S M L

'वल्गन भरली, खवळा लागेल गळाला' !

12 जूनपावसाळा सुरू झाला आणि नदी नाले तुडुंब वाहु लागले की कोकणात शेतकर्‍यांची लगबग सुरू होते ती मळ्यातले मासे पकडण्याची. पाऊस झाल्यावर नदी, ओढे आणि नाले वाहु लागतात आणि त्यामुळेच हे मासे शेतात येतात. त्याला कोकणात 'वल्गन भरली' असं म्हणतात. वल्गन म्हणजे नदीचं पाणी पाटातून ओढ्यात घेणं. गोड्या पाण्यातील हे चविष्ट मासे फक्त याच दिवसात मिळतात. आणि हे मासे पकडले जातात ते पूर्ण पारंपरिक पध्दतीनं. छत्री टाकून, जाळं टाकून आणि काठीने सुध्दा हे मासे पकडले जातात 'वल्गन भरली, खवळा लागेल गळाला ' असं म्हणत शेतकर्‍यांची दिवस रात्र ही मासेमारी सुरू असते.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 12, 2011 10:26 AM IST

'वल्गन भरली, खवळा लागेल गळाला' !

12 जून

पावसाळा सुरू झाला आणि नदी नाले तुडुंब वाहु लागले की कोकणात शेतकर्‍यांची लगबग सुरू होते ती मळ्यातले मासे पकडण्याची. पाऊस झाल्यावर नदी, ओढे आणि नाले वाहु लागतात आणि त्यामुळेच हे मासे शेतात येतात. त्याला कोकणात 'वल्गन भरली' असं म्हणतात.

वल्गन म्हणजे नदीचं पाणी पाटातून ओढ्यात घेणं. गोड्या पाण्यातील हे चविष्ट मासे फक्त याच दिवसात मिळतात. आणि हे मासे पकडले जातात ते पूर्ण पारंपरिक पध्दतीनं. छत्री टाकून, जाळं टाकून आणि काठीने सुध्दा हे मासे पकडले जातात 'वल्गन भरली, खवळा लागेल गळाला ' असं म्हणत शेतकर्‍यांची दिवस रात्र ही मासेमारी सुरू असते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 12, 2011 10:26 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close