S M L

मुख्यमंत्र्यांच्या 'होममिनिस्टर' सरकारवर नाराज

12 जूनपावसाळा सुरू झाला आणि रस्त्यांवरचे खड्डे ही जनतेची कायमची समस्या पण खुद्द मुख्यमंत्र्यांच्या पत्नीलाही या खड्‌ड्यांचा फटका बसला. पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सत्वशीला चव्हाण यांनी रस्त्यांवरील खड्‌ड्यांबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच पंढरपूरचा विकास न झाल्याबद्दलही त्यांनी खंत व्यक्त केली. 46 वर्षांपूर्वी आपण पहिल्यांदा पंढरपूरला आलो होतो, तेव्हा इथले रस्ते जसे होते तसेच आजही आहेत या शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली. पंढरपूरमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून कोणताच बदल झाला नसल्याची टीका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्वशिला चव्हाण यांनी केली. त्यामुळे वारकर्‍यांचे हाल होतात. मंदिराची स्वच्छताही निट नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. आज त्यांनी पढंरपूर विठठ्ल मंदिराला भेट दिली. त्यानंतर पत्रकारांशी बोलत होत्या. संसदेसारखी शिस्त विधानसभेत दिसत नाही असही त्यांनी म्हटलं. मुख्यमंत्र्यानी हळूहळू सर्वांना सरळ केलंय असा टोलाही त्यांनी हाणला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 12, 2011 04:00 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या 'होममिनिस्टर' सरकारवर नाराज

12 जून

पावसाळा सुरू झाला आणि रस्त्यांवरचे खड्डे ही जनतेची कायमची समस्या पण खुद्द मुख्यमंत्र्यांच्या पत्नीलाही या खड्‌ड्यांचा फटका बसला. पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सत्वशीला चव्हाण यांनी रस्त्यांवरील खड्‌ड्यांबाबत नाराजी व्यक्त केली.

तसेच पंढरपूरचा विकास न झाल्याबद्दलही त्यांनी खंत व्यक्त केली. 46 वर्षांपूर्वी आपण पहिल्यांदा पंढरपूरला आलो होतो, तेव्हा इथले रस्ते जसे होते तसेच आजही आहेत या शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली.

पंढरपूरमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून कोणताच बदल झाला नसल्याची टीका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्वशिला चव्हाण यांनी केली. त्यामुळे वारकर्‍यांचे हाल होतात. मंदिराची स्वच्छताही निट नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

आज त्यांनी पढंरपूर विठठ्ल मंदिराला भेट दिली. त्यानंतर पत्रकारांशी बोलत होत्या. संसदेसारखी शिस्त विधानसभेत दिसत नाही असही त्यांनी म्हटलं. मुख्यमंत्र्यानी हळूहळू सर्वांना सरळ केलंय असा टोलाही त्यांनी हाणला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 12, 2011 04:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close