S M L

भरकटलेलं जहाज जुहू किनार्‍यावर धडकले

12 जूनमुंबई जवळच्या अरबी समुद्रात एक मालवाहु जहाज भरकटल्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. एम व्ही विस्डम हे मालवाहु जहाज कोलंबोहुन गुजरातच्या अलंग बंदरात जात होतं. या जहाजाला दुसरं एक जहाज टो करुन घेऊन जात होतं. त्यामुळे या एम व्ही विस्डम जहाजावर कोणीही कर्मचारी नव्हते. मुंबईत वरळी जवळच्या समुद्रात आल्यानंतर विस्डम जहाज भरकटलं आणि हे जहाज वांद्रे वरळी सीलिंक ला धडकणार अशी भीती निर्माण झाली होती. पण नेव्ही आणि कोस्ट गार्ड यांच्या रेस्क्यू टीमने खबरदारी घेत. या जहाजाला सीलिंकपासून दुर नेलं. मुंबई आणि परिसरात गेले दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे समुद्र देखील उधाणलेला आहे. त्यामुळे एम व्ही विस्डम हे जहाज भरकटत आज सकाळी जुहूच्या किनार्‍या जवळ येऊन धडकलंय. आता या जहाजाचा ताबा कोस्ट गार्डने घेतला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 12, 2011 10:35 AM IST

भरकटलेलं जहाज जुहू किनार्‍यावर धडकले

12 जून

मुंबई जवळच्या अरबी समुद्रात एक मालवाहु जहाज भरकटल्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. एम व्ही विस्डम हे मालवाहु जहाज कोलंबोहुन गुजरातच्या अलंग बंदरात जात होतं. या जहाजाला दुसरं एक जहाज टो करुन घेऊन जात होतं. त्यामुळे या एम व्ही विस्डम जहाजावर कोणीही कर्मचारी नव्हते.

मुंबईत वरळी जवळच्या समुद्रात आल्यानंतर विस्डम जहाज भरकटलं आणि हे जहाज वांद्रे वरळी सीलिंक ला धडकणार अशी भीती निर्माण झाली होती. पण नेव्ही आणि कोस्ट गार्ड यांच्या रेस्क्यू टीमने खबरदारी घेत.

या जहाजाला सीलिंकपासून दुर नेलं. मुंबई आणि परिसरात गेले दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे समुद्र देखील उधाणलेला आहे. त्यामुळे एम व्ही विस्डम हे जहाज भरकटत आज सकाळी जुहूच्या किनार्‍या जवळ येऊन धडकलंय. आता या जहाजाचा ताबा कोस्ट गार्डने घेतला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 12, 2011 10:35 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close