S M L

यंग ब्रिगेडची धमाल विजयी हॅटट्रिकसह मालिका खिशात

12 जूनतिसर्‍या वन-डेत विजय मिळवत भारताच्या यंग ब्रिगेडने वेस्ट इंडिजविरुध्दच्या वन डे सिरीजवर आपलं नाव कोरलं. अँटिग्वाला झालेल्या तिसर्‍या वन डेत भारताने यजमान विंडीजचा 3 विकेट राखून पराभव केला. टॉस जिंकून पहिली बॉलिंग करणार्‍या भारतीय टीमने पुन्हा एकदा विंडीज टीमला 250 रन्सच्या आत गुंडाळलं. मुनाफ पटेलनं आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये एडवर्डला आऊट करत विंडीजला पहिला धक्का दिला. आणि या धक्क्यातून विंडीजची टीम शेवटपर्यंत सावरलीच नाही. मुनाफ पटेल आणि अमित मिश्राच्या दमदार बॉलिंगसमोर विंडीजच्या टॉप बॅट्समननं शरणागती पत्करली. विंडीजने 226 रन्सचं आव्हान भारतापुढे ठेवलं. भारतीय टीमला पुन्हा एकदा चांगली ओपनिंग मिळाली नाही. शिखर धवन केवळ 4 रन्स करुन आऊट झाला. विंडीजच्या डेरेन सॅमीने धवनची विकेट घेतली आणि पाठोपाठ विराट कोहलीलाही पॅव्हेलिअनचा रस्ता दाखवला. भारताची घसरगुंडी उडाली. 92 रन्समध्ये भारताचे 6 बॅट्समन आऊट झाले होते. भारतीय टीम ही मॅच गमावणार असं वाटत असतानाच मग रोहित शर्माच्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारताने शानदार विजय मिळवला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 12, 2011 10:58 AM IST

यंग ब्रिगेडची धमाल विजयी हॅटट्रिकसह मालिका खिशात

12 जून

तिसर्‍या वन-डेत विजय मिळवत भारताच्या यंग ब्रिगेडने वेस्ट इंडिजविरुध्दच्या वन डे सिरीजवर आपलं नाव कोरलं. अँटिग्वाला झालेल्या तिसर्‍या वन डेत भारताने यजमान विंडीजचा 3 विकेट राखून पराभव केला. टॉस जिंकून पहिली बॉलिंग करणार्‍या भारतीय टीमने पुन्हा एकदा विंडीज टीमला 250 रन्सच्या आत गुंडाळलं.

मुनाफ पटेलनं आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये एडवर्डला आऊट करत विंडीजला पहिला धक्का दिला. आणि या धक्क्यातून विंडीजची टीम शेवटपर्यंत सावरलीच नाही. मुनाफ पटेल आणि अमित मिश्राच्या दमदार बॉलिंगसमोर विंडीजच्या टॉप बॅट्समननं शरणागती पत्करली.

विंडीजने 226 रन्सचं आव्हान भारतापुढे ठेवलं. भारतीय टीमला पुन्हा एकदा चांगली ओपनिंग मिळाली नाही. शिखर धवन केवळ 4 रन्स करुन आऊट झाला. विंडीजच्या डेरेन सॅमीने धवनची विकेट घेतली आणि पाठोपाठ विराट कोहलीलाही पॅव्हेलिअनचा रस्ता दाखवला.

भारताची घसरगुंडी उडाली. 92 रन्समध्ये भारताचे 6 बॅट्समन आऊट झाले होते. भारतीय टीम ही मॅच गमावणार असं वाटत असतानाच मग रोहित शर्माच्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारताने शानदार विजय मिळवला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 12, 2011 10:58 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close