S M L

अखेर बाबांनी उपोषण सोडले

12 जूनबाबा रामदेव यांनी अखेर आपलं उपोषण मागे घेतलं आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनी मध्यस्थी केल्यानंतर बाबा रामदेव यांनी 9 दिवसांनंतर उपोषण मागे घेतलं. मोसंबीचा ज्यूस पिऊन बाबांनी उपोषण सोडलं. डेहराडूनमधील हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्ससमध्ये बाबा रामदेव यांच्यावर उपचार सुरू आहेत. बाबा रामदेव यांचं दिल्लीतील आंदोलन उधळल्यानंतर ते हरिद्वारमध्ये उपोषण करत होते. मात्र तिथे त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. सरकार मात्र आपल्या भूमिकेवर ठाम राहिलं आणि बाबांची एकही मागणी सरकारने मान्य केली नाही. मात्र बाबांनी उपोषण मागे घ्यावं यासाठी सरकारने विनंती केली होती. बाबांच्या माघारीमुळे सरकारचा मात्र विजय झाल्याचं मानलं जातंय. उपोषण मागे घेतलं असलं तरी भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाविरोधात आपलं आंदोलन सुरूच राहणार असल्याचं बाबा रामदेव यांच्या अनुयायांनी सांगितलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 12, 2011 09:41 AM IST

अखेर बाबांनी उपोषण सोडले

12 जून

बाबा रामदेव यांनी अखेर आपलं उपोषण मागे घेतलं आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनी मध्यस्थी केल्यानंतर बाबा रामदेव यांनी 9 दिवसांनंतर उपोषण मागे घेतलं. मोसंबीचा ज्यूस पिऊन बाबांनी उपोषण सोडलं. डेहराडूनमधील हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्ससमध्ये बाबा रामदेव यांच्यावर उपचार सुरू आहेत.

बाबा रामदेव यांचं दिल्लीतील आंदोलन उधळल्यानंतर ते हरिद्वारमध्ये उपोषण करत होते. मात्र तिथे त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. सरकार मात्र आपल्या भूमिकेवर ठाम राहिलं आणि बाबांची एकही मागणी सरकारने मान्य केली नाही.

मात्र बाबांनी उपोषण मागे घ्यावं यासाठी सरकारने विनंती केली होती. बाबांच्या माघारीमुळे सरकारचा मात्र विजय झाल्याचं मानलं जातंय. उपोषण मागे घेतलं असलं तरी भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाविरोधात आपलं आंदोलन सुरूच राहणार असल्याचं बाबा रामदेव यांच्या अनुयायांनी सांगितलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 12, 2011 09:41 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close