पवई येथील त्यांच्या राहत्या घरी काही अज्ञात लोकांनी गोळी झाडली. डे यांना हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आल होतं मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. मिड डे मध्ये ज्योतीद्रकुमार हे स्पेशल इन्वस्टेगेशन एडिटर म्हणून काम करत होते. अंडरवर्ल्डवर त्यांनी लिहलेलं 'झीरो डायल' पुस्तक नुकतचं प्रकाशित करण्यात आलं. या पुस्तकात त्यांनी 80 आणि 90 च्या दशकातल्या गुन्हेगारी विश्वाविषयी लिहिलं होतं. संघटित गुन्हेगारीवर त्यांनी बरेच लेख लिहिले होते. सोमवारी पत्रकारांच्या वतीनं मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. पत्रकार त्यावेळी गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या राजीनाम्यांची मागणी करणार आहेत. तसेच मुंबई पोलिसांच्या निलंबनाची मागणीही पत्रकारांची संघटनांनी केली आहे.दरम्यान, मुंबईचे ऍडिशनल सी.पी. विश्वास नांगरे पाटील यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. हल्लेखारांची संख्या 4 होती. डे यांच्या शरीरावर 9 जखमा आहेत. अंदाजे 5 ते 6 गोळ्या लागल्या असाव्यात अशी माहितीही त्यांनी दिली.या संदर्भात मुंबईचे पोलीस आयुक्त अरूप पटनाईक यांनी पत्रकार परिषद घेतली. डेंची हत्या हे सराईत गुन्हेगारांचे कृत्य असल्याचं या वेळी त्यांनी सांगितलं.मिड डे च्या पत्रकारावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्या नंतर राज्याचे गृहमंत्री आर आर पाटील यांनी पवई पोलीस स्टेशनला भेट देऊन तपासाची माहिती दिली. त्यानंतर प्रतिक्रिया देताना त्यानी या हल्याचा निषेध केला. तसेच या तपासात सीसीटिव्हीचे फुटेज मिळाले असून तपास त्यादिशेनं सुरू असल्याच ही सांगितलंगेल्या दोन वर्षांत 185 पत्रकारांवर विविध कारणांसाठी हल्ले झाले आहेत. पत्रकारांवरचे हल्ले आणि धमक्या1997 - अनिल ठाणेकर यांच्यावर हल्ला 1996 - प्रमोद भागवत यांच्यावर हल्ला2008 - कुमार केतकर यांच्या घरावर हल्ला (शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी केला हल्ला)2009 - 'आयबीएन लोकमत'च्या ऑफिसवर हल्लातोडफोड आणि मारहाण2002 - केल्विन जोशवा - गँगस्टर्सच्या धमक्या 1999 - जयप्रकाश सिंग गँगस्टर्सच्या धमक्या एस. बालकृष्णन - गँगस्टर्सच्या धमक्या 24 ऑगस्ट 2010- अमित जोशी

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 11, 2011 11:06 AM IST

मिड डेचे पत्रकार जे डे यांची हत्या

11 जून

मिड डे वृत्तपत्राच्या पत्रकारावर गोळीबार करण्यात आला. ज्योतीद्रकुमार डे असं त्यांचं नाव आहे. डे यांच्यावर मुंबईतल्या पवई येथील त्यांच्या राहत्या घरी काही अज्ञात लोकांनी गोळी झाडली. डे यांना हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आल होतं मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. मिड डे मध्ये ज्योतीद्रकुमार हे स्पेशल इन्वस्टेगेशन एडिटर म्हणून काम करत होते.

अंडरवर्ल्डवर त्यांनी लिहलेलं 'झीरो डायल' पुस्तक नुकतचं प्रकाशित करण्यात आलं. या पुस्तकात त्यांनी 80 आणि 90 च्या दशकातल्या गुन्हेगारी विश्वाविषयी लिहिलं होतं. संघटित गुन्हेगारीवर त्यांनी बरेच लेख लिहिले होते.

सोमवारी पत्रकारांच्या वतीनं मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. पत्रकार त्यावेळी गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या राजीनाम्यांची मागणी करणार आहेत. तसेच मुंबई पोलिसांच्या निलंबनाची मागणीही पत्रकारांची संघटनांनी केली आहे.

दरम्यान, मुंबईचे ऍडिशनल सी.पी. विश्वास नांगरे पाटील यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. हल्लेखारांची संख्या 4 होती. डे यांच्या शरीरावर 9 जखमा आहेत. अंदाजे 5 ते 6 गोळ्या लागल्या असाव्यात अशी माहितीही त्यांनी दिली.या संदर्भात मुंबईचे पोलीस आयुक्त अरूप पटनाईक यांनी पत्रकार परिषद घेतली. डेंची हत्या हे सराईत गुन्हेगारांचे कृत्य असल्याचं या वेळी त्यांनी सांगितलं.मिड डे च्या पत्रकारावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्या नंतर राज्याचे गृहमंत्री आर आर पाटील यांनी पवई पोलीस स्टेशनला भेट देऊन तपासाची माहिती दिली. त्यानंतर प्रतिक्रिया देताना त्यानी या हल्याचा निषेध केला. तसेच या तपासात सीसीटिव्हीचे फुटेज मिळाले असून तपास त्यादिशेनं सुरू असल्याच ही सांगितलंगेल्या दोन वर्षांत 185 पत्रकारांवर विविध कारणांसाठी हल्ले झाले आहेत.

पत्रकारांवरचे हल्ले आणि धमक्या1997 - अनिल ठाणेकर यांच्यावर हल्ला 1996 - प्रमोद भागवत यांच्यावर हल्ला2008 - कुमार केतकर यांच्या घरावर हल्ला (शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी केला हल्ला)2009 - 'आयबीएन लोकमत'च्या ऑफिसवर हल्लातोडफोड आणि मारहाण2002 - केल्विन जोशवा - गँगस्टर्सच्या धमक्या 1999 - जयप्रकाश सिंग गँगस्टर्सच्या धमक्या एस. बालकृष्णन - गँगस्टर्सच्या धमक्या 24 ऑगस्ट 2010- अमित जोशी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 11, 2011 11:06 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close